लॅपटॉपच्या ८२% समस्या हार्डवेयरशी आणि १८% समस्या सॉफ्टवेयर संबंधित असतात, लॉकडाऊनमध्ये ‘ऑनसाईटगो’ ने केलेल्या श्वेतपत्रिकेमधील निष्कर्ष

मुंबई, ६ एप्रिल २०२१ (GNI): अभ्यास, ऑफिसचे काम, व्यवसाय-उद्योग अशा सर्वच गोष्टी घरून कराव्या लागत असल्याने लॅपटॉप्सचा वापर आणि त्यामध्ये उद्भवणाऱ्या समस्यांचे प्रमाण देखील वाढले आहे यात नवल काहीच नाही. ‘ऑनसाईटगो’ ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या श्वेतपत्रिका अहवालामध्ये भारतात सध्या भेडसावत असलेल्या, लॅपटॉप्सशी संबंधित सर्वात मोठ्या समस्यांची माहिती देण्यात आली आहे. ‘ऑनसाईटगो’ हा विविध डिव्हायसेस आणि उपकरणांच्या विक्री-पश्चात सेवा प्रदान करणारा आघाडीचा ब्रँड आहे. देशभरात लॅपटॉपसंबंधी समस्यांच्या ८००० प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर ही श्वेतपत्रिका प्रकाशित करण्यात आली आहे.  या श्वेतपत्रिकेत असे नमूद करण्यात आले आहे की, लॅपटॉपच्या ८२% पेक्षा जास्त समस्या या हार्डवेयरशी संबंधित असतात तर सॉफ्टवेयरच्या समस्यांचे प्रमाण फक्त १८% असते.

हार्डवेयरमध्ये डिस्प्ले आणि कीबोर्ड समस्या खूप जास्त असल्याचे आढळून आले आहे तर सर्वात जास्त म्हणजे तब्बल २७% समस्या वाय-फाय कनेक्टिविटीशी संबंधित आहेत.  कीबोर्ड आणि ट्रॅकपॅडमध्ये बिघाडाची प्रकरणे १८% आहेत डिस्प्ले खराब होण्याच्या आणि बॅटरी, चार्जिंगसंबंधी तक्रारी अनुक्रमे १५% व ८% आहेत.  इतर वेगवेगळ्या तक्रारी जसे ऑडिओ, ब्ल्यूटूथ, एक्झॉस्ट फॅन्स, हार्ड डिस्क, ओव्हरहीटिंग, फिजिकल डॅमेज, पॉवर बटन आणि वेबकॅम इत्यादींचे प्रमाण फक्त २% आहे.  काही केसेसमध्ये जेव्हा समस्येचे मूळ कारण पटकन समजून येत नाही तेव्हा मदरबोर्डमध्ये काही न काही बिघाड झालेला असतो. सॉफ्टवेयरमध्ये सर्वाधिक समस्या रिसोर्स-हंग्री ऍप्लिकेशन्समध्ये आढळून येतात, लॅपटॉप सर्व्हिस रिक्वेस्ट्समध्ये जवळपास अर्ध्या (५०%) समस्या याच्याच असतात. ४१% प्रकरणांमध्ये लॅपटॉप कामाच्या मध्येच बंद पडल्याच्या तक्रारी केल्या जातात, अपुरे बॅकग्राऊंड ऍप्स, मालवेयर, व्हायरसेस यामुळे हे होत असते.  विंडोज अपडेट्समुळे उद्भवणाऱ्या समस्या सर्वात कमी म्हणजे फक्त ४% असतात.

श्री.कुणाल महिपाल, सीईओ, ऑनसाईटगो यांनी सांगितले, “महामारीमध्ये लॅपटॉप्सची मागणी लक्षणीय प्रमाणात वाढली.  आता स्मार्टफोन्सच्या बरोबरीने लॅपटॉप्स देखील भारतातील घराघरात वापरले जात आहेत. लॅपटॉप्सचा खूप जास्त वापर आणि त्यांची देखभाल नेमकी कशी करावी याबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे ग्राहकांकडून येणाऱ्या लॅपटॉप्स बिघडल्याच्या तक्रारींमध्ये सुद्धा वाढ होऊ लागली आहे. या श्वेतपत्रिकेमध्ये आपल्याला आजच्या ग्राहकांना लॅपटॉप्सच्या वापरामध्ये भेडसावत असलेल्या अगदी सर्वसामान्य समस्यांबद्दल वास्तविक माहिती मिळते.” 

श्वेतपत्रिकेमध्ये आढळून आलेली एक रोचक बाब म्हणजे लॅपटॉप जितका जास्त महाग असतो तितकाच त्याचा दुरुस्तीचा खर्च देखील जास्त असतो.  उदाहरणार्थ, ४०,००० रुपये किंमतीचा लॅपटॉप दुरुस्त किंवा सर्विसिंग करून घेण्यासाठी लॅपटॉपच्या किमतीच्या १५% ते ४५% इतका खर्च येतो. अर्थात नेमकी समस्या काय आहे यावर हा खर्चाचा आकडा अवलंबून असतो.  पण ५०,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या लॅपटॉप्ससाठी लॅपटॉपच्या किमतीच्या ४०% ते ९०% खर्च येतो. ऍपