मुंबईतील ‘बेस्ट इलेक्ट्रिसिटी’च्या कॅश काउंटर्सच्या डिजिटलीकरणासाठी ‘एक्सपे.लाइफ’ची ‘एनबीबीएल’शी भागीदारी ‘बेस्ट’च्या ग्राहकांना वीजबिल भरणे सुरळीत व सुलभ व्हावे, यासाठी विशेष उपक्रम


मुंबई, ७ एप्रिल, २०२२ (जीऐनआई): ‘बेस्ट’च्या कॅश काउंटर्सचे डिजिटल पद्धतीने रुपांतर घडविण्यासाठी ‘एनपीसीएल भारत बिलपे लि.’ (एनबीबीएल) या कंपनीशी एक्सपे.लाइफ या नवोदित कंपनीने हातमिळवणी केली आहे. ‘एनबीबीएल’ ही ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. या उपक्रमामुळे ‘बेस्ट’च्या लाखो ग्राहकांना आता वीजबिल भरणे सुरळीत व सुलभ होईल. ‘बेस्ट’चा ‘बीओसीपी’ (बिलर्स ओन कलेक्शन पॉइंट) हा विभाग आता पूर्णपणे डिजिटल होईल. वीजबिल भरणे व इतर सोयी-सुविधांसाठीची पेमेंट्स करणे हे ग्राहकांना आता यूजर-फ्रेंडली स्वरुपात करता येणार आहे.
‘एनबीबीएल’च्या सहकार्याने होणाऱ्या या डिजिटलीकरणामुळे ग्राहकांना पेमेंट करण्याच्या तीन पद्धती उपलब्ध होणार आहेत. ‘बेस्ट’च्या निवडक कॅश काउंटर्सवर ‘इंटेलिजन्ट पॉइंट ऑफ सेल्स मशीन्स’ उपलब्ध असणे, ही यातील पहिली पद्धत असेल. या ठिकाणी ग्राहक रोख अथवा यूपीआय अशा कोणत्याही पेमेंट पद्धतीद्वारे आपल्या बिलाचे पेसे भरू शकतील. येथे ग्राहकांना त्वरीत पावती मिळेल आणि हा व्यवहार १० सेकंदांपेक्षा कमी वेळात पूर्ण होईल.
दुसऱ्या पद्धतीमध्ये, ‘बेस्ट’च्या वेगवेगळ्या जागांवर ‘टच स्क्रीन किऑस्क’ बसविण्यात येतील. तेथे पैसे भरण्याकरीता ग्राहकांना स्वतःची वेळ आणि पेमेंटची पद्धत निवडता येईल. या किऑस्कमध्ये बनावट नोटा ओळखण्यासाठी ‘कॅश व्हॅलिडेटर’ उपलब्ध असेल. ‘भारत बिलपे प्लॅटफॉर्म’वरून चालविण्यात येणाऱ्या या किऑस्कमध्ये ग्राहकांना व्यवहार करण्यासाठीची सुरक्षितताही लाभेल.
पेमेंटचा तिसरा पर्याय अतिशय नाविन्यपूर्ण आहे. ‘बेस्ट’ची काउंटर्स ग्राहकाच्या दारात नेऊन त्याला सेवा देण्याचा उद्देश यामध्ये बाळगण्यात आला आहे. ‘एक्सपे.लाइफ’ची मोबाइल व्हॅन याकरीता ‘बेस्ट’साठी तैनात करण्यात आलेली आहे. ती आठवड्यातील काही ठराविक दिवशी ग्राहकांच्या वास्तव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाईल. या व्हॅनमध्ये ‘टच स्क्रीन किऑस्क’ आणि ‘मोबाइल पीओएस’ या सुविधा बसविण्यात आलेल्या आहेत. त्यांमधून ग्राहक आपले पेमेंट करू शकतील. ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण होतील, अशी सेवांची पूर्ण व्याप्ती असलेल्या या ‘एक्सपे.लाइफ मोबाईल व्हॅन’मध्ये वीजबिल संकलनाचीही सुविधा असणार आहे. इतर अनेक सेवा या व्हॅनमध्ये लवकरच सुरू केल्या जातील. या ‘बेस्ट मोबाईल व्हॅन’चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, तीमधील सर्व यंत्रे सौरऊर्जेवर व ‘यूपीएस’वर चालतात. ही व्हॅन चालू लागते, त्यावेळी हा यूपीएस चार्ज होत राहतो. हा खरोखरच हरीत स्वरुपाचा उपक्रम आहे.
या सर्व ठिकाणी ग्राहकांना ‘बेस्ट’ची बिले तर भरता येणारच आहेत, त्याशिवाय, एलपीजी गॅस नोंदणी, मोबाईल फोनचे बिल भरणे, विम्याचा हप्ता भरणे, ‘डीटीएच’चे रिचार्ज आणि इतर अनेक सुविधांचा अनुभव घेता येणार आहे.
यावेळी बोलताना, ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा, आयएएस, म्हणाले, “भारत बिलपे’ आणि ‘एक्सपे.लाइफ’ यांच्याशी भागीदारी करून, पेमेंटच्या विविध, नाविन्यपूर्ण पद्धतींद्वारे आणि सोयीस्कर, सुलभ आणि सुरक्षित रितीने वीजबिल भरण्याचा एक अनोखा मार्ग आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. बिल भरण्याच्या डिजिटलीकरणामुळे ‘बेस्ट’च्या 10.4 लाखांहून अधिक ग्राहकांना आपल्या आवडीच्या पद्धतीचा वापर करून वीजबिलाचे व्यवस्थापन करण्याचा लाभ घेता येणार आहे.”
या उपक्रमाविषयी माहिती देताना ‘एनपीसीआय भारत बिलपे लि.’च्या (एनबीबीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी नूपूर चतुर्वेदी म्हणाल्या, “या भागीदारीचा एक अविभाज्य भाग असल्याचा आम्हाला आनंद होत आहे. या उपक्रमामुळे ‘बेस्ट’च्या अनेक ग्राहकांना उत्कृष्ट प्रकारचा व यूजर-फ्रेंडली स्वरुपाचा वीजबिल भरण्याचा अनुभव मिळणार आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे वीज बिल भरल्याचे पैसे डिजिटल स्वरुपात संकलित होतील आणि ‘बेस्ट’ला ते खूप सोयीस्कर पडेल. आमचा ठाम विश्वास आहे की हा उपक्रम युटिलिटी बिल पेमेंट करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणेल.”

