मुंबई, ११ एप्रिल २०२२: एस्ट्राझेनेका या आघाडीच्या विज्ञानावर आधारित काम करणाऱ्या बायो-फार्मास्युटिकल कंपनीची उपकंपनी असलेल्या एस्ट्राझेनेका इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने द-अक्षय पात्र फाऊंडेशन सोबत भागीदारी केली असून त्यामार्फत ५००० ‘शक्ती किट्स’ चे वाटप करण्यात येणार आहे. ‘शक्ती किट्स’ ऍनिमिक गर्भवती व स्तनपान करवणाऱ्या महिलांना आवश्यक पोषणात्मक पूरक घटक पुरवण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आली आहेत. या किट्समध्ये गहू, हिरवी मूग डाळ, नाचणी, सोया प्रोटीन कॉन्सन्ट्रेट, शेंगदाणे व साखर यांचा समावेश असून या सर्व पदार्थांमध्ये जीवनसत्त्वे व खनिजे यांचा समावेश आहे. लहान बाळांना पोषणाचे लाभ मिळावेत यासाठी देखील वापरता येण्याच्या दृष्टीने ही किट्स खास पद्धतीने तयार करण्यात आली आहेत. सहयोगी दृष्टिकोनातून ही भागीदारी काम करणार असल्याने देशातील इतर भागांमधील गर्भवती व स्तनपान करवणाऱ्या महिलांना देखील हे ‘शक्ती किट्स’ उपलब्ध होऊ शकतील.
श्री. संदीप तलवार, सीएमओ, द अक्षय पात्र फाऊंडेशनच (टीएपीएफ) यांनी सांगितले, “मुलांमधील कुपोषण दूर करण्यासाठीच्या आमच्या उपक्रमामध्ये साथ देत असल्याबद्दल आम्ही एस्ट्राझेनेकाचे आभारी आहोत. कुपोषणाची व्याधी अगदी मुळापासूनच म्हणजे मूल जन्माला येण्याआधीपासून दूर केली जावी हा आमचा उद्देश आहे. देशाचे निरोगी भविष्य घडवण्यासाठी स्वतःचे आरोग्य नीट राखून सुदृढ बालकांना जन्म देण्यासाठी गर्भवती व स्तनपान करवणाऱ्या महिलांना आवश्यक पोषण मूल्ये पुरवण्यात आम्हाला एस्ट्राझेनेकासोबत भागीदारीची मोलाची मदत होईल. या मदतीमुळे सर्वांना समान आरोग्यसेवा संधी पुरवता येतील.”
एस्ट्राझेनेका इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींना पोषण आणि आरोग्यसेवा उपलब्ध करवून दिल्या जाव्यात हे आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी द अक्षय पात्र फाऊंडेशनच्या उपक्रमाला ४१२५००० रुपयांची मदत केली आहे. प्रत्येक ‘शक्ती किट’ ८२५ रुपयांचे असून त्यामध्ये लोहयुक्त आयुर्वेदिक सप्लिमेंट्स, तीन स्तरांचे फेस मास्क्स व माल्टवर आधारित प्रोटीन मिक्स यांचा समावेश आहे. या किटमध्ये लहान बाळांसाठी एक विशेष आरोग्य सप्लिमेंट देखील आहे ज्यामुळे लाभार्थींना जीवनसत्त्वांच्या कमतरतेसह कुपोषणाशी समस्यांचा सामना करण्यात मदत मिळेल.
श्री. शिवा पद्मनाभन, व्यवस्थापकीय संचालक, एस्ट्राझेनेका इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी सांगितले, “एस्ट्राझेनेकामध्ये आम्ही असे मानतो की, आपले भविष्य निरोगी व्यक्ती, निरोगी समाज व निरोगी पृथ्वीवर अवलंबून आहे. हे तीनही घटक एकमेकांशी जोडलेले आहेत आणि शाश्वत भविष्य निर्माण करणे ही आपल्या सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे. द-अक्षय पात्र फाऊंडेशनसारख्या संस्थांसोबत भागीदारी करून काम केल्याने हे शक्य आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीची त्यांची तळमळ आणि आमचा समान दृष्टिकोन यामुळे ही भागीदारी अधिक जास्त अर्थपूर्ण व समृद्ध झाली आहे. या भागीदारीमुळे आम्ही भारतातून भूकमारी व बाल कुपोषणाच्या समस्या कायमच्या दूर करण्याच्या आमच्या एकत्रित उद्दिष्टाच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल पुढे आलो आहोत.”ends
Be the first to comment on "गर्भवती व स्तनपान करणाऱ्या मातांना ‘शक्ती किट्स’ पुरवणार‘ एस्ट्राझेनेका-अक्षय पात्र’ ची भागीदारी"