कल्याण ज्वेलर्सची शोरूम्स पुन्हा सुरु होत असल्याच्या निमित्ताने आयोजित केला जात आहे ‘बिग डिस्काऊंट मेळा’, १०० कोटी रुपयांची गिफ्ट व्हाउचर्स, आकर्षक सूट आणि गोल्ड रेट प्रोटेक्शन यांचे लाभ मिळवण्याची सुवर्णसंधी

मुंबई, 9 जुलै 2021 (GNI): कल्याण ज्वेलर्स भारतभरातील आपली शोरूम्स टप्प्याटप्प्याने आणि राज्याराज्यांमधील नियमांचे पालन करून पुन्हा सुरु करण्यासाठी तयारी करत आहे.  शोरूम्स पुन्हा सुरु झाल्यानंतर त्याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला खरेदीसाठी अतिशय सुरक्षित वातावरण मिळावे यावर भर देण्याच्या बरोबरीनेच जास्तीत जास्त खरेदीला अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी भरघोस सूट आणि आकर्षक ऑफर्स असलेला ‘बिग डिस्काऊंट मेळा’ देखील कल्याण ज्वेलर्समध्ये आयोजित केला जाणार आहे.

एकूण तब्बल १०० कोटी रुपयांच्या, त्वरित रीडीम करता येतील अशा व्हाउचर्समुळे ग्राहकांना खरेदीचे भरपूर लाभ मिळवता येतील. इतकेच नव्हे तर, भरघोस सूट देखील दिली जात असल्याने ग्राहकांना “सोन्याहून पिवळे” अशाप्रकारे खरेदीचे सर्वाधिक मूल्य मिळवता येईल.  सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २५ टक्क्यांपर्यंतची आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर २५ टक्के सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे.  याशिवाय अनकट व मौल्यवान खड्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहकांना तब्बल २० टक्क्यांपर्यंत सूट मिळवता येईल.  या वर्षभरात नंतर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी गोल्ड रेट प्रोटेक्शन योजना उपलब्ध करवून दिली गेली आहे.  यामध्ये त्यांच्या इच्छित खरेदीच्या मूल्याच्या फक्त १०% रक्कम आगाऊ भरून गोल्ड रेट प्रोटेक्शनचे लाभ मिळवता येतील.  कल्याण ज्वेलर्सच्या ग्राहकांसाठी ही खूप मोठी सुवर्णसंधी ठरेल यात काहीच शंका नाही.

कल्याण ज्वेलर्सने आपली शोरूम्स पुन्हा सुरु झाल्यानंतर तेथील सर्व कर्मचारी आणि ग्राहकांना सुरक्षित रिटेल वातावरणाचा लाभ घेता यावा यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत.  कर्मचाऱ्यांचे संपूर्ण किंवा अर्धे लसीकरण झालेले आहे (कोविडमधून बरे झाल्यानंतर त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज निर्माण झालेल्या नसतील तर), तसेच थर्मल गन्सने तापमान तपासणीसारख्या सर्वसामान्य सुरक्षा प्रक्रियांबरोबरीनेच डबल मास्किंग, ग्राहकांना सुरक्षा हातमोजे पुरवणे, जिथे व्यक्तींचा सर्वाधिक संपर्क येतो अशा सर्व जागांची वारंवार संपूर्ण स्वच्छता केली जाणे, स्टेरिलायझेशन आणि संपर्करहित बिलिंग या काटेकोर उपाययोजना देखील राबवण्यात येत आहेत.

कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. टीएस कल्याणरमण यांनी सांगितले, सुरक्षित वातावरण आणि लसीकरण झालेले कर्मचारी यांच्यासह अद्वितीय रिटेल अनुभव आमच्या सर्व ग्राहकांना घेता यावा हे सुनिश्चित करणे ही आमची सर्वात मोठी प्राथमिकता आहे.  आमच्या प्रत्येक शोरूममध्ये आम्ही सेफ मेजर ऑफिसर्स (एसएमओ) तैनात केले आहेतशोरूममध्ये सर्व कोविड सुरक्षा नियमांची अंमलबजावणी होते आहे अथवा नाही हे पाहण्याची जबाबदारी त्यांची असेल.”  ते पुढे म्हणाले, प्रत्येक ग्राहकाला आपल्या खरेदीतून सर्वाधिक मूल्य मिळवता यावे याला आमची कंपनी सर्वात जास्त प्राधान्य देते.  सध्या ज्याप्रकारचे अनिश्चित वातावरण आहे अशा काळात सोने ही खूप मोठी सुरक्षितता मानली जाते आणि आमच्या गोल्ड रेट प्रोटेक्शन योजनेमुळे ग्राहकांना उतरत्या किंवा सतत बदलत्या सोन्याच्या किमतींचे लाभ घेता येतील.  बिग डिस्काउंट मेळा आयोजित करून आम्ही आमच्या ग्राहकांना उत्तमोत्तम खरेदीबरोबरीनेच अनेक अतिरिक्त लाभ देखील प्रदान करत आहोत.”

