बँकॉक : ३१ मे २०२१ (GNI): जगातील सर्वात मोठा रत्ने व आभूषणांचा व्यापार मेळा असणारा बँकॉक जेम्स अँड ज्वेलरी फेअर (बीजीजेएफ) येत्या २२ ते २४ जून २०२१ दरम्यान दूरदृकसंवाद (आभासी) माध्यमातून “बीजीजेएफ व्हर्च्युअल ट्रेड फेअर” (६६ वे विशेष पर्व)” या नावाने आयोजित केले जात आहे. ”.
या व्यापार मेळ्यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण उत्पादने, अनेक उद्योन्मुख व नावाजलेले कारागीर आणि डिझाइनर, जगातील सर्वोच्च शिल्पकारांचे उत्कृष्ट कलाकृती आणि राष्ट्रीय स्तरावर नामांकित उत्पादक कंपन्यांचा सहभाग असेल. कोविड-१९ निर्बंध असूनही जगभरातील खरेदीदार आणि निर्यातदार व्यवसाय करण्यास आणि परस्परांशी दीर्घकालीन व्यापार संबंध तयार करण्यास सक्षम बनतील या उद्देशाने हे रत्न आणि आभूषण मेळा व्यापार आणि नेटवर्किंगसाठी ऑनलाइन व्यासपीठ म्हणून काम करेल.
थाई सिल्व्हर एक्स्पोर्टर्स असोसिएशन, डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन (डीआयटीपी) या सारख्या या उद्योग क्षेत्रातील महत्वाच्या संस्था, वाणिज्य मंत्रालय आणि संलग्न सरकारी संस्था यांच्याकडून व्यावसायिक आणि व्यक्तींना आवश्यक व उपयुक्त माहिती पुरविली जाण्यासह त्यांच्या खरेदीच्या प्रक्रियेला मदत केली जाईल.
आशियातील मुख्य ज्वेलरी निर्यातदारांपैकी एक असलेले थायलंड हे दागिन्यांची संसाधने, डिझाइन, उत्पादन आणि उत्कृष्ट कारागिरीसाठी प्रसिद्ध आहे. अलीकडच्या काही वर्षात, सोने अथवा प्लॅटिनम या धातूंच्या तुलनेत परवडण्याजोग्या तरी मौल्यवान असलेल्या येथील चांदीच्या आभूषणांनी चांगलीच लोकप्रियता मिळविली आहे. जानेवारी ते मार्च २०२१ तिमाहीतील थाई सिल्व्हर ज्वेलरीचे एकूण निर्यात मूल्य ३७.१३ कोटी अमेरिकी डॉलर इतके आहे, जे गतवर्षातील याच कालावधीतील निर्यातीच्या तुलनेत ६.४६ टक्क्यांनी अधिक आहे. ही वाढ मुख्यत: वाढती मागणी आणि वधारलेल्या विक्री उलाढालीचे द्योतक आहे, असे डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन (डीआयटीपी)चे म्हणणे आहे. या उद्योग क्षेत्राला संपूर्ण २०२१ सालात चांदीच्या आभूषणांच्या विक्रीत निरंतर वाढ सुरू राहण्याची आशा आहे.
याव्यतिरिक्त, चांदीची आभूषणे आकस्मिक, पारंपारिक, पाश्चिमात्य किंवा व्यावसायिक पेहराव यापैकी कशाशीही चांगलली जुळून येतात. पुरुषांनी ब्रेसलेट, साखळी, रिंग इत्यादी चांदीच्या दागिन्यांसाठी पसंती दाखविली आहे. दागिने प्रेमी आणि जाणकार कलेक्टर्ससाठी चांदीचे दागिने हा एक अग्रगण्य आवडता प्रकार बनला आहे. चांदीच्या या अष्टपैलुत्वामुळे चित्ताकर्षक आणि विशिष्ट देखावा तयार करण्याचा प्रयत्न करीत असलेल्यांसाठी या दागिन्यांचा पेहराव प्रशंसाकारक ठरला आहे.
कोविड-१९ महामारीमुळे दागिने आणि संलग्न साधनांकडे ग्राहकांची फिरलेली पाठ आणि या उद्योगक्षेत्राने जपलेली गतिमानता आणि ग्राहकांच्या बदल्यात वर्तनानुरूप केलेल्या फेरबदलामुळे पुन्हा दागिन्यांकडे वळू लागली आहे. याचे ढळढळीत निदर्शक म्हणजे जागतिक आभूषणांची बाजारपेठेचे आकारमान जे २०२० मध्ये २३० अब्ज अमेरिकी डॉलर होते, ते २०२५ पर्यंत २९२ अब्ज डॉलरची पातळी गाठू शकेल, हा स्टॅटिस्टा डॉट कॉमने वर्तविलेला अंदाज आहे.
थायलंडचा रत्न व आभूषण उद्योग हा सोर्सिंग, डिझाइनिंग, पॅकेजिंगपासून ते मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत ओईएम सेवांच्या बाबतीत लवचिकता प्रदान करतो. खरेदीदार त्यांच्या गरजा, गुणवत्ता, मागणीचे प्रमाण आणि बजेट यावर लक्ष ठेऊन पसंतीचे दागिने मिळवू शकतात आणि म्हणून थायलंडने आशियातील ज्वेलरी ट्रेडिंगचे एक प्रमुख केंद्र बनण्यापर्यंत मजल मारली आहे. जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान १४.३९ कोटी डॉलरच्या निर्यातीससह भारत हा थायलंडच्या मुख्य निर्यात बाजारपेठांपैकी एक आहे. उत्तम कारागिरी, उत्कृष्ट गुणवत्ता आणि स्पर्धात्मक किंमतीतील चांदीचे दागदागिने व इतर वस्तूंशिवाय, भारतीय बाजारपेठ ही रंगीत थाई रत्नांची तिसर्या क्रमांकाची खरेदीदार आहे. अधिक तपशिलासाठी कृपया संपर्क साधावाविवेक के. – 9619454920.
Be the first to comment on "बँकॉक जेम्स अँड ज्वेलरी फेअर (बीजीजेएफ): आशिया खंडातील सर्वात मोठा आभासी रत्न व आभूषणे व्यापार मेळा २२-२४ जून २०२१ दरम्यान आयोजनास सज्ज"