धर्मेन्‍द्र प्रधान यांच्‍या हस्‍ते एसडीआय भुवनेश्‍वर येथे भारतातील पहिले स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटरचे उद्घाटन

भारताला जगाची स्किल कॅपिटल बनवण्‍याच्‍या मनसुब्‍यासह आंतरराष्‍ट्रीय मानकांनुसार कौशल्‍य प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्‍यसाठी तीन नवीन जागतिक दर्जाच्‍या सुविधांची स्‍थापना

  • स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर
  • नॅशनल अकॅडमी फॉर स्किल टीचर्स अॅण्‍ड असेसर्स

नवी दिल्‍ली/भुवनेश्‍वर, १६ एप्रिल २०२२ (GNI): भारताला जगाची स्किल कॅपिटल बनवण्‍याच्‍या पंतप्रधानांच्‍या दृष्टीकोनाशी बांधील राहत माननीय कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्री आणि शिक्षण मंत्री श्री. धर्मेन्‍द्र प्रधान यांनी आज घोषणा केली की, स्किल डेव्‍हलपमेंट इन्स्टिट्यूट (एसडीआय), भुवनेश्‍वर आणि एनएसडीसी इंटरनॅशनल (एनएसडीसीआय) यांच्‍यासोबत सहयोगाने एसडीआय भुवनेश्‍वर येथे स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर स्‍थापित करण्‍यात येईल. कुशल कर्मचारीवर्गाला परदेशात काम करण्‍याची संधी देण्‍याच्‍या उद्देशासह भारतीय तरूणांना आंतरराष्‍ट्रीय मानकांनुसार प्रशिक्षण देण्‍याकरिता हे सेंटर स्‍थापित करण्‍यात येईल.

श्री. प्रधान यांनी नॅशनल अकॅडमी फॉर स्किल टीचर्स देखील लाँच केले, जे शिक्षक व मूल्‍यांकनकर्त्‍यांच्‍या कौशल्‍य प्रशिक्षणासाठी एसडीआय कॅम्‍पस् येथे स्‍थापित करण्‍यात येईल.

माननीय मंत्री श्री. धर्मेन्‍द्र प्रधान, ओएसडीएचे अध्‍यक्ष श्री. सुब्रोतो बागची आणि एसडीआय, भुवनेश्‍वरचे अध्‍यक्ष व आयओसीएलचे संचालक (एचआर) श्री. रंजन कुमार मोहपात्रा यांच्‍या उपस्थितीत एनएसडीसीचे सीओओ व ऑफिसिएटिंग सीईओ श्री. वेद मनी तिवारी आणि एसडीआय भुवनेश्‍वरचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. संजय श्रीवास्‍तव यांनी सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्ष-या केल्‍या. या सहयोगांतर्गत भारतीय तरूणांना, विशेषत: परदेशात काम करण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या ओडिशामधील इच्‍छुकांना उच्‍च दर्जाचे प्रशिक्षण देण्‍यासाठी स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर स्‍थापित करण्‍यात येईल. या सेंटरमध्‍ये यूएई, कॅनडा, ऑस्‍ट्रेलिया व इतर जीसीसी प्रदेश अशा देशांमधील आंतरराष्‍ट्रीय कंपन्‍यांच्‍या मागणीनुसार कौशल्‍ये देण्‍याकरिता प्रशिक्षण सुविधांचा समावेश असेल. स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्‍ये इतर देशांमधील कुशल व प्रमाणित कर्मचारीवर्गाचा पुरवठा करण्‍याकरिता सहयोगी संस्‍था व विदेशी रिक्रूटर्सचे व्‍यापक नेटवर्क देखील असेल. या सहयोगी संस्‍था परदेशातील बाजारपेठांमधून होणा-या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी एनएसडीसी व एसडीआयसोबत काम करतील. सेंटरमध्‍ये एकत्रीकरण, समुपदेशन, कौशल्य प्रशिक्षण, प्री-डिपार्चर ओरिएंटेशन, परदेशी भाषा प्रशिक्षण, प्लेसमेंट आणि इमिग्रेशन व पोस्ट-प्लेसमेंट सपोर्ट अशा सेवा असतील.

