मुंबई, १४ जानेवारी २०२२ (GNI): मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने एनजीओ अक्षय पात्र फाउंडेशनसोबत सहयोग केला असून त्यायोगे कोरोना आपत्तीमुळे गंभीर विपरीत परिणाम सोसाव्या लागलेल्या हजारो परिवारांना किराणा समान पुरविण्यात आले आहे. मणिपाल सिग्ना हा मणिपाल ग्रुप या आरोग्य सुरक्षा वितरण आणि उच्चशिक्षण क्षेत्रातील अग्रणी कंपनी आणि सिग्ना कॉर्पोरेशन (NYSE:CI) या युनायटेड स्टेट्स स्थित जागतिक आरोग्य सेवा अग्रगण्य कंपनी मधील सहयोग आहे. मणिपाल सिग्नाने अक्षय पात्रसोबत सहयोग करून भारतातील सहा शहरांत रू. ५५ लाख किमतीच्या ४,५५० ‘फॅमिली हॅपीनेस किट्स’चे वितरण केले. कोरोना विषाणूच्या उद्रेकाने अत्यंत अनपेक्षित न भूतो न भविष्यती अशी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण केली. रोजगारावर काम करणारे मजूर, कामगार आणि लहान मुले यांच्यासारख्या समाजातील गरीब कुटुंबांना या सगळ्याचा सर्वाधिक विपरीत फटका बसला. या कुटुंबांच्या काही मूलभूत गरजांची पूर्तता करण्यास मदत व्हावी या हेतूने मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्सच्या कर्मचाऱ्यांनी स्वयंप्रेरणेने अक्षय पात्र फाउंडेशनच्या मुंबई, बंगळूर, हैदराबाद, पुणे, गुवाहाटी आणि दिल्ली येथील कोविड-१९ फूड रिलीफ केंद्रांमध्ये किराणामाल आणि सामानाचे किट्स वाटप केले.
सपना देसाई, विपणन आणि डिजिटल विक्री प्रमुख, मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स म्हणाल्या, “आज आपण ज्या काळात जगत आहोत त्यामध्ये आरोग्याची काळजी घेणे ही सर्वाधिक महत्वाची बाब बनलेली आहे आणि सध्याच्या या कसोटीच्या अवघड काळात ‘अक्षय पात्र’च्या सहयोगाने असुरक्षित गरीब कुटुंबांना वाणसामानाची किट्स (शिधा) देऊन मदत करू शकलो याचे आम्हाला अतिशय समाधान वाटते आहे. मणिपाल सिग्नामध्ये आम्ही ज्यांची सेवा करतो त्यांचे आरोग्य, निरोगी आयुष्य आणि मनःशांती यांच्यात सुधारणा व्हावी यासाठी काम करतो. आणि हे साध्य करण्यासाठी आम्ही अन्नसुरक्षेकडे लक्ष करण्याचा वसा हाती घेतला असून सिग्ना फाउंडेशनच्या ‘हेल्दी किड्स फॉर अवर फ्युचर’ या कार्यक्रमाच्या रूपाने अधिक सक्षम निरोगी समुदायाची बांधणी करण्यात सहाय्य पुरवीत आहोत.”
श्री. संदीप तलवार, सीएमओ, द अक्षय पात्र फाउंडेशन म्हणाले, “मणिपाल सिग्नाने आमच्या या उपक्रमाला सक्षम बनविण्यासाठी स्वयंप्रेरणेने जे योगदान दिले, त्याबद्दल आम्ही त्यांच्याप्रती मनापासून कृतज्ञ आहोत. आम्ही आज हजारो वंचित कुटुंबे आणि बालकांची सेवा करण्याचा जो काही मैलाचा टप्पा गाठू शकलो आहोत, त्यामागे या उपक्रमात सहभागी असलेल्या एकूण-एक व्यक्तीने दिलेल्या वैयक्तिक आणि सामुहिक प्रयत्नांचा मोलाचा वाटा आहे.मणिपाल सिग्नाला आमची भागीदार म्हणून जोडून घेताना आम्हाला अतिशय आनंद होत असून या सहयोगाद्वारे आम्ही आगामी वर्षांमध्ये देखील बालकांची व समाजाची सेवा करण्याचे काम असेच कायम ठेवू शकू याबाबत आम्हाला खात्री आहे.”
मणिपाल सिग्नाने ‘अक्षय पात्र’ला दिलेला निधी द सिग्ना फाउंडेशनच्या २५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या ‘हेल्दी किड्स फॉर अवर फ्युचर’ या कार्यक्रमाचा एक भाग असून ‘उत्तम आरोग्य आणि निरोगी जीवन, आणि गरिबी निर्मूलन’ या युनायटेड स्टेट्सच्या शाश्वत विकास ध्येयाशी सुसंगत कार्यक्रम आहे. सिग्ना कॉर्पोरेशनचे सुमारे ७४ हजारांहून अधिक जागतिक कर्मचारी लहान बालकांना एका आरोग्यदायी पथमार्गावर नेण्यासाठी कार्यरत असून बालक आणि स्थानिक समुदायांत पोषण आहार सुधारणे यापासून त्याची सुरुवात करण्यात आली आहे. Ends
Be the first to comment on "गरीब कुटुंबांना अक्षयपात्र ‘फॅमिली हॅपीनेस किट्स’ चे वाटप, मणिपाल सिग्ना-अक्षय पात्र यांचे संयुंक्तिकपणे ४,५५० कुटुंबांना ‘फॅमिली हॅपीनेस किट्स’ चे वाटप"