नवी मुंबई, ४ मार्च २०२२ (GNI): दोन दिवसांच्या युनिपोर्टल रोबोटिक सर्जरी कार्यशाळेचे उद्घाटन आज प्रमुख पाहुणे आणि अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी रेड्डी यांनी केले. हे अभिनव तंत्र भारतात पहिल्यांदा अपोलो मध्ये केले जात आहे. युनिपोर्टल रोबोटिक सर्जरीमध्ये रोबोटिक आर्म्स सर्जरी करतात, यासाठी छातीवर फक्त ३ सेंटीमीटरची एकच चीर दिली जाते. अतिशय गंभीर आणि गुंतागुंतीच्या कार्डिओथोरॅसिक सर्जरी अधिक जास्त दक्षतेने, अचूकपणे आणि शक्य तितक्या सर्वोत्कृष्ट परिणामांसह करण्यासाठी युनिपोर्टल रोबोटिक सर्जरी एक वरदान आहे. या सर्जरीमध्ये शरीरावर जास्त मोठ्या चिरा दिल्या जात नाहीत आणि टाके देखील खूपच कमी येतात, यामुळे सर्जरीच्या नंतर गुंतागुंत निर्माण होण्याचा, मृत्यू, संसर्ग होण्याचा दर खूप कमी आहे आणि रुग्णालयात देखील जास्त दिवस राहावे लागत नाही. सध्या युनिपोर्टल रोबोटिक सर्जरी काही निवडक युरोपियन देशांमध्ये केली जाते आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये अपोलो हॉस्पिटल्स हे एकमेव असे रुग्णालय आहे जे ही अत्याधुनिक सर्जरी करण्यासाठी आवश्यक संसाधने व नैपुण्यांनी सुसज्ज आहे.
अपोलो हेल्थ सिटीचे कन्सल्टन्ट रोबोटिक आणि मिनिमल ऍक्सेस सर्जन डॉ. मंजुनाथ बाले यांच्या नेतृत्वाखाली अपोलो हॉस्पिटल्सच्या कार्डिओथोरॅसिक सर्जन्सची टीम देशातील पहिली युनिपोर्टल रोबोटिक सर्जरी करत आहे, ज्यामध्ये त्यांना स्पेनचे रोबोटिक व वॅट्स सर्जन डॉ. दिएगो गोन्झालेझ रिवास यांचा सहयोग मिळत आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये स्पेनमध्ये पहिल्यांदा ही प्रक्रिया डॉ रिवास यांनी केली आणि तेव्हापासून त्यांनी ही प्रक्रिया अनेक देशांमध्ये केली आहे.
पारंपरिक कार्डिओथोरॅसिक सर्जरीप्रमाणे छातीवर मोठी चीर देऊन ती खोलण्याऐवजी युनिपोर्टल रोबोटिक सर्जरीमध्ये बरगड्यांच्या मध्ये एक छोटी चीर दिली जाते आणि त्यामधून कॅमेरा व उपकरणे रुग्णाच्या शरीराच्या आत सरकवली जातात. सर्जनच्या समोर एका स्क्रीनवर रुग्णाच्या शरीराच्या आतील दृश्य सुस्पष्ट आणि मोठे करून (मॅग्निफाईड) दिसत असते आणि सर्जन विशेष उपकरणांचा वापर करून सर्जरी करतात. रोबोटमध्ये एक मास्टर स्लेव्ह मॉडेल असते जे कन्सोलवर सर्जन करत असलेल्या हालचालींशी ताळमेळ राखून त्या हालचाली मानवी शरीराच्या आत करते. कार्डिओथोरॅसिक सर्जरीमध्ये सर्जिकल मृत्यू होण्याचा दर जास्त असल्याने त्यांना सर्वाधिक जोखमीचे मानले जाते. युनिपोर्टल रोबोटिक प्रक्रिया असे एक नवे युग घेऊन आली आहे, ज्यामध्ये थोरॅसिक सर्जरीच्या पद्धती पार बदलून गेल्या आहेत. डॉ. मंजुनाथ बाले सांगतात, ही सर्जरी सर्जन आणि रुग्ण या दोघांसाठी खूप चांगली आहे, ती अतिशय अचूकपणे केली जाऊ शकते आणि सर्जरीतून मिळणारे परिणाम अतुलनीय आहेत.
या नवीन प्रक्रियेमार्फत फुफ्फुसांच्या अनेक आजारांवर उपचार केले जाऊ शकतात, थ्रीडी दृश्याच्या माध्यमातून रोबोट दृश्यता वाढवतो आणि सप्ली रोबोट उपकरणांच्या माध्यमातून जिथे ऑपरेशन करायचे आहे त्या जागेपर्यंत अगदी सहजपणे पोहोचता येते, त्यामुळे खूप चांगले परिणाम मिळतात. रुग्णाच्या बाजूने पाहायचे झाल्यास, छातीवर प्रत्येक ठिकाणी अनेक नसा असतात, ओपन सर्जरीमध्ये जेव्हा एखादी जागा खोलली जाते तेव्हा अनेक नसांचे नुकसान होते व रुग्णाला दीर्घकाळपर्यंत खूप तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. नवीन प्रक्रियेमध्ये फक्त एक छोटी चीर दिली जाते, त्यामुळे नसांचे नुकसान होण्याचे प्रमाण कमी होते, वेदना कमी होतात. या सर्जरीनंतर रुग्णालयात जास्त दिवस राहावे लागत नाही आणि गुंतागुंत जोखीम कमी असल्याने रुग्ण वेगाने बरा होतो, तसेच संसर्गाचा धोका देखील कमी होतो.ends
Be the first to comment on "‘युनिपोर्टल रोबोटिक सर्जरी’ भारतात पहिल्यांदा अपोलोत उपलब्ध, अचूकपणे आणि सर्वोत्कृष्ट परिणामांसह करण्यासाठी युनिपोर्टल रोबोटिक सर्जरी एक वरदान आहे"