‘एक्सपे.लाइफ’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कुमार म्हणाले, “आम्ही देशातील सर्वात उद्यमशील फिनटेक स्टार्ट-अप्सपैकी एक आहोत. सुरक्षित व्यवहार आणि नवकल्पना यांच्या माध्यमातून आपले जीवनमान सोपे करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. आमची ‘इंटेलिजन्ट पीओएस मशीन्स’ व मोबाईल व्हॅन्स या आमच्या सर्वात नाविन्यपूर्ण आणि अर्थपूर्ण गोष्टी आहेत. बेस्ट व एनबीबीएल यांच्या भागीदारीत त्या सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत. डिजिटल इंडियाला पाठिंबा देण्याच्या दिशेने आम्ही करीत असलेल्या प्रयत्नांची ही केवळ सुरुवात आहे. लवकरच देशातील इतर सर्व ‘एसकॉम्स’मध्ये या अशाच सेवांचा विस्तार आम्ही करणार आहोत.”

About XPay.Life is a one stop destination for Digital Payment Solutions. The firms USP is Utility Bill Payment through its ATP Kiosk, PoS machines and Mobile Van where cash payment is accepted along with credit/debit cards, UPI, Net Banking, Internet banking etc. The payment through XPay Life is BBPS/NPCI assured and hence adds trust and credibility to your payment. Soon to launch its own UPI channel, XPay.Life’s major focus has been to reach out to unbanked and financially excluded customers of rural India. For more information on XPay.Life, visit https://www.xpay.life/

About NPCI Bharat BillPay Ltd. is a wholly-owned subsidiary of National Payments Corporation of India. Came into effect from April 1, 2021, NBBL is growing rapidly on account of the ease and accessibility it offers to the customers and the one-stop solution to Billers for low-cost collections. The platform offers 20,000+ billers across multiple bank and non-bank channels.
For more information on NPCI, visit: https://www.npci.org.in/
For more information on NBBL, visit https://www.bharatbillpay.com/

Be the first to comment on "मुंबईतील ‘बेस्ट इलेक्ट्रिसिटी’च्या कॅश काउंटर्सच्या डिजिटलीकरणासाठी ‘एक्सपे.लाइफ’ची ‘एनबीबीएल’शी भागीदारी ‘बेस्ट’च्या ग्राहकांना वीजबिल भरणे सुरळीत व सुलभ व्हावे, यासाठी विशेष उपक्रम"

Leave a comment

Your email address will not be published.


*