मुंबई, ६ सप्टेंबर २०२१ (GNI):- सुप्रसिद्ध “लालबागचा राजा” च्या चरणी निष्ठापूर्वक सेवेची गेल्या दशकभराची यशस्वी परंपरा शेमारू एंटरटेनमेंट याही वर्षी कायम राखली जाणार आहे. “लालबागचा राजा” मंडळाच्या उत्सवाचे आणि पूजांचे थेट प्रक्षेपण शेमारूच्या सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर करण्यात येणार असल्याची घोषणा भारतातील या आघाडीच्या कन्टेन्ट पॉवरहाऊसकडून करण्यात आली आहे. यामध्ये शेमारूचे स्वतःचे ओटीटी शेमारूमीचा देखील समावेश असेल. या प्रक्षेपणामुळे गणेशभक्तांना घरबसल्या आपल्या लाडक्या “लालबागचा राजा” चे “लाईव्ह दर्शन” घेण्याचा लाभ मिळणार आहे. शेमारू ‘लालबागचा राजा’ चा कन्टेन्ट (व्हिडीओ आणि इमेजेस) देशभरातील सर्व आघाडीच्या टेलिकॉम ऑपरेटर्सना तसेच इतर ऑनलाईन व डीटीएच प्लॅटफॉर्म्सना देखील वितरीत करेल.
शेमारूमी ऍप डाउनलोड करून दर्शक कधीही, कुठेही श्रीगणेशाच्या लाईव्ह दर्शनाचा आणि महाआरतीचा लाभ सर्व स्क्रीन्सवर घेऊ शकतील. सर्व डीटीएच ऑपरेटर्सवर शेमारूच्या सब्स्क्रिप्शन सर्व्हिसेसवर देखील दर्शक प्रक्षेपण पाहू शकतील. शेमारूचे भक्ती ऍप ‘शेमारू भक्ती’ वर देखील हे प्रक्षेपण उपलब्ध असेल. कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता लाईव्ह दर्शन पाहण्यासाठी ऍप डाउनलोड करून घेण्यासाठी फक्त 9983371222 या क्रमांकावर एक मिस्ड कॉल द्या.
शेमारू एंटरटेनमेंटचे सीईओ श्री. हिरेन गडा यांनी सांगितले, “आम्हाला खूप आनंद होतो आहे की यावर्षी देखील आम्ही लालबाग गणेशोत्सव मंडळासोबत सहयोगामार्फत भक्तांच्या लाडक्या बाप्पाचे आशीर्वाद घराघरांमध्ये पोहोचवणार आहोत. महामारीमुळे गर्दी न करणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे, आम्ही अशी आशा करतो की, सध्याच्या परिस्थितीत जे स्वतः जाऊन दर्शन घेऊ शकत नाहीत त्यांना या थेट प्रक्षेपणामुळे ऑनलाईन दर्शनाचा लाभ मिळेल. तंत्रज्ञानाच्या शक्तीचा लाभ घेऊन सर्वात लोकप्रिय गणेश मंडळाच्या उत्सवाचे थेट प्रक्षेपण आम्ही भक्तांच्या घराघरांमध्ये पोहोचवू शकणार आहोत याचा आम्हाला खूप आनंद होत आहे.”
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव श्री. सुधीर साळवी यांनी सांगितले,” शेमारूसोबतचा आमचा हा सहयोग गेल्या दशकभरापासून कायम आहे. यामुळे लाखो भक्तांना स्वतः येता आले नाही तरी श्रीगणेशाच्या दर्शनाचा लाभ घेता येतो. यावर्षी महामारीमुळे आपल्याला अधिक जास्त काळजी घेणे व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. स्वतः लालबागला येऊन बाप्पाचे आशीर्वाद घेऊ शकत नाहीत अशा लाखो भक्तांसाठी लाईव्ह दर्शन वरदान ठरणार आहे. सर्व प्लॅटफॉर्म्सवर पोहोचण्याची क्षमता शेमारूकडे असल्यामुळे भक्तांना लालबागचा राजाचे लाईव्ह दर्शन आपल्या सुविधेनुसार घेता येणार आहे. शेमारूच्या या सहयोगाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”ends
Be the first to comment on "‘लालबागच्या राजा’ चे लाईव्ह दर्शन देणार शेमारू ‘लालबागचा राजा’ मंडपातून शेमारूच्या थेट प्रक्षेपण सेवेमुळे गणेश उत्सवाचे मंगलमय वातावरण घराघरांत अवतरणार"