टेलिमेडिसिन व्यासपीठ आता भारतात जीटीएचई रुग्ण-डॉक्टर यांच्यादरम्यान टेलिकन्सल्टेशन घडवून आणणारे आरोग्यसेवा नेटवर्क

मुंबई, २० सप्टेंबर २०२१ (GNI): जागतिक पातळीवरील आरोग्यसेवा क्षेत्रातील ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म कंपनी सॉल्व्ह.केयरने भारतात आपले ग्लोबल टेलीहेल्थ एक्स्चेंज (जीटीएचई) नेटवर्क सुरु करत असल्याची घोषणा आज केली. जीटीएचई हे एक खुले, सीमारहित व रुग्ण-डॉक्टर यांच्यादरम्यान टेलिकन्सल्टेशन चटकन घडवून आणणारे आरोग्यसेवा नेटवर्क असून ते सॉल्व्ह.केयर प्लॅटफॉर्मवर चालते. भारतात जीटीएचईचे अधिकृत वितरक हेल्थलिंक टेक्नॉलॉजीज आहेत. आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्रातील या कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे.

जीटीएचई हे रुग्णांसाठी जगभरातील फिजिशियन्सची जागतिक डिरेक्टरी म्हणून कार्यरत असून, त्याठिकाणची काटेकोर पडताळणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर डॉक्टर्स याठिकाणी आपले स्वतःचे दर, ओळखपत्र, उपलब्धता अशी सर्व माहिती प्रकाशित करू शकतात आणि जगभरातील कुठल्याही भागात असलेल्या (ज्या ठिकाणी कायदेशीर परवानगी आहे त्या ठिकाणी) रुग्णांकडून अपॉईंटमेंट्स स्वीकारणे सुरु करू शकतात. जीटीएचईच्या विकेंद्रीकृत तांत्रिक संरचनेमुळे सर्व संवेदनशील माहिती विकेंद्रीकृत नोड्समध्ये अतुलनीय सुरक्षितपणे जमा करून ठेवली जाते. यामुळे रुग्णांना आपल्या आधीच्या वैद्यकीय नोंदी सहजपणे पाहता येतात व वैद्यकीय व्यावसायिकांसोबत शेअर करता येतील. हे सर्व अतिशय सुरक्षित व्यवस्थेमध्ये केले जात असल्याने रुग्णांना त्यांच्या माहितीच्या गोपनीयतेविषयी किंवा तिच्यामध्ये काही फेरफार होतील अशी काहीही चिंता करावी लागत नाही. यामुळे दरवेळी नव्या डॉक्टरकडे गेल्यानंतर कराव्या लागणाऱ्या अनावश्यक व पुन्हा-पुन्हा वैद्यकीय तपासण्यांमुळे खर्च होणारा वेळ व पैसे यांची बचत होईल. अशाप्रकारे आरोग्यसेवांचा जास्त सक्षमपणे लाभ घेता येईल. 

केयर.वॉलेट ऍपमार्फत देखील रुग्ण जीटीएचईचा लाभ घेऊ शकतात. हे सॉल्व्ह.केयरचे व्यक्तिगत आरोग्यसेवा सहकारी ऍप्लिकेशन असून गूगल प्ले स्टोर आणि ऍपल स्टोर वरून ते डाउनलोड करता येईल.  यामध्ये रुग्णांना अधिक जास्त जास्त सक्षमता आणि निवडीला अधिक जास्त वाव मिळतो कारण भौगोलिक सीमा आड न येता ते कोणत्याही डॉक्टर किंवा विशेषज्ञांसोबत संपर्क साधू शकतात. रुग्णांची सर्व माहिती स्वतः रुग्णांच्या मालकीची असते आणि त्यावर संपूर्ण नियंत्रण देखील रुग्णांचेच असते, त्यामुळे त्यांना आपल्या तब्येतीवर नीट लक्ष ठेवता येते तसेच ब्लॉकचेनचा वापर करून आपले वैद्यकीय अहवाल डॉक्टरांसोबत अगदी सुरक्षितपणे शेअर करता येतात.  याठिकाणी रुग्ण आपल्या प्रियजनांची केयर सर्कल्स तयार करू शकतात, जेणेकरून रुग्णांचे मित्र व कुटुंबीय त्यांच्या आरोग्यसेवा वाटचालीत त्यांची सक्रिय साथ देऊ शकतात.  बिलांचा भरणा सॉल्व्ह.केयरचे स्वतःचे चलन सॉल्व्ह टोकन, युएस डॉलर्स किंवा भारतीय रुपये वापरून थेट केयर.वॉलेट ऍपमध्येच करता येतो. 

सॉल्व्ह.केयरचे सीईओ श्री. प्रदीप गोयल यांनी सांगितले, “आरोग्यसेवेसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याने भारतात आरोग्यसेवा क्षेत्रात नवी क्रांती घडून येण्यासाठी नवी संधी निर्माण झाली आहे. आजच्या काळात देखील जर तुम्हाला एखाद्या स्पेशालिस्टची अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर साधारण महिन्याभरापेक्षा जास्त काळ थांबावे लागतेच.  पण ग्लोबल टेलीहेल्थ एक्स्चेंजसोबत आता रुग्ण जगभरातील कुठल्याही ठिकाणच्या डॉक्टर किंवा स्पेशालिस्टसोबत जवळपास पटकन कन्सल्टेशन करू शकतो. आरोग्यसेवा उपलब्ध करवून घेण्यात येणारे अडसर दूर करून जीटीएचई आजवर ज्यांना पुरेशा आरोग्यसेवा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत अशा अनेक लोकांना सेवा पुरवण्यात डॉक्टर सक्षम होतील आणि त्यांचे स्वतःचे उत्पन्न देखील वाढेल.” 

जीटीएचई संपूर्ण जगभरात वेगाने विस्तार करत आहे. भारतातील रुग्णांव्यतिरिक्त बांग्लादेश, बहारीन, ब्राझील, केनिया, कुवैत, नेपाळ, नायजेरिया, ओमान, पाकिस्तान, सौदी अरेबिया, श्रीलंका आणि युएईमधील रुग्ण देखील वैद्यकीय सल्ला मिळवण्यासाठी जीटीएचईमार्फत भारतीय नोंदणीकृत डॉक्टर्सशी संपर्क करू शकतात.ends

Be the first to comment on "टेलिमेडिसिन व्यासपीठ आता भारतात जीटीएचई रुग्ण-डॉक्टर यांच्यादरम्यान टेलिकन्सल्टेशन घडवून आणणारे आरोग्यसेवा नेटवर्क"

Leave a comment

Your email address will not be published.


*