भारतभरातील सर्व शोरूम्समध्ये ‘बिग डिस्काउंट मेळा’ ऑगस्ट महिना संपेपर्यंत सुरु राहील.  सोशल डिस्टंसिंगची गरज मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, त्या अनुषंगाने कल्याण ज्वेलर्सने लाईव्ह व्हिडिओ शॉपिंग सुविधा देखील (https://campaigns.kalyanjewellers.net/livevideoshopping/) सुरु केली आहे.  या सुविधेचा लाभ घेऊन ग्राहक कल्याण ज्वेलर्सची ज्वेलरी कलेक्शन्स पाहू शकतात.

कल्याण ज्वेलर्समध्ये विकले जाणारे सर्व दागिने बीआयएस हॉलमार्क्ड असतात आणि अनेक शुद्धता तपासण्या यशस्वीपणे पार केल्यानंतरच ते विक्रीसाठी ठेवले जातात.  ग्राहकांना दागिन्यांसोबत कल्याण ज्वेलर्सचे ४-लेव्हल अश्युरन्स सर्टिफिकेट मिळते ज्यामध्ये शुद्धता, दागिना टिकून आहे तोवर त्याची निःशुल्क देखरेख, उत्पादनाची तपशीलवार माहिती आणि पारदर्शक एक्स्चेंज व बाय-बॅक धोरणे यांची हमी दिलेली असते.  आपल्या प्रत्येक ग्राहकाला सर्वकाही सर्वोत्तम देण्यासाठी ब्रँड वचनबद्ध असून त्याचा एक भाग म्हणून हे सर्टिफिकेशन दिले जात आहे.

ब्रॅंडविषयी अधिक माहितीसाठी, त्यांची कलेक्शन्स आणि ऑफर्स याबद्दल जाणून घेण्यासाठी कृपया येथे संपर्क साधावा:  https://www.kalyanjewellers.net/

कल्याण ज्वेलर्स: केरळमध्ये थ्रिसूर येथे मुख्यालय असलेले कल्याण ज्वेलर्स हे भारतातील सर्वात मोठ्या ज्वेलरी रिटेलर्सपैकी एक असून मध्य पूर्वेत देखील त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. गेली दोन दशके कल्याण ज्वेलर्स भारतीय बाजारपेठेत उत्तम कामगिरी बजावत आहे.  गुणवत्ता, पारदर्शकता, किंमत आणि नावीन्य याबाबतीत कल्याण ज्वेलर्सने दागिने उद्योगक्षेत्रात मापदंड निर्माण केले आहेत.   कल्याण ज्वेलर्समध्ये सोने, हिरे आणि मौल्यवान खाड्यांपासून बनलेल्या पारंपरिक तसेच आधुनिक पद्धतीच्या वैविध्यपूर्ण दागिन्यांच्या विशाल श्रेणी उपलब्ध असून ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा याठिकाणी नक्कीच पूर्ण होतात.  मध्य पूर्व आणि भारतात त्यांची एकूण १४६ शोरूम्स आहेत.ends

Be the first to comment on "कल्याण ज्वेलर्सची शोरूम्स पुन्हा सुरु होत असल्याच्या निमित्ताने आयोजित केला जात आहे ‘बिग डिस्काऊंट मेळा’, १०० कोटी रुपयांची गिफ्ट व्हाउचर्स, आकर्षक सूट आणि गोल्ड रेट प्रोटेक्शन यांचे लाभ मिळवण्याची सुवर्णसंधी"

Leave a comment

Your email address will not be published.


*