मुंबई, ७ एप्रिल २०२२ (जीएनआई): टाटा डिजिटलने आज आपले बहुप्रतीक्षित सुपर-ऍप टाटा नेउचा शुभारंभ केला.टाटा समूहाच्या या सुपर-ऍपमध्ये उत्पादन व्यापार, सेवा व्यापार आणि आर्थिक सेवा यांना एकत्र आणून ग्राहककेंद्री, भविष्यासाठी सज्ज व एकात्मिक अनुभव प्रदान करण्यात आला आहे. फॅशनपासून फायनान्सपर्यंत, गॅजेट्सपासून वाणसामानापर्यंत, हॉटेल्सपासून आरोग्यापर्यंत आणि तंत्रज्ञानापासून प्रवासापर्यंत – टाटा नेउमध्ये टाटा समूहातील विविध ग्राहक ब्रँड्सची शक्ती एकत्र करून ग्राहकांना एक आगळावेगळा, अधिक चांगला अनुभव देण्यात आला आहे. टाटा नेउ म्हणजे ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करणारे वन-स्टॉप डेस्टिनेशन आहे. या सुपर-ऍपवर युपीआय, बिलांचा भरणा, कर्ज आणि विम्यासहित अनेक आर्थिक सेवांचा देखील लाभ घेता येईल.
टाटा नेउमार्फत करण्यात आलेल्या प्रत्येक खरेदीसोबत, डायनिंग तसेच प्रवासासोबत मेंबर्सना ५% किंवा त्यापेक्षा जास्त नेउकॉईन्स मिळतील. १ नेउकॉईनचे मूल्य ₹१ आहे. ग्राहक सर्व विभागांमध्ये त्यांना हवे तितके, अमर्याद नेउकॉईन्स कमवू शकतील आणि कोणत्याही विभागात ते खर्च देखील करू शकतील. नेउपास मेंबर्सना इतरही अनेक लाभ मिळतील, यामध्ये निःशुल्क घरपोच सेवा, विशेष ऑफर्स, बिल्ट-इन क्रेडिट लाईन, नवीन सादर केल्या जाणाऱ्या उत्पादनांचा लाभ इतरांच्या आधी घेता येण्याची सुविधा आणि ब्रँड्सकडून दिल्या जाणाऱ्या लाभांचा समावेश असेल.
श्री. एन चंद्रशेखरन, अध्यक्ष, टाटा सन्स यांनी सांगितले, “डिजिटल जगासाठी व्यवसायांमध्ये परिवाराने घडवून आणण्यावर आणि ग्राहकांना सर्वसमावेशक अनुभव प्रदान करू शकेल असा एकात्मिक मंच तयार करून त्यांना त्याठिकाणी एकत्र आणण्यावर आम्ही आमचे लक्ष केंद्रित केले आहे. टाटा नेउमार्फत आम्ही भारतीय ग्राहकांचे जीवन सहजसोपे, सुविधाजनक बनवण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी काम करत आहोत. आपल्या पसंतीची उत्पादने निवडण्याची शक्ती, सहजसोपा अनुभव आणि विश्वास, इमानदारी हे टाटा नेउचे केंद्रबिंदू आहेत ज्यांच्या आधारे भारतीय ग्राहकांना प्रभावी, शक्तिशाली वन टाटा अनुभव प्रदान केला जाईल.”
श्री मुकेश बन्सल, अध्यक्ष, टाटा डिजिटल यांनी सांगितले, “प्रत्येक श्रेणीमध्ये खरेदी, वापर यांच्या पद्धती आणि ग्राहकांच्या सवयी यामध्ये होत असलेल्या नवीन बदलांसह पुढील दशकात भारतीय डिजिटल इकोसिस्टिम खूप मोठ्या विकासासाठी सज्ज आहे. डिजिटल परिवर्तनाचे अभूतपूर्व स्तर आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्यावर ग्राहकांचा खूप जास्त प्रभाव असेल. या बदलामध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्याला आकार देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, ज्यासाठी आम्ही बाजारपेठेत नवीन बिझनेस मॉडेल्स व अनोखे उपक्रम आणत राहू.”
टाटा समूहाचे नवीन सुपर-ऍप टाटा नेउ भारतीय बाजारपेठेमध्ये उत्पादने आणि सेवांची एक मोठी निवड श्रेणी प्रदान करते. सध्या टाटा नेउवर एअरएशिया इंडिया, बिगबास्केट, क्रोमा, आयएचसीएल, क्युमिन, स्टारबक्स, टाटा १एमजी, टाटा क्लिक, टाटा प्ले आणि वेस्टसाइड यांच्यासह अनेक ब्रँड्स सहभागी आहेत. जसजसे अधिकाधिक ब्रँड्स व श्रेणी या ऍपवर येत जातील तसतसे हे ऍप वाढत जाईल. टाटा नेउ ऍप अँड्रॉइड, आयओएस आणि TataDigital.com वर उपलब्ध आहे. End
Be the first to comment on "टाटांचे सुपर-ऍप ‘टाटा नेउ’ बाजारात दाखल, ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करणारे वन-स्टॉप डेस्टिनेशन म्हणजे ‘टाटा नेउ’"