मुंबई,११ एप्रिल २०२२ (GNI): भारतीय खाद्यपदार्थ जगभरात नावाजले जातात ते त्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे. वैशिष्ट्यपूर्ण मसाले हेच भारतीय स्वयंपाकघराचे वेगळेपण आहे. मसाले हाच भारतीय व्यंजनांतील महत्वाचा घटक आहे. आणि त्याचे उत्पादन संपूर्ण भारतीय उपखंडात वेगवेगळ्या स्वरूपात घेतले जाते. भारतीयांची चव ओळखून डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुप ऑफ कंपनीज यांनी भारतीय किचनसाठी वेगवेगळी उत्पादने सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांसाठी सादर केली आहेत. डार्विन रिटेलर्स यांनी अलीकडेच “डीपी रिटेल मसाला” या ब्रॅण्डखाली अस्सल आणि प्रिमिअम दर्जाचे मसाले बाजारपेठेत आणले आहेत.
हे मसाले सर्वोत्तम दर्जाचा कच्चा माल वापरून बनविण्यात आले आहेत. अस्सल स्थानिक चव देण्यासाठी त्याचे योग्य प्रमाणात मिश्रण करून त्यांच्यावर भारतीय पद्धतीने प्रक्रिया करण्यात आली आहे. मसाल्यांचा वास आणि चव दीर्घकाळ कायम राहावी यासाठी हे मसाले छोट्या बॅचेसमध्ये आणि बरण्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नव्या आणि सध्या लोकप्रिय असलेल्या चवी वेगळ्या पद्धतीने ग्राहकापर्यंत पोहोचवणे हा ध्यास असलेल्या डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुपच्या डीपी रिटेल मसाला या नव्या ब्रॅंडने नव्या युगातील मसाल्यांची श्रेणी बाजारपेठेत दाखल केली आहे.
हे मसाले डीपी रिटेल यांचे इ कॉमर्स व्यासपीठ www.darwinpil.in येथे आणि त्यांचे प्रमुख स्टोअर्स “डीपी रिटेल्स” मध्ये उपलब्ध आहेत. “प्रत्येक प्रदेशाची चव लक्षात घेऊन डीपी मसाला या ब्रँडनेम खाली सदर मसाले भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे हा आमचा ध्यास आहे. हे उत्पादन बाजारात सादर करताना किराणा उत्पादनात आमचा प्रवेश करण्यासाठीचे प्रयत्न विशेषत्वाने लक्षात घेतले आहेत”, असे डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुप ऑफ कंपनीजचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजा रॉय चौधरी यांनी सांगितले.
“आता आमच्याकडे खाद्यपदार्थांची चव वाढवणारा सर्वोत्तम घटक उपलब्ध आहे, आणि आमचे हे उत्पादन स्पर्धक उत्पादनांवर निश्चित मात करील. मसाल्यांच्या पदार्थांमधील तसेच कुकिंग पेस्टमधील आमची उत्पादने हे अन्नप्रक्रिया उद्योगातील बहुप्रतीक्षित नावीन्य आहे”, असेही चौधरी म्हणाले.
डीपी मिक्स मसाला स्प्रिंकलर पॉवडर स्वरूपात उपलब्ध आहे. ज्यामुळे प्रत्येक ग्राहकाला दैनंदिन स्वयंपाकात त्याचा वापर करणे अधिक सुलभ होते. तिखट पदार्थ आवडणाऱ्या प्रत्येक खवय्याने आपल्या अन्नपदार्थांवर मसाल्यांचा शिडकाव केला तरी उत्तम चव मिळते. डीबी मसाला मिक्समध्ये सर्व प्रकारच्या भारतीय चवी उपलब्ध आहेत.
सध्या डीपी मसाले वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध आहेत त्यात गरम मसाला, भाजी मसाला, हिंग पावडर, चिकन मसाला, चणा मसाला, पाणीपुरी मसाला, शाही बिर्याणी मसाला, चहा मसाला आदी आणि हळद, लाल मिरची पावडर, धणेपूड, मिरीपूड अशा स्वरूपात उपलब्ध आहे.
डीपीजीसी बद्दल: १९९६ साली स्थापन झालेल्या डीपीजीसीचे निव्वळ मत्ता मूल्य ८. ४ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके आहे आणि त्यांच्या २९ सहयोगी कंपन्या आहेत. अनेक वर्षांपासून हा समूह श्री अजय हरिनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रांत सहयोगी कंपन्यांच्या साहाय्याने प्रगती करीत आहे. सहयोगी कंपन्यांमध्ये डार्विन प्लॅटफॉर्म इंडस्ट्रीज, डार्विन प्लॅटफॉर्म रिफायनरीज, आणि डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर यांचा समावेश आहे. याशिवाय हा समूह आपल्या उपकंपन्या आणि सहयोगी कंपन्यांच्या साहाय्याने बँकिंग, विमा, आरोग्य, संरक्षण, बांधकाम, ऊर्जा, माध्यमे आणि आयटी उद्योगात कार्यरत आहे. ४० लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि दिल्ली आणि चंदिगढ अशा केंद्रशासित प्रदेशांसह प्रत्येक राज्यात उत्पन्न वाढीच्या संधी निर्माण करणे हे समूहाचे उद्दिष्ट्य आहे. “अखंड भारत आत्मनिर्भर योजना” हे डार्विनचे ब्रीद आहे. Ends
Be the first to comment on "डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुपकडून भारतीय स्वयंपाकघरांसाठी नवे मसाले : डीपी रिटेल मसाले, हे मसाले डीपी रिटेलचे इ कॉमर्स व्यासपीठ www.darwinpil.in येथे तसेच “डीपी रिटेल” स्टोअर मध्येही उपलब्ध"