मुंबई, १७ फेब्रुवारी २०२२ (GNI): टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) धोरणात्मक युनिट टीसीएस आयओएन™ आणि नेत्तुर टेक्निकल ट्रेनिंग फाऊंडेशन (एनटीटीएफ) या तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदान करणाऱ्या प्रमुख संस्थेने भागीदारी केली आहे. टीसीएस आयओएनने विकसित केलेल्या, एका अनोख्या फिजिटल मॉडेलमध्ये रोबोटिक्स, ऑटोमेशन, उत्पादन आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांमध्ये, सर्व उद्योगांमध्ये भरपूर मागणी असलेल्या कौशल्यांचा विकासासाठी विशेष कार्यक्रम या भागीदारीच्या माध्यमातून सुरु केले जाणार आहेत. देशातील ६०,००० पेक्षा जास्त युवकांमध्ये कौशल्य निर्मिती व विकास घडवून आणण्यासाठी, त्यांना सध्याच्या व भविष्यातील उद्योगक्षेत्राच्या गरजांच्या अनुषंगाने नोकरीसाठी सज्ज बनवण्यासाठी टीसीएस आणि एनटीटीएफ ३ डिप्लोमा व १२ सर्टिफिकेशन कोर्सेस सुरु करणार आहेत. त्याबरोबरीनेच त्यांना देशभरात स्थापन करण्यात आलेल्या टीसीएस आयओएन शिक्षण व सराव केंद्रांमध्ये अनुभव देखील घेता येईल. लाईव्ह ऑनलाईन लेक्चर्स एनटीटीएफकडून दिली जातील. असे कार्यक्रम देशभरातील विविध आयटीआय, पॉलिटेक्निक्स आणि कौशल्य विकास संस्था यांच्या माजी विद्यार्थ्यांना देखील उपलब्ध करवून दिले जातील.
टीसीएस आयओएनचे ग्लोबल हेड श्री. वेन्गुस्वामी रामास्वामी यांनी सांगितले, “२०२५ सालापर्यंत भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेवा उद्योगक्षेत्र २३.५ बिलियन डॉलर्सवरून १५२ बिलियन डॉलर्सपर्यंत तब्बल सहा पटींनी जास्त वृद्धींगत होण्याची अपेक्षा आहे. ही वाढ साध्य करण्यासाठी तरुणपिढीने मूळ शिक्षणाबरोबरीनेच व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याची देशाला गरज आहे. टीसीएस आयओएन – एनटीटीएफ भागीदारी ही राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला अनुरूप असून भविष्यातील मनुष्यबळ कुशल आणि नवनवीन उद्योगक्षेत्रांमधील आकर्षक करिअर संधींचा लाभ घेण्यासाठी सक्षम बनवणे हा त्यामागचा उद्देश आहे.”
एनटीटीएफचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन रेगुराज यांनी सांगितले, “कुशल युवकांची धाव आता जागतिक झाली आहे. एनटीटीएफ आणि टीसीएस आयओएन यांच्यातील भागीदारी उपक्रम म्हणून सुरु करण्यात येत असलेले फिजिटल मॉडेल प्रोग्राम्स देशातील युवकांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या कौशल्य त्रुटी भरून काढतील. ६०,००० पेक्षा जास्त युवकांना नोकरीसाठी सज्ज बनवण्यासाठी कौशल्य निर्मिती व विकास करणे हे आमचे लक्ष्य आहे. प्रत्यक्ष साधनांच्या वापरासह प्रशिक्षण आणि एनटीटीएफच्या मानकांप्रमाणे ऑनलाईन कन्टेन्ट उपलब्ध करवून देणे यांचा मिलाप असलेले मॉडेल म्हणून प्रस्तुत करण्यात येत असलेला हा अनोखा उपक्रम युवकांना “मल्टी-लेव्हल सर्टिफाईड” व कुशल बनवेल, जेणेकरून ते रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या क्षेत्रांमध्ये भरपूर मागणी असलेल्या नोकऱ्यांसाठी सज्ज होऊ शकतील. यशस्वी विद्यार्थ्यांना टीसीएस-आयओएन प्लॅटफॉर्मवरील अनेक नोकऱ्यांच्या संधींमधून आपल्याला हवी असलेली नोकरी निवडण्याची संधी मिळेल.” प्रोग्राम्सची माहिती मिळवण्यासाठी लिंक पाहावी : https://learning.tcsionhub.in/hub/ve/.
Be the first to comment on "‘टीसीएस-आयओएन’ ची एनटीटीएफ सोबत भागीदारी, देशातील युवा पिढीमध्ये कौशल्ये निर्मिती आणि विकास घडून यावा यासाठी १५ फिजिटल शिक्षण कार्यक्रम सुरु करणार"