Mumbai, 27th April 2022 (GNI): महाप्रित व C.E.S.L मार्फत मुंबई शहरात 134 ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या पायाभूत सुविधा उभारण्याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशन क्लब, वांद्रे येथे आज एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्रासाठी माजी मुख्य सचिव श्री. स्वाधिन क्षत्रिय, माजी अपर मुख्य सचिव श्री.ए.के.जैन, माजी अ.मु.स. व महारेरा चे सदस्य डॉ.विजय सतबीर सिंग, महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपीन श्रीमाळी, शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री.सुमंत भांगे, महाप्रितचे संचालक श्री. विजयकुमार ना. काळम, श्री. सुभाष लाखे तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्रीचे श्री. सतीश कुमार कुमार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात श्री. स्वाधिन क्षत्रिय यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात महाप्रितचे संचालक श्री. विजयकुमार ना.काळम यांनी या कार्यक्रमाचा उद्देश, महाप्रितच्या स्थापनेमागील उद्देश व इतर माहिती यावर भाष्य केले. या कार्यक्रमासाठी मा.मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य यांच्या नियोजित कार्यक्रमामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू न शकल्याने त्यांचा संदेश श्री. काळम यांनी वाचून दाखविला.
महाप्रितचे कार्यकारी संचालक श्री. रविद्र चव्हाण यांनी इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशनबाबत सविस्तर सादरीकरण करुन इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशनची आवश्यकता त्याचे फायदे, मुंबईत करावयाच्या इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशनचे स्वरुप व त्यासाठी लागणारा खर्च, इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशनच्या जागा तसेच चार्जर्सचे प्रकार, चार्जिंग स्टेशनचे विविध मॉडेल, व्यावसायिक मॉडेल इत्यादीबाबत सादरीकरणाच्या मार्फत सविस्तर माहिती दिली.
महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. सुमंत भागे यांनी इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशनची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले.
महारेरा चे सदस्य डॉ.विजय सतबीर सिंग यांनी महारेरा, विकासक, भविष्यात येणारे तंत्रज्ञानातील बदल व आव्हाने, भविष्यात बदलणाऱ्या आर्थिक निकष, नवीन तंत्रज्ञान व कार्बन फुटप्रिंट, गृहनिर्माण संस्थांमध्ये उभारावयाचे चार्जिंग स्टेशन इत्यादीबाबत सविस्तर चर्चा केली.
महाराष्ट्र शासनाचे माजी अपर मुख्य सचिव श्री. ए.के.जैन यांनी इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशनचा पर्यावरणाशी असणारा संबंध, भविष्यातील वातावरणातील बदलाबाबतची परिस्थिती व या संदर्भातील आव्हाने व उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ हौंसिग इंडस्ट्री (MCHI) चे प्रतिनीधी श्री. सुरेश कुमार यांनी इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन व MCHI ची भूमिका याबाबत माहिती दिली तसेच MCHI सातत्याने महाप्रितबरोबर संपर्क करुन पुढील आवश्यक त्या उपाययोजना करेल असे आश्वासित केले.
महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपीन श्रीमाळी यांनी महाप्रित स्थापनेमागचा उद्देश, महाप्रित अंतर्गत कार्यरत व्हर्टीकल्स तसेच उर्जा लेखापरिक्षण, पर्यावरण, ग्रीन हायड्रोजन, बॅटरीज, कार्बन क्रेडीट, बायो सीएनजी, डाटा सेंटर अशा विविध नवीन तंत्रज्ञानाबाबत आणि सामाजिक दायित्वाच्या अनुषंगाने महाप्रित व म.फु.मा.वि.महामंडळ करत असलेल्या विविध योजना, प्रकल्प, संकल्प याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच महाप्रित तर्फे सध्या हाती घेतलेले व प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात उपस्थित विविध मान्यवर, अधिकारी / कर्मचारी यांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ञांमार्फत उत्तरे देण्यात आली.
कार्यक्रमाच्या समारोपीय भाषणात श्री. स्वाधिन क्षत्रिय यांनी संपूर्ण कार्यक्रमाबाबत त्यांची असणारी तज्ञ मते चर्चासत्रामध्ये मांडली. ज्यामध्ये इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशनच्या अनुषंगाने सर्वच विभागांनी महाप्रितला सहकार्य करावे असेही आव्हान केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्री (MCHI) ने इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशनच्या बाबतीत कशा प्रकारे विविध विकासकांच्या प्रकल्पामध्ये काम करता येईल, याबाबत निश्चित धोरण ठरवावे असे सूचित केले. तसेच महाप्रितच्या विविध प्रस्तावित व चालू असलेल्या प्रकल्पाची समाजउपयोगिता मोठी असल्यामुळे त्याबाबात महाप्रितचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक व अधिकारी / कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या समारोपामध्ये श्री. सुभाष नागे यांनी आभार प्रदर्शन केले.ends (GNI)
Be the first to comment on "मुंबई शहरात 134 ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या पायाभूत सुविधा उभारण्याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशन क्लब, वांद्रे येथे चर्चासत्र संपन्न"