‘झील’ ने एनटीओ 2.0 नुसार चॅनेलच्या किंमतींची घोषणा केली, आपल्या सर्व सब्स्क्रायबर्सना अमर्यादित मनोरंजनासह सर्वोत्तम मूल्य प्रदान करण्याच्या वचनबद्धतेला दिला दुजोरा

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२१ (GNI):  झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड (झील) या भारतातील आघाडीच्या मीडिया आणि मनोरंजन दिग्गज कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनांक ३० जून २०२१ रोजीच्या आदेशानुसार नवीन टॅरिफ ऑर्डर (एनटीओ) 2.0 नुसार आपले नवे अला-कार्ट चॅनेल आणि बुके किमती सुरु केल्याची घोषणा केली आहे. भारतभरातील आपल्या कोट्यवधी दर्शकांच्या मनोरंजनाशी संबंधित वेगवेगळ्या आवडीनिवडी पूर्ण करण्याच्या दृष्टीने ‘झील’ ने हे पाऊल उचलले आहे. नवीन टॅरिफ ऑर्डर (एनटीओ) 2.0 च्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर विचाराधीन असलेल्या सर्व याचिकांच्या अंतर्गत झीलच्या अधिकारांना धक्का न लावता आणि वादविवादांविषयी पूर्वग्रह न ठेवता या किमती जाहीर केल्या जात आहेत.

झी ग्रुप ऑफ चॅनेल्सने अनेक वेगवेगळ्या दर्शक विभागांमध्ये आणि शैलींमध्ये ११ भाषांमध्ये तब्बल ६७ वाहिन्यांच्या सर्वात विशाल नेटवर्कसह मनोरंजनाची सर्वोत्तम वैविध्यता प्रस्तुत केली आहे.  दर आठवड्याला संपूर्ण भारतभरातील ६,०६० लाख दर्शक झीच्या विविध वाहिन्यांवरील विविध कार्यक्रमांचा आनंद घेतात, दर आठवड्याला १६३ बिलियनपेक्षा जास्त मिनिटे झीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला जातो.  हिंदी सोबतच  मराठी, बांगला, कन्नड, तेलगू, तामिळ, मल्याळम, भोजपुरी, ओडिया, पंजाबी व इंग्रजी या इतर क्षेत्रीय भाषांमध्ये सर्वसामान्य मनोरंजन, चित्रपट, बातम्या, संगीत, जीवनशैली व एचडी अशा विविध शैलींमध्ये सर्वात जास्त दर्शकसंख्या असलेल्यांपैकी एक म्हणून झीलला नावाजले जाते.

नव्या चॅनेल प्रायसिंगबद्दल झी एंटरटेनमेंट इंटरप्रायझेस लिमिटेडचे दक्षिण आशियाचे प्रेसिडेंट – बिझनेस श्री. राहुल जोहरी यांनी सांगितले, “झीलने संपादन केलेले अतुलनीय यश हे भारतभरातील दर्शकांसोबत जोडले गेलेले घनिष्ठ नाते आणि संपूर्ण हितधारक समुदायासोबत प्रस्थापित करण्यात आलेले गहिरे संबंध यांचे फलित आहे.  या दोन्ही खास भागीदारींमुळे गेली जवळपास तीन दशके आम्ही विविध बाजारपेठांमध्ये आमची आघाडी कायम राखू शकलो आहोत.  सर्वाधिक मनोरंजक आणि सर्वोत्तम गुणवत्तेचा कन्टेन्ट सादर करत, राष्ट्रीय व क्षेत्रीय वाहिन्यांना अधिक जास्त दर्जेदार व समृद्ध बनवत आणि महसूल वृद्धीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम करत आम्ही संपूर्ण इकोसिस्टिमसाठी मूल्य निर्माण करत राहू. आम्हाला पक्की खात्री आहे की, एनटीओ 2.0 ची अंमलबजावणी करण्यात आल्यानंतर झीच्या वाहिन्यांच्या सर्व बाजारपेठांमधील लोकप्रियतेच्या वृद्धीचा चढता आलेख कायम राहील आणि कंपनीसाठी अधिकाधिक मूल्य निर्माण होत राहील.”  

या घोषणेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अफिलिएट सेल्सचे चीफ रेव्हेन्यू ऑफिसर श्री. अतुल दास यांनी सांगितले, “आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम मनोरंजन देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. २०१९ मध्ये नव्या किंमत प्रणालीने भारतात टेलिव्हिजनचा वापर आधी ज्याप्रकारे केला जात होता त्या पद्धतींमध्ये महत्त्वाचे परिवर्तन घडवून आणले. एका बाजूला वाहिन्यांच्या किमतींमध्ये पारदर्शकता आणली गेली तर दुसऱ्या बाजूला ग्राहकांना आपल्याला हव्या त्या वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले. एनटीओ 2.0 मुळे ग्राहकांना वाहिन्या निवडीमध्ये अधिक जास्त लवचिकतेचा लाभ घेता येईल. आम्ही देशभरातील आमच्या ग्राहकांना विविध किमतींचे वेगवेगळे गट उपलब्ध करवून देत राहू. झी कॅफे आणि अँडफ्लिक्स यासारखी प्रीमियम इंग्रजी चॅनेल्स एका स्वतंत्र बुकेमध्ये उपलब्ध होत राहतील. प्रत्येक बुकेमध्ये सर्वसामान्य मनोरंजन, चित्रपट, बातम्या, संगीत व जीवनशैली अशा वेगवेगळ्या वाहिन्यांची सरमिसळ असेल. हे परिवर्तन सहजपणे व्हावे यासाठी आमच्या डीपीओ भागीदारांकडून आम्हाला सहयोग मिळत राहील अशी आशा आहे.”ends

Be the first to comment on "‘झील’ ने एनटीओ 2.0 नुसार चॅनेलच्या किंमतींची घोषणा केली, आपल्या सर्व सब्स्क्रायबर्सना अमर्यादित मनोरंजनासह सर्वोत्तम मूल्य प्रदान करण्याच्या वचनबद्धतेला दिला दुजोरा"

Leave a comment

Your email address will not be published.


*