मुंबई, ९ मार्च २०२२ (GNI): अपोलो आरोग्य देखभाल समूहाच्या वतीने आज आपल्या अपोलो प्रो हेल्थ या कार्यक्रमाअंतर्गत एक विस्तारित सुविधा सादर केली. ही सुविधा म्हणजे एक शक्तिशाली एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) सक्षम आणि स्वयंप्रेरित असा आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रम आहे. अपोलो प्रो हेल्थ डीप एक्स ऑन मायक्रोसॉफ्ट होलो लेन्स २ असे नाव असलेल्या या कार्यक्रमाद्वारे लोकांना एक संपूर्ण समन्वित मिश्र वास्तविकता अनुभूती मिळणार असून त्यायोगे त्यांना आपल्या शरीराच्या आत नेमके काय सुरु आहे याचा अनुभव घेणे शक्य होणार आहे आणि उद्याच्या अधिक निरामय भविष्यासाठी आपल्या जीवनशैलीत आजपासून आवश्यक ते बदल-सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रेरणाही मिळणार आहे. डीप एक्सच्या नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअर हे मशीन लर्निंग आणि डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग तंत्र यांची ताकद संयुक्तपणे उपयोगात आणणारे असून संमिश्र तंत्रज्ञान संयोगाद्वारे प्रत्यक्ष आणि डिजिटल जगाची अद्भुत सांगड घालून हृदयाची आजवर कधीच मिळाली नसेल अशी एक अभूतपूर्व दृश्य अनुभूती मिळवून देणार आहे. याला पूरक प्रतिमा उपयोजनामुळे रुग्णांच्या अनुभवात आणखी विस्तारित भर पडणार आहे.
डॉ. प्रथाप सी. रेड्डी, अध्यक्ष अपोलो हॉस्पिटल ग्रुप म्हणाले, “भारतात घडून येणाऱ्या मृत्यूंपैकी ६५% मृत्यूकरीता नॉन कम्युनिकेबल डिसिजेस (एनसीडी) आजार जबाबदार ठरत आहेत. ही एक भयानक वस्तुस्थिती असून या धोक्याकडे पाहण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्म (डब्ल्यूईएफ) ने असा अंदाज बांधलेला आहे की वर्ष २०३० पर्यंत एनसीडी मुळे निर्माण होणारा भारतावरील आर्थिक बोजा हा सुमारे ४.६ ट्रिलीयन डॉलर्स इतका असू शकेल – हे ओझे आपला देश सहन करू शकणार नाही. आपल्या आयुष्यातील सर्वाधिक उत्पादक वयोगटामध्ये अर्थात ३५ ते ६० वर्षे या कालावधीत लोक आपल्या कुटुंबाच्या आरोग्याच्या पूर्वइतिहासामुळे आणि त्यांच्या व्यक्तिगत जीवनशैलीच्या निवडीमुळे सर्वाधिक धोक्याच्या छायेखाली असतील. सर्वेक्षणानुसार अकाली घडून येणाऱ्या मृत्यूंपैकी ८०% हे ‘एनसीडी’ मुळे घडून येणारे असतील आणि वेळेत त्यांचे निदान होऊ शकले व वेळोवेळी योग्य उपचार मिळाले तर असे अकाली मृत्यू टाळता येणे शक्य आहे. आणि म्हणूनच आम्ही लोकांना दीर्घकालीन व निरामय जीवनाकरीता प्रेरित करण्याच्या व पाठींबा देण्याच्या उद्देशाने तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहोत. आमच्या प्रो हेल्थ कार्यक्रमाअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण विकसनामुळे अधिकाधिक लोकांना नियमित स्क्रीनिंग चाचणी करून घेण्याचे आणि एका आरोग्यदायी निरामय जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे सकारात्मक पाऊल उचलण्यासाठी निश्चितच मदत मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे.”
प्रो हेल्थ डीप एक्सद्वारे रुग्णाच्या हृदयात आतमध्ये नेमके काय सुरु आहे, याचे प्रत्यक्ष दर्शन करणे शक्य होते आणि रुग्णाच्या व्यक्तिगत वैद्यकीय इतिहासानुसार तसेच त्याच्या कुटुंबाच्या आरोग्य इतिहासानुसार रुग्णाच्या मर्म इंद्रियाची सद्यस्थिती समजून घेता येते. अपोलोच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यंत्रणेच्या शक्तीद्वारे व भारतीय लोकसंख्येच्या डेटाच्या आधारावर हृद्यविकाराचा झटका येण्याचा जोखीम निर्देशांक (कार्डीआक रिस्क स्कोअर) तयार केला जातो आणि या माहितीच्या आधारे हृदयाची थ्रीडी प्रतिमा न्याहाळण्यासाठी व त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत जोखीम घटकांचा प्रभाव जाणून घेण्यासाठी उपयोग केला जातो.
शशी श्रीधरन, मायक्रोसॉफ्ट इंडिया-व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, “रुग्णांना अधिक चांगला परिणाम मिळून यावा यादृष्टीने डायग्नोसिसला वेगवान चालना देऊन, देखभालीच्या वेळेत बचत करून आणि बुद्धिमान माहिती उपलब्ध करून देऊन आरोग्यसुरक्षा क्षेत्रामध्ये क्रांतिकारी परिवर्तनीय अनुभूती निर्माण करण्याची अतुलनीय क्षमता मिक्स्ड रियालिटी आणि एआय सोल्युशन्स यांच्यामध्ये सामावलेली आहे. आगामी वर्षांमध्ये होलो लेन्स२ चा वापर करून प्रो हेल्थ डीप एक्स सोल्युशन्स रुग्णांना अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी सहाय्यभूत ठरतील आणि त्यायोगे रुग्णांच्या अनुभूतीचा अधिक विस्तार करतील. अपोलो हॉस्पिटलसोबत सहयोग करताना आणि रुग्णांसाठी नाविन्यपूर्णतेला चालना देणारी व प्रतिबंधात्मक देखभाल पुरविणारी सोल्युशन्स सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे.”ends
Be the first to comment on "‘प्रो हेल्थ डीप एक्स’ रुग्णांना शरीरातील वास्तवदर्शी प्रतिमा न्याहाळता येणार होलो लेन्स२ द्वारे ‘प्रो हेल्थ डीप एक्स’ सोल्युशन्स रुग्णांच्या शरीरातील वास्तवदर्शी प्रतिमा दर्शवते"