आंतरराष्ट्रीय व्यापारवृद्धीसाठी तज्ञ् मार्गदर्शकासह ‘दुबई एक्स्पो’चा व्यवसाय दौरा आणि महाबीज 2022 परिषदेमध्ये सहभागाची सुवर्णसंधी

मुंबई, 29 डिसेंबर 2021 (जीएनआय): ज्या उद्योजकांना आपला व्यवसाय भारताबाहेर वाढवायचा आहे, आपल्या स्वतःच्या व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे- अशा उद्योजकांसाठी दिनांक १७ ते २२ फेब्रुवारी या दरम्यान ब्रिजमोहन चौधरी यांनी दुबई व्यवसाय दौरा आयोजित केला आहे . या उद्योग दौर्‍याचे वैशिष्ट्‌य  असे आहे की,  प्रसिद्ध व्यवसाय तज्ञ अतुल ठाकूर दुबई मध्ये राहून उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. परदेशात व्यवसाय करतांना येणार्‍या अडचणी , इम्पोर्ट -एक्स्पोर्ट अशा संधींचा लाभ कसा घ्यावा, उद्योग कसा वाढवावा  यासंबंधी या उद्योग  दौर्‍यामध्ये त्यांचे पूर्णवेळ मार्गदर्शन देखील राहणार आहे .

श्वेता इनामदार

दुबईतील महाबीज परिषदेमध्ये यापूर्वी सन्मानित झालेल्या श्वेता इनामदार या देखील महिला उद्योजकांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत.  तसेच  उद्योजकतेचे  प्रेरणादायक वक्ते श्रीपाद कुलकर्णी यांचेही मार्गदर्शन  या दौर्‍यामध्ये असणार आहे .  दुबई एक्स्पोमध्ये  व परिषदेत अधिकाधिक नेटवर्किंग होऊन सर्वांचाच बिझनेस वाढावा असे या दौर्‍याचे उद्दिष्ट आहे.

‘‘आंतरराष्ट्रीय औद्योगिक परिस्थितीचा भारतीय उ करावा ’’  अशा व्यापक विचाराने हा व्यवसाय दौरा आयोजित केलेला आहे! खर्‍या अर्थाने ‘‘व्यवसायिकांनी व्यावसायिकांसाठी आयोजित केलेली’’ अशी आगळीवेगळी टूर आयोजित केल्याची माहीती बीबीएनजी संस्थापक व अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

बीबीएनजी संस्थापक व अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी

याविषयी अधिक माहीती देतांना श्री. कुलकर्णी म्हणाले की, सध्या व्यवसाय जगतामध्ये चर्चा आहे ती दुबईमध्ये सुरू असलेल्या ‘‘दुबई एक्सपो’’ या प्रदर्शनाची! या प्रदर्शनात सुमारे १९२ देशांनी आपले स्वतःचे पॅव्हेलियन मध्ये आपल्या देशातील  संस्कृती, टेक्नॉलॉजी, इनोवेशन , विविध उत्पादने अशा गोष्टी सादर केल्या आहेत . दुबईमध्ये ३१ मार्च पर्यंत ‘दुबई एक्सपो’ हे प्रदर्शन चालू राहील.फेब्रुवारी महिना हा दुबई मधला ‘व्यवसायिक घडामोडींचा’ महिना असतो!  या काळामध्ये दुबईमध्ये ‘गल्फ फुड फेअर’ हे एक महत्त्वाचे खाद्य-पेय, कृषी आणि संबंधित उद्योगाचे  भव्यदिव्य प्रदर्शन असते . याशिवाय दिनांक १९ आणि २० फेब्रुवारी २०२२ रोजी दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी महत्त्वाची अशी ‘‘महाबीज बिझनेस कॉन्फरन्स’’ होत आहे. सदर परिषद  जीएमबीएफ ग्लोबल तर्फे आयोजित केली जात आहे. जीएमबीएफ ग्लोबल ही आखाती देशातील  उद्योजक व व्यावसायिकांनी स्थापन केलेली संस्था आहे.  ना नफा ना तोटा या तत्वावर  मराठी व्यायवसायिकांना आखाती देशांमध्ये व्यवसाय वाढवता यावा यासाठी गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत  विश्वासार्ह अशी ही अग्रगण्य संस्था आहे.   या संस्थेचे ५०० पेक्षा जास्त सभासद आखाती, मध्य पूर्व, आफ्रिकन  देशात  आहेत.  जीएमबीएफ ग्लोबल च्या सातत्याने केलेल्या कार्यामुळे आज महाराष्ट्रातील अनेक उद्योजक व व्यावसायिक यांच्या उत्पादनांना व सेवांना जागतीक बाजारपेठ मिळाली आहे. 