ओडिशापासून इतर देशांमधील कुशल व प्रमाणित कर्मचारीवर्गासाठी आंतरराष्‍ट्रीय कर्मचारीवर्ग गतीशीलतेला चालना देण्‍यासाठी एनएसडीसीआय व ओडिशा स्किल डेव्‍हलपमेंट ऑथोरिटी (ओएसडीए) यांनी सहकार्य करार केला. एनएसडीसीआय विविध देशांमधून होणा-या मागणीची पूर्तता करण्‍यामध्‍ये मदत करेल, तसेच राज्‍याच्‍या क्षमता निर्माणामध्‍ये मदत करेल आणि ओएसडीए जागरूकता, परदेशात काम करण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या उमेदवारांचे प्रशिक्षण व अर्थसाह्यामध्‍ये पाठिंबा देईल.

शिक्षण मंत्री आणि कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्री श्री. धर्मेन्‍द्र प्रधान म्‍हणाले, ”परदेशातील कंपन्‍या व कुशल भारतीय तरूणांमधील पोकळी भरून काढणारे स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर हे ओडिशामधून आंतरराष्‍ट्रीय कर्मचारीवर्ग गतीशीलतेला चालना देण्‍याच्‍या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. एसडीआय येथे आंतरराष्‍ट्रीय प्रशिक्षण केंद्र आणि दोन जागतिक दर्जाच्‍या राष्‍ट्रीय शैक्षणिक संस्‍था देशातील मागणीची पूर्तता करण्‍यासोबत भारताला जगातील कर्मचारीवर्गाचा अग्रगण्‍य प्रदाता म्‍हणून दर्शवणारा कर्मचारीवर्ग विकसित करण्‍याच्‍या भारताच्‍या दृष्टीकोनाला अधिक चालना देतील.” 

श्री. प्रधान पुढे म्‍हणाले, ”जागतिक लेबर मोबिलिटी व डिजिटल परिवर्तन एकवीसाव्‍या शतकातील विकासाचे स्रोत असतील. कामाच्‍या धोरणांमध्‍ये जागतिक बदल होत असताना भारतातील तरूणांसाठी व्‍यापक संधी आहेत. भारतातील स्किलिंगमध्‍ये काही मोठ्या सुधारणा व धोरण हस्‍तक्षेप पाहायला मिळत आहेत, जे देशातील कर्मचारीवर्गाला उत्‍साहित करण्‍यासोबत चालना देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आम्‍ही हीच गती कायम ठेवण्‍याप्रती कटिबद्ध आहोत आणि दर्जा वाढवणारी व मागणी-संचालित विद्यार्थी-केंद्रित कौशल्‍य परिसंस्‍था निर्माण करण्‍यावर लक्ष केंद्रित करत आहोत. माझा विश्‍वास आहे की, आंतरराष्‍ट्रीय गतीशीलतेवर लक्ष केंद्रित करणारे असे प्रबळ सहयोग व कौशल्‍य विकास उपक्रम भारतीय तरूणांना भावी कामासाठी सुसज्‍ज करतील आणि जागतिक अर्थव्‍यवस्‍थेला नवसंजीवनी देतील.”

स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर व्‍यतिरिक्‍त एसडीआय, भुवनेश्‍वर येथे आणखी एक अकॅडमी स्‍थापित करण्‍यात येईल. नॅशनल अकॅडमी फॉर स्किल टीचर्सची स्‍थापना करण्‍यात येईल, जी उद्योगक्षेत्राच्‍या उदयोन्‍मुख गरजांनुसार शिक्षक व मूल्‍यांकनकर्त्‍यांना कौशल्‍य देईल. या अकॅडमीमध्‍ये दर्जेदार प्रशिक्षण प्रोग्राम्‍स देण्‍यासाठी सर्वोत्तम सुविधा, पायाभूत सुविधा, उपकरण असतील. अकॅडमी अध्‍यापन व कौशल्‍य वितरणामधील उदयोन्‍मुख ट्रेण्‍ड्सचे प्रभाव ओळण्‍यासोबत मूल्‍यांकन करेल आणि कौशल्‍य प्रशिक्षण कर्मचारीवर्गाला उदयोन्‍मुख रोजगारांसाठी सुसज्‍ज करेल.

