मुंबई, ३१ मार्च २०२२ ((GNI):- गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर शेमारू मराठीबाणा घेऊन येत आहे मनोरंजनाची मेजवानी. नववर्षासह सुरु होणाऱ्या या साग्रसंगीत मेजवानीत भक्तिमय कीर्तनासोबतच मनोरंजक चित्रपटांचा फक्कड बेत आहे.
गुढीपाडव्याची मंगलमय सुरुवात करण्यासाठी सकाळी ७.००वा. सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख यांच्या कीर्तनाची ‘आनंदवारी’ येणार तुमच्या दारी! या पंगतीची रंगत वाढवायला दु.१२.०० वा. ‘चैत्र नवमी नवरात्र चित्रपट महोत्सव’ सुरु होत आहे. या महोत्सवात २ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्राला देवीच्या विविध रूपांचं घरबसल्या दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. संध्याकाळी ६.०० वा. ‘गजर माऊलीचा’ गुढीपाडवा विशेष भाग. कीर्तन केसरी ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांच्या कीर्तनातून सांगितलेली गुढीपाडव्याची महती तर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करेलच सोबत नवीन वर्षाची सुरुवात आनंददायी कशी करावी यासाठी कानमंत्रही मिळेल. या मेजवानीला परिपूर्ण करण्यासाठी रात्री ९.०० वा. गुढी पाडवा विशेष महामुव्ही ‘आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ दाखविला जाणार आहे.
३ एप्रिल पासून संध्याकाळी ६ वा. ‘गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा’ या मालिकेत सुरू होणार ‘राम कथा पर्व’. या पर्वात ह.भ.प.भास्कर महाराज रसाळ आपल्या कीर्तनातून रामावताराची कथा उलगडणार आहेत. आपल्या सहज सुंदर अभिनयाने अल्पावधीतच रसिकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री उमा हृषिकेश या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करणार आहे.
एवढंच नव्हे, ‘कीर्तन रंगे इंदुरीकर महाराजांसंगे’ कीर्तन मालिकेच्या गुढी पाडवा विशेष भागात लोकप्रिय कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या गाजलेल्या कीर्तनाची पर्वणी अनुभवता येणार आहे.
नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने सुरु होणारा हा सोहळा शेमारू मराठीबाणाच्या प्रेक्षकांसाठी निश्चितच ठरणार मनोरंजनाची मेजवानी. मन भरून मनोरंजन, पोटभर समाधान!ends
Be the first to comment on "शेमारू मराठीबाणा उभारणार नववर्षी मनोरंजनाची गुढी ! २ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान ‘चैत्र नवमी नवरात्र चित्रपट महोत्सव’"