कार्डियामोबाईल युजर्सना ग्लोबल टेलिहेल्थ एक्स्चेंजवर डॉक्टरांसोबत जोडणार, सॉल्व.केयर आणि अलाइव्हकोर यांची भागीदारी

मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२१ (GNI):- सॉल्व.केयरने अलाइव्हकोरसोबत भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. अलाइव्हकोरच्या कार्डियामोबाईल डिव्हायसेस आणि सर्व्हिसेसच्या युजर्सना ग्लोबल टेलिहेल्थ एक्स्चेंज (GTHE) नेटवर्कवर डॉक्टरांसोबत टेलिकन्सलटेशन्सचे बुकिंग अगदी सहजपणे करता यावे हा या भागीदारीचा उद्देश आहे. या नेटवर्कवरील डॉक्टरांना युजर्सनी अनुमती दिल्यावर त्यांचे कार्डियामोबाईल इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ईसीजी) रीडिंग्स सहजपणे पाहता येतील. कार्डियामोबाईल ६एल डिव्हाईस हे यूएस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ने मंजुरी दिलेले पहिले आणि एकमेव सिक्स-लीड पर्सनल ईसीजी आहे. जीटीएचई हे खुले जागतिक विविध देशांदरम्यानचे टेलिहेल्थ नेटवर्क आहे जे जगभरातील डॉक्टर्स आणि रुग्णांना एकत्र जोडते.

या भागीदारीमुळे कार्डियामोबाईल डिव्हायसेस सॉल्व.केयरच्या ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मसोबत जोडली जातील त्यामुळे युजर्सना जीटीएचई वर त्यांच्या टेलिकन्सलटेशन्स दरम्यान त्यांचे ईसीजी रीडिंग्स शेअर करण्यासाठी थेट कार्डिया ऍपमार्फत डॉक्टरांशी संपर्क साधता येईल. सॉल्व.केयर आणि अलाइव्हकोर यांच्या करारामुळे आरोग्यसेवांची उपलब्धता अधिक जास्त वाढेल, रुग्णांना थेट त्यांच्या मोबाईल डिव्हायसेसमार्फत जगभरातील कोणत्याही विशेष डॉक्टरांसोबत टेलिकन्सल्ट तातडीने बुक करता येईल, साहजिकच रुग्णांना अधिक जास्त सुविधा उपलब्ध होईल.

अलाइव्हकोर(AliveCor)चे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, यु. एस. हेल्थकेयर मार्क बोगार्ट यांनी सांगितले, “सॉल्व.केयर सोबत ही भागीदारी आमच्यासाठी महत्त्वाची आहे कारण यामुळे आम्हाला आमच्या कार्डिओमोबाईल युजर्सना अधिक जास्त सुविधा प्रदान करता येईल, त्यांना सॉल्व.केयर ग्लोबल टेलिहेल्थ एक्स्चेंज नेटवर्कमार्फत डॉक्टरांसोबत संपर्क साधता येईल.”

सॉल्व.केयरचे सीईओ श्री. प्रदीप गोयल यांनी सांगितले, “आरोग्यसेवा उद्योगक्षेत्रात अतिशय वेगाने डिजिटायझेशन घडून येत आहे. पण या सर्व घडामोडींमध्ये आपल्याला आरोग्यसेवेचा मूळ उद्देश रुग्णांच्या जीवन गुणवत्तेमध्ये सुधारणा घडवून आणणे हा आहे हे विसरून चालणार नाही. या सहयोगामुळे सॉल्व.केयर प्लॅटफॉर्मवर केयर नेटवर्क्सच्या युजर्सना मिळणाऱ्या देखभाल सेवांची गुणवत्ता लक्षणीय प्रमाणात सुधारेल. रुग्णांचे ईसीजी रीडिंग्स पाहता येणे सहजशक्य होणार असल्याने डॉक्टरांना जीटीएचईवर रुग्णांना अधिक चांगली देखभाल पुरवता येतील, टाईप २ मधुमेह असलेल्या रुग्णांना हृदय विकारांचा धोका अधिक जास्त असतो त्यामुळे डायबेटीस केयर नेटवर्कवर देखील हे उपयुक्त ठरणार आहे.ends

Be the first to comment on "कार्डियामोबाईल युजर्सना ग्लोबल टेलिहेल्थ एक्स्चेंजवर डॉक्टरांसोबत जोडणार, सॉल्व.केयर आणि अलाइव्हकोर यांची भागीदारी"

Leave a comment

Your email address will not be published.


*