नवी मुंबई, ३० मार्च २०२२ (GNI): आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक विश्वसनीय आरोग्यसेवा समूह अपोलो हॉस्पिटल्सने आपल्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे, ज्यामध्ये आशिया खंडात पहिल्यांदा एकाच रुग्णावर मिट्राक्लिप (MitraClip) चे ड्युएल इम्प्लांट आणि ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) केले गेले आहे. श्रीलंकेहून आलेल्या एका ७५ वर्षांच्या पुरुष रुग्णाला गंभीर एओर्टिक स्टेनोसिस आणि मिट्रल व्हॉल्व रिगर्जेटेशनमुळे कार्डियोजेनिक शॉकच्या स्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये आणले गेले होते. रुग्णालयात भरती केल्यानंतर कार्डियाक अरेस्टमुळे त्यांची तब्येत अजून जास्त बिघडली. या रुग्णांसाठी एओर्टिक व्हॉल्व (टीएव्हीआर) बदलण्याची आणि मिट्रल व्हॉल्व (MitraClip) रिपेयर करण्याच्या प्रक्रिया करणे गरजेचे होते. या दोन्ही प्रक्रिया एकाचवेळी करणे हा एक खूप मोठा टप्पा आहे. अपोलो हॉस्पिटल्स मधील डॉ साई सतीश यांनी या प्रक्रिया केल्या. अपोलो हॉस्पिटल्सच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा पार करत डॉ साई सतीश यांनी अवघ्या २४ तासांमध्ये ९ टीएव्हीआर आणि ३ मिट्राक्लिप्स यशस्वीपणे पार पाडल्या. या प्रक्रिया करण्यात आल्यानंतर ४८ तासांत सर्व रुग्ण ठीक झाले.
मिट्राक्लिप (MitraClip) आणि टीएव्हीआर प्रक्रिया मिनिमली इन्व्हेसिव्ह आहेत म्हणजे यामध्ये शरीरावर जास्त चिरा दिल्या जात नाहीत आणि रक्तस्त्राव देखील खूपच कमी होतो. या प्रक्रियांमुळे ओपन हार्ट सर्जरी न करता देखील हृदयातील नुकसान झालेल्या व्हॉल्वची दुरुस्ती किंवा ते बदलणे शक्य झाले आहे. प्रक्रिया करण्यात आल्यानंतर रुग्णाची तब्येत इतकी वेगाने सुधारते की बहुतांश रुग्णांना २४ ते ४८ तासांच्या आतच घरी पाठवले जाते. ज्यांच्यासाठी सर्जरी धोकादायक ठरू शकते अशा रुग्णांसाठी मिट्राक्लिप (MitraClip) आणि टीएव्हीआर प्रक्रिया जीवन रक्षक आहेत.
अपोलो हॉस्पिटल्सचे सिनियर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ साई सतीश यांनी सांगितले, “आम्ही जवळपास चार वर्षांपासून मिट्राक्लिप (MitraClip) प्रक्रियेसारख्या आधुनिक, नाविन्यपूर्ण उपचारांचा उपयोग करण्यात आघाडीवर आहोत आणि टीएव्हीआर तर त्याहीपेक्षा दीर्घ काळापासून करत आहोत. देशात यांच्या सर्वात जास्त केसेस आम्ही हाताळल्या आहेत. अनुभव आणि अपोलो हॉस्पिटल्समधील पायाभूत संरचना व सहायता सेवांमुळे आम्ही टीएव्हीआर व मिट्राक्लिप (MitraClip) दोन्ही करून या रुग्णाचे व्हॉल्व ठीक करून त्यांचा जीव वाचवू शकलो. टीएव्हीआरने आकुंचन पावलेल्या एओर्टिक व्हॉल्वला ठीक केले जो गंभीरपणे कॅलिफाईड झाला होता, तर मिट्राक्लिप (MitraClip) इम्प्लांटचा उपयोग करून टोरेन्शियल मिट्रल रिगर्जेटेशन ठीक केले गेले. त्यानंतर लगेचच आम्ही अवघ्या २४ तासांत काही खूप आजारी रुग्णांवर ३ मिट्राक्लिप (MitraClip) व ९ टीएव्हीआर प्रक्रिया एकामागोमाग एक केल्या. हे पहिल्यांदा केले गेले आमच्यासाठी हे महत्त्वाचे आहे या रुग्णांनी या जीवन रक्षक प्रक्रियांवर ठेवलेला विश्वास यामधून दिसून येतो.”
आजच्या काळात पुरुष व महिला दोघांसाठी हृदय रोग हा सर्वात मोठा धोका ठरत आहे. जगभरात हार्ट फेल्युअरच्या जवळपास २६० लाख केसेसचे निदान केले जाते आणि एका अनुमानानुसार यापैकी जवळपास ४० ते ५० लाख केसेस एकट्या भारतात आहेत. या रुग्णांना आपल्या जीवनात अनेक संघर्षांना सामोरे जावे लागते आणि आजाराच्या पहिल्या पाच वर्षातच यापैकी जवळपास ६०% रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो.ends
Be the first to comment on "७५ वर्षीय वृद्ध रुग्णावर प्रथमच ‘मिट्राक्लिप-टीएव्हीआर’ प्रक्रिया केली, अपोलोच्या टीमने अवघ्या २४ तासांमध्ये ९ टीएव्हीआर आणि ३ मिट्राक्लिपचे ड्युएल इम्प्लांट केले"