मुंबई, २४ डिसेंबर २०२१ (GNI): शेमारू मराठीबाणा चित्रपट वाहिनीवर सादर होणाऱ्या लोकप्रिय कीर्तन कार्यक्रम ‘गजर माऊलीचा-उत्सव कीर्तनाचा’ चे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. विठू माउली आणि भक्तांमधील अजोड भावबंधांचे सुंदर वर्णन या गीतामध्ये करण्यात आले आहे. गीताचे बोल श्रीधर भावे यांचे आणि संगीत अभिजीत नार्वेकर यांचे आहे. अनेक मराठी सिनेमांमधील गाणी स्वरबद्ध केलेले प्रसिद्ध गायक प्रसेनजीत कोसंबी यांनी आपल्या सुमधुर आवाजात हे गीत गायले आहे.
‘गजर माऊलीचा-उत्सव कीर्तनाचा’ हा शेमारू मराठीबाणावरील भक्तिमय कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांतील नामवंत तसेच उदयोन्मुख, प्रतिभावान कीर्तनकार आपली कीर्तने सादर करतात. महाराष्ट्राची कीर्तन परंपरा अविरत सुरु ठेवण्यासाठी आणि कीर्तनकारांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी शेमारू मराठीबाणा चित्रपट वाहिनीने या मालिकेची निर्मिती केली आहे.
या कार्यक्रमाला दर्शकांकडून भरघोस प्रेम मिळत आहे आणि नुकतेच या कार्यक्रमाचे १०० भाग पूर्ण झाले आहेत. मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भार्गवी चिरमुले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. महाराष्ट्रातील विविध सण आणि महत्वाच्या दिवसांचे औचित्य साधून या कार्यक्रमात विशेष भाग सादर केले जातात.ends
Be the first to comment on "‘गजर माऊलीचा-उत्सव कीर्तनाचा’ प्रेक्षकांच्या भेटीलागायक प्रसेनजीत कोसंबी यांच्या सुमधुर आवाजात शीर्षक गीत"