याप्रसंगी परदेशात प्रशिक्षित, कुशल व प्रमाणित भारतीय कर्मचारीवर्गाच्‍या गतीशीलतेला चालना देण्‍याच्‍या उद्देशाने भारतभरात व जगभरात स्किलिंग व प्रशिक्षण हब्‍स स्‍थापित करण्‍याच्‍या दिशेने सहयोगाने काम करण्‍यासाठी एनएसडीसीआयचे संचालक श्री. वेद मनी तिवारी आणि ईएफएस फॅसिलिटीज ग्रुपचे अध्‍यक्ष श्री. तारिक चौहान यांनी एमओयूवर स्‍वाक्ष-या केल्‍या. ईएफएस फॅसिलिटीज ग्रुप एमईएनएएसए (मिडल ईस्‍ट, नॉर्थ आफ्रिका व साऊथ आफ्रिका) प्रांतामधील एकीकृत सुविधा व्‍यवस्‍थापन सेवा, कार्यसंचालन व देखरेख सोल्‍यूशन प्रदाता आहे. ईएफएसला मिडल ईस्‍ट सुविधा व्‍यवस्‍थापनाचा दशकाचा अनुभव आहे आणि त्‍यांची प्रदेशामध्‍ये, तसेच स्‍थानिक बाजारपेठांमध्‍ये सर्वोत्तम सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍याची कार्यरत क्षमता आहे.

कार्यक्रमाप्रसंगी विविध यूएई कंपन्‍यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यूएसईमधील बहुविभागीय व्यवसाय समूह ईएएसए सालेह अल गर्ग, यूएईमधील अग्रगण्‍य बांधकाम कंपनी खानसाहेब, सुस्‍थापित मॅनपॉवर सोर्सिंग कंपनी रिलायण्‍ट एचआर कन्‍सल्‍टन्सी आणि यूएसईतील प्‍लंबिंग सेवा प्रदाता ईएसपीए यांनी देखील एमओयूंवर स्‍वाक्ष-या केल्‍या.   

परिशिष्‍ट

नॅशनल स्किल डेव्‍हलपमेंट कॉर्पोरेशन बाबत 

नॅशनल स्किल डेव्‍हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) ही मिनिस्‍ट्री ऑफ स्किल डेव्‍हलपमेंट अॅण्‍ड आंत्रेप्रीन्‍युअरशीप (एमएसडीई), भारत सरकार अंतर्गत कार्यरत असलेली अनोखी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) कंपनी आहे. भारतामध्‍ये दर्जेदार व्‍यावसायिक प्रशिक्षण इकोप्रणालीच्‍या निर्मितीला चालना देण्‍याचा या कंपनीचा मनसुबा आहे. २०१० मध्‍ये स्‍थापना केल्‍यापासून एनएसडीसीने ६०० हून अधिक प्रशिक्षण भागीदार, देशभरातील ६०० हून अधिक जिल्‍ह्यांमध्‍ये पसरलेले ११,००० हून अधिक प्रशिक्षण केंद्रांच्‍या व्‍यापक प्रबळ नेटवर्कच्‍या माध्‍यमातून ३ कोटीहून अधिक लोकांना प्रशिक्षित केले आहे. एनएसडीसीने ३७ सेक्‍टर स्किल कौन्सिल्‍स (एसएससी) स्‍थापित केले आहेत आणि सरकारच्‍या प्रमुख कौशल्‍य विकास योजनांची अंमलबजावणी देखील करत आहे, जसे प्रधानमंत्री कौशल्‍य विकास योजना (पीएमकेव्‍हीवाय), प्रधानमंत्री कौशल्‍य केंद्र (पीएमकेके), नॅशनल अॅप्रेन्टिसशीप प्रमोशन स्किम (एनएपीएस).