प्रसिद्ध व्यवसाय तज्ञ अतुल ठाकूर

सदर  प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलताना प्रसिध्द बिझनेस कोच अतुल ठाकूर म्हणाले की, गाइडेड बिझनेस टूर चे फायदे असे असतात, ज्यामध्ये टूर निघण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रेसेंटेशन कसे असावे यावर मार्गदर्शन केले जाईल , दुबई मध्ये एक तीन तासांचे  ट्रेनींग सेशन देखील असेल.  ज्यामध्ये दुबई स्थित व्यवसायिकांचे मार्गदर्शन, संपूर्ण टूर दरम्यान रोज ‘झुम’ वर ट्रेनिंग  आणि शंका समाधान केले जाईल.  महाराष्ट्रीयन व्यावसायिक हा मराठी व्यावसायिकांंसोबत अधिक  सहजतेने बिझनेस करू शकतो. अशी सुरवात करून नंतर दुबई आणि इतर देशात आपला व्यवसाय वाढवणे आपल्याला शक्य होईल. आंतराष्ट्रीय  व्यवसायिकांशी नेटवर्किंग व व्यवसायाची संधी त्याचप्रमाणे नेमक्या पद्धतीने कॅम्युनिकेशन कसे करावे या विषयी मार्गदर्शन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

ज्येष्ठ उद्योजक श्रीपाद कुलकर्णी यांनी सांगितले की, २०२० मध्ये दुबई येथे झालेल्या महाबीज  कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्रातील हजारो उद्योजक सहभागी झाले होते. या कॉन्फरन्समुळे अनेक उद्योजकांना आपले उद्योग विस्तारण्यासाठी फायदा झाला. यंदाही मोठ्या प्रमाणात उद्योजकांना सहभागी होण्याची संधी असून व्यापार विस्तारण्यास चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महिला उद्योजकांनी आपला व्यवसाय देशाबाहेर कसा वाढवावा  यासंदर्भात श्वेता इनामदार यांनी माहिती दिली . 

ब्रिजमोहन चौधरी यांनी माहिती देताना सांगितले कि ते   स्वतः टुरिझम या क्षेत्रामध्ये गेल्या ४० वर्षांपासून कार्यरत आहेत. भारताच्या व्यापार वृद्धीसाठी त्यांनी हा दुबई चा दौरा आयोजित केला आहे.  म्हणून उद्योजकांना कमीत कमी खर्चात हा दौरा करता यावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. 

गल्फ फ्रुड फेअर/दुबई एक्स्पो आणि महाबिज कॉन्फरन्स – बिझनेस कोचसह  असलेली ही बिझनेस टूर चार रात्री आणि पाच दिवसाची असणार आहे. यामध्ये दुबई सिटी टूर, दाऊ क्रुज आणि डेझर्ट सफारीचाही समाविष्ट असल्याची माहीती त्यांनी यावेळी दिली,अधिक माहीतीसाठी ८६२००००३३३ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेस  जीएमबीएफचे नितीन सस्तकर आणि महाबीज दुबईचे  महाराष्ट्रातील प्रतिनिधी जगदीश कुलकर्णी उपस्थित होते.

Be the first to comment on "आंतरराष्ट्रीय व्यापारवृद्धीसाठी तज्ञ् मार्गदर्शकासह ‘दुबई एक्स्पो’चा व्यवसाय दौरा आणि महाबीज 2022 परिषदेमध्ये सहभागाची सुवर्णसंधी"

Leave a comment

Your email address will not be published.


*