मुंबई, २३ ऑगस्ट २०२१ (GNI): मेडिकाबझार या वैद्यकीय साधनसामग्री पुरवणाऱ्या भारतातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मने विशेष कोविड आयसीयू पॅकेजेस आणली आहेत, ज्यामुळे देशभरातील रुग्णालये, नर्सिंग होम्स आणि वैद्यकीय आस्थापनांना अत्यवस्थ रुग्णांना पुरवल्या जाणाऱ्या सेवासुविधांमध्ये अतिशय सुविधाजनक पद्धतीने वाढ करता येईल. कोविड महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये देशभरात, खास करून द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये आरोग्य सेवासुविधांमध्ये आढळून आलेल्या कमतरता भरून काढण्यात मेडिकाबझारच्या वैद्यकीय तज्ञांनी तयार केलेली ही विशेष आयसीयू पॅकेजेस मदत करतील. आज संपूर्ण देश कोविडच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर येत असताना मेडिकाबझारने अतिशय विचारपूर्वक आणि मेहनतीने तयार केलेली इमर्जन्सी पेडियाट्रिक आयसीयू आणि कोविड आयसीयू पॅकेजेस देशभरातील आरोग्य यंत्रणेला भविष्यात काही साथी किंवा महामारी उद्भवल्यास त्यांना सहज व सुविधाजनक पद्धतीने सामोरे जाण्यासाठी मदत करतील.
मेडिकाबझारचे संस्थापक व सीईओ श्री. विवेक तिवारी यांनी सांगितले, “अत्यवस्थ रुग्णांसाठी भारतात उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवा सुविधा विकसित देशांच्या तोडीच्या असणे गरजेचे आहे. देशात उपलब्ध असलेल्या आयसीयू बेड्सच्या संख्येबाबतच्या माहितीवरून असे आढळून येते की, भारतात प्रत्येकी १,००,००० लोकसंख्येमागे फक्त २.३ क्रिटिकल केयर बेड्स आहेत तर दक्षिण कोरिया व सिंगापूरसारख्या विकसित देशांमध्ये हेच प्रमाण १० ते ११ बेड्स इतके जास्त आहे. लहान मुलांसाठीच्या अतिदक्षता विभागांची उपलब्धता भारतात अजूनच कमी आहे. वैद्यकीय सोयीसुविधांबाबत वाढलेली जागरूकता, पायाभूत आरोग्यसेवांमध्ये वाढ करण्यावर सरकारकडून दिला जात असलेला भर आणि सध्याच्या आव्हानांचा मुकाबला करण्याचा कॉर्पोरेट भारताचा संकल्प यामुळे आरोग्यसेवासुविधा क्षेत्रामध्ये क्रांती घडून येणे अटळ आहे. आम्ही जी विशेष आयसीयू पॅकेजेस सादर करत आहोत ती या सर्व परिवर्तनामध्ये मोलाची भूमिका बजावतील आणि महामारीच्या तसेच महामारीनंतरच्या काळात आयसीयू सुविधांची गंभीर कमतरता भरून काढण्यात मदत करतील. या पॅकेजेसच्या साहाय्याने एखाद्या मोठ्या हॉल किंवा खोलीमध्ये किंवा कोविड सेंटर्ससारख्या तात्पुरत्या वातानुकूलित ठिकाणी, कोणत्याही जागी अगदी काही दिवसांत अतिदक्षता विभाग उभारले जाऊ शकतात.”
कोविड-१९ ने गंभीर आजारी असलेल्या रुग्णावर पुरेसे उपचार करण्यासाठी सुसज्ज व्हेंटिलेटर असलेले आयसीयू बेड्स, आयजोलेशन गाऊन, एन९५ रेस्पिरेटर्स, हातमोजे इत्यादी व्यक्तिगत सुरक्षा साधने आणि पुरेसे रुग्णालय कर्मचारी अशा अनेक संसाधनांची गरज असते. आयसीयू पायाभूत सेवासुविधांमध्ये वेगाने वाढ करण्यासाठी आयसीयू पॅकेजेस मदत करतील. पेडियाट्रिक आयसीयू पॅकेजमध्ये बायपॅप मशीन, नेब्युलायजर, पेंशट मॉनिटर, पोर्टेबल सक्शन मशीन आणि व्हेंटिलेटर यांचा समावेश आहे. वयस्कांसाठीच्या कोविड आयसीयू पॅकेजमध्ये बायपॅप मशीन, आयसीयू बेड, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, पेशंट मॉनिटर, पल्स ऑक्सिमीटर आणि व्हेंटिलेटर यांचा समावेश आहे.
अतिदक्षता विभाग उभारण्याची इच्छा असलेल्या पण आर्थिक समस्या भेडसावत असलेल्या रुग्णालयांना आणि नर्सिंग होम्सना काळजी करण्याची गरज नाही कारण मेडिकाबझारने विविध फायनान्स कंपन्यांसोबत हातमिळवणी करून सुविधाजनक अर्थसहाय्याचे पर्याय व क्रेडिट लाईन्स देखील उपलब्ध करवून दिले आहेत. प्रत्येक वैद्यकीय आस्थापनेच्या गरजा पूर्ण करता याव्यात या दृष्टीने मेडिकाबझार फ्रीडमने स्मार्ट व लवचिक सुविधा तयार केल्या आहेत, ज्यामध्ये खूपच मर्यादित कागदपत्रांची आवश्यकता असते.ends
Be the first to comment on "‘मेडिकाबझार’ आरोग्य सेवा-सुविधा क्षेत्रामध्ये क्रांती घडवेल, देशभरात पायाभूत सेवा-सुविधांमध्ये आरोग्य यंत्रणेला भविष्यात ‘मेडिकाबझार’ महामारी विरोधात सक्षम करेल"