एनएसडीसी इंटरनॅशनल लि. नॅशनल स्किल डेव्‍हलपमेंट कॉर्पोरेशनची उपकंपनी आहे. जी भारताला जगाची स्किल कॅपिटल बनवण्‍याच्‍या स्किल इंडिया इंटरनॅशनल मिशनला चालना देत आहे. जगभरातील कुशल आणि प्रमाणित कर्मचा-यांच्या सोर्सिंगसाठी भारताला पसंतीचा सहयोगी देश बनवण्‍याचा दृष्टीकोन आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बेंचमार्क गुणवत्ता कौशल्य परिसंस्‍था तयार करणे आणि दर्जेदार प्रतिभेसाठी जागतिक प्रदाता म्हणून त्याचे स्थान मजबूत करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनी निवासी भारतीयांसाठी जागतिक नोकरीच्या संधी आणि परदेशातील भारतीयांसाठी जागतिक करिअर गतिशीलता देते. 

स्किल इंडिया इंटरनॅशनल – यूएई बाजारपेठेसाठी प्रकल्‍प तेजस

पुढील ५ वर्षांमध्‍ये भारतीयांसाठी जवळपास ३.६ दशलक्ष नोकरींच्‍या संधी आहेत, ज्‍यापैकी ७० टक्‍के नोक-या जीसीसी देशांमधील आहेत आणि उर्वरित युरोप, ऑस्‍ट्रेलिया, कॅनडा, जपान, फार ईस्‍ट रशिया व मलेशियामधील आहेत. मिनिस्‍ट्री ऑफ स्किल डेव्‍हलपमेंट अॅण्‍ड आंत्रेप्रीन्‍युअरशीप अंतर्गत काम करणा-या एनएसडीसीची उपकंपनी एनएसडीसी इंटरनॅशनल भारतीय कर्मचारीवर्गाच्‍या पदेशातील गतीशीलतेसाठी आंतरराष्‍ट्रीय स्‍तरीय बेंचमार्क कौशल्ये परिसंस्‍था सक्षम करत आहे.

गेल्‍या महिन्‍यामध्‍ये एनएसडीसी इंटरनॅशनलने यूएसईमध्‍ये प्रकल्‍प तेजस सुरू केला. हा प्रकल्‍प यूएसईमध्‍ये स्‍पर्धात्‍मक व प्रमाणित कर्मचा-यांना नोकरी मिळण्‍याची खात्री घेण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. या प्रकल्‍पाचा विद्यमान कौशल्‍य विकास उपक्रमांना व्यापून घेण्‍याचा आणि केंद्र व राज्‍य सरकारअंतर्गत कार्यरत असलेल्‍या भारतातील प्रशिक्षण पायाभूत सुविधा जसे स्किल इंडियाज इंटरनॅशनल स्किलिंग सेंटर नेटवर्क, प्रधानमंत्री कौशल केंद्रे (पीएमकेके), इंडस्‍ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स (आयटीआय), इतर कौशल्‍य प्रशिक्षण संस्‍था (खाजगी/सार्वजनिक) यांचा लाभ घेण्‍याचा मनुसबा आहे, ज्‍याद्वारे संभाव्‍य उमेदवारांचे सोर्सिंग व पुरवठ्याची खात्री मिळेल. या उपक्रमाचा उद्देश महत्त्वाकांक्षी आहे, तसेच हा उपक्रम कौशल्‍य विकास संस्‍थांच्‍या नेटवर्कमधील सर्वोत्तम प्रतिभावान व्‍यक्‍तींना ही संधी मिळण्‍याची खात्री घेईल.enfs

Be the first to comment on "धर्मेन्‍द्र प्रधान यांच्‍या हस्‍ते एसडीआय भुवनेश्‍वर येथे भारतातील पहिले स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटरचे उद्घाटन"

Leave a comment

Your email address will not be published.


*