मुंबई, ४ मे २०२२ (GNI): अनेक वेगवेगळ्या प्रकारची ग्राहकोपयोगी उत्पादने सादर करणारी, भारतातील एक सर्वात मोठी आणि सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली पॅकेज्ड खाद्य पदार्थांची एफएमसीजी कंपनी अडानी विल्मर लिमिटेडने मॅककॉर्मिक स्वित्झर्लंड जीएमबीएचकडून नामांकित कोहिनूर ब्रँडसह (भारत क्षेत्र) अनेक ब्रँड्सचे अधिग्रहण केल्याची घोषणा आज केली. या व्यवहाराच्या रकमेबाबतचा खुलासा करण्यात आलेला नाही. या अधिग्रहणामुळे अडानी विल्मर लिमिटेडला कोहिनूर ब्रँडच्या बासमती तांदुळासह भारतामध्ये कोहिनूर ब्रँडच्या छत्राखाली असलेल्या ‘रेडी टू कूक’, ‘रेडी टू ईट’ करी व मील्स पोर्टफोलिओचे विशेषाधिकार मिळणार आहेत.
कोहिनूरचा देशांतर्गत ब्रँड पोर्टफोलिओ अडानी विल्मरच्या ताफ्यात दाखल झाल्यामुळे प्रीमियम ब्रँड आणि मूल्यवर्धित उत्पादने वाढवण्याची क्षमता यांच्यासह उत्पादनांमध्ये मजबूत वाढ झाल्याने खाद्य एफएमसीजी विभागात या कंपनीचे नेतृत्वस्थान आता अधिक जास्त बळकट झाले आहे. कोहिनूर ब्रँडची जी पोहोच आहे त्याचा लाभ अडानी विल्मर लिमिटेडला सर्व भौगोलिक क्षेत्रांमध्ये समन्वयाला चालना देण्यामध्ये मिळणार असून खाद्य एफएमसीजी क्षेत्रातील त्यांचा प्रमुख ब्रँड फॉर्च्युनच्या विस्ताराला देखील हे अधिग्रहण पूरक ठरणार आहे. आपल्या विकासाला पुढील पातळीवर नेण्यात अडानी विल्मर लिमिटेडला या अधिग्रहणामुळे प्रोत्साहन मिळणार असून तांदूळ व इतर मूल्यवर्धित खाद्य व्यवसायांमध्ये प्रीमियम ग्राहक श्रेणींना सेवा पुरवण्यासाठी त्यांच्या पोर्टफोलिओचा विस्तार होणार आहे. भारत क्षेत्रामध्ये कोहिनूर ब्रँडचा व्यवसाय ताब्यात आल्यामुळे बासमती तांदुळाच्या श्रेणीमध्ये तिसऱ्या क्रमांकाची मजबूत कंपनी (फॉर्च्युन भारतात तिसऱ्या क्रमांकाचा बासमती तांदूळ ब्रँड आहे) बनण्यासाठी अडानी विल्मर लिमिटेड सज्ज आहे. कोहिनूर ब्रँड पोर्टफोलिओमध्ये “कोहिनूर” – प्रीमियम बासमती तांदूळ, “चारमिनार” किफायतशीर किमतींचा तांदूळ आणि “ट्रॉफी” होरेका श्रेणी यांचा समावेश आहे.
श्री अंगशु मलिक, मुख्य कार्यकारी अधिकारी-व्यवस्थापकीय संचालक, अडानी विल्मर लिमिटेड म्हणाले, “फॉर्च्युन परिवारात कोहिनूर ब्रँडचे स्वागत करताना अडानी विल्मरला अतिशय आनंद होत आहे. अस्सल भारतीय स्वादाचे प्रतिनिधित्व करणारा कोहिनूर हा विश्वसनीय ब्रँड असून ग्राहकांचे प्रचंड प्रेम या ब्रँडला लाभले आहे. अधिक जास्त मार्जिन असलेल्या मुख्य अन्न पदार्थांच्या व खाद्य उत्पादनांच्या श्रेणीत आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या आमच्या व्यवसाय धोरणाला अनुसरून हे अधिग्रहण करण्यात आले आहे. आम्ही असे मानतो की, पॅकेज्ड खाद्य श्रेणीचा पुरेसा विस्तार अद्यापही झालेला नाही आणि विकासासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. “कोहिनूर”चा ब्रँड रिकॉल मजबूत असून खाद्य एफएमसीजी श्रेणीमध्ये आमचे नेतृत्व स्थान अधिकाधिक बळकट करण्यात आम्हाला त्याची खूप मदत होणार आहे.” Ends GNI SG
Be the first to comment on "कोहिनूर ब्रँड अडानी विल्मरच्या ताब्यात उद्योगक्षेत्रातील आपले नेतृत्वस्थान अधिक बळकट करण्यासाठी कंपनीचे महत्त्वाकांक्षी पाऊल"