नवी मुंबई, २९ नोव्हेंबर २०२१ (GNI): अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने आपत्काळामध्ये निःशुल्क रुग्णवाहिका सेवा पुरवण्याची घोषणा केली आहे, ही सेवा नवी मुंबई शहर सीमांच्या आत उपलब्ध असेल. मोफत रुग्णवाहिका सेवेमुळे रुग्णांच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना कोणत्याही प्रकारची आणीबाणी उद्भवल्यास रुग्णवाहिका मिळवण्यासाठी वेळ वाया घालवावा लागणार नाही. फक्त १०६६ क्रमांकावर फोन करून अपोलो हॉस्पिटल्स डेडिकेटेड इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिम (ईआरएस) चा लाभ घेता येईल. आधुनिक जीपीआरएस-सक्षम रुग्णवाहिका तातडीने पाठवली जाईल. ही रुग्णवाहिका प्रशिक्षित पॅरामेडिक्ससह आवश्यक क्रिटिकल केयर उपकरणांनी सुसज्ज असेल. आणीबाणीच्या प्रसंगामध्ये सर्वात महत्त्वाचे असते वेळ वाचवणे आणि २४X७ ईआरएसमुळे वैद्यकीय मदत अगदी सहज आणि रुग्णाची तब्येत अधिक जास्त खालावण्याच्या आधी मिळवता येईल व मृत्यू किंवा अपंगत्व अशा दुर्दैवी घटना टाळता येतील.
अपोलो हॉस्पिटल्सच्या प्रतिनिधीने सांगितले की, “आणीबाणीच्या परिस्थितीत असलेल्या रुग्णाला तातडीने वैद्यकीय मदत मिळणे अत्यंत गरजेचे असते आणि त्यामध्ये कोणतीही अडचण येता कामा नये असे आम्हाला वाटते आणि म्हणूनच आम्ही नवी मुंबई शहर सीमांच्या आत मोफत रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचे ठरवले आहे. फक्त १०६६ क्रमांक डायल करून रुग्णांना अपोलो हॉस्पिटल्सच्या इमर्जन्सीमध्ये तातडीने पोचता येईल आणि ‘गोल्डन अवर’ मध्ये रुग्णाची तब्येत खालावण्याच्या आधी वैद्यकीय मदत मिळवता येईल. ‘गोल्डन अवर’ आत्यंतिक महत्त्वाचा असतो, कोणाही व्यक्तीला जखमी झाल्यापासून किंवा गंभीररीत्या आजारी पडल्यापासून पहिल्या तासाभरात रुग्णालयात पोहोचवले गेल्यास मृत्यू किंवा अपंगत्व टाळता येऊ शकते.”
२४X७ इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिममुळे हृदयविकार किंवा स्ट्रोक यासारखे गंभीर आजार आणि गंभीर अपघातामुळे उद्भवलेल्या कोणत्याही वैद्यकीय किंवा सर्जिकल आणीबाणीमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण रोखता येतील. १०६६ हा क्रमांक डायल केल्यावर आधुनिक जीपीआरएस सक्षम रुग्णवाहिका पाठवली जाईल. ही रुग्णवाहिका प्रशिक्षित पॅरामेडिक्ससह आवश्यक क्रिटिकल केयर उपकरणांनी सुसज्ज असेल. रुग्णालयात नेले जात असताना रुग्णाच्या महत्त्वाच्या अवयवांवर लक्ष ठेवले जाईल आणि त्या कालावधीत रुग्णवाहिका व रुग्णालय यांच्या दरम्यान संदेशांची देवाणघेवाण होऊन रुग्णाच्या तब्येतीबाबत पूर्ण माहिती देण्यात मदत होऊ शकेल. अशी कार्यपद्धती अवलंबिली गेल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना रुग्णाला रुग्णालयात घेण्याची तयारी करून ठेवता येईल व उपचारांना सुरुवात करता येईल, तसेच कॅथ-लॅब, ऑपरेटिंग थिएटर, आयसीयू यासारख्या सुविधा तसेच संबंधित विभाग रुग्णासाठी तयार ठेवता येतील व रुग्णाला सर्व ती आवश्यक वैद्यकीय मदत मिळू शकेल.
जीपीआरएस सक्षम ट्रॅकिंग यंत्रणा असल्यामुळे रुग्ण रुग्णालयात नेमका कधी पोहोचणार आहे ती वेळ अपोलो इमर्जन्सी टीमला माहिती असेल. रुग्णाला वाचवण्याच्या दृष्टीने कोणकोणती पावले उचलावी लागतील त्याची सर्व तयारी ते आधीच करून ठेवू शकतील. ही सेवा गोल्डन अवर व्यवस्थापनाच्या आंतरराष्ट्रीय मापदंडां नुसार आहे. आपत्काळासाठी मोफत रुग्णवाहिका सेवा शहरभरामध्ये उपलब्ध आहे.ends
Be the first to comment on "नवीमुंबई करांना मिळणार आपात्कालिन मोफत रुग्णवाहिका सेवा, अपोलो मोफत रुग्णवाहिका सेवा १०६६ या क्रमांकावर २४X७ नवी मुंबई शहर सीमांच्या आत उपलब्ध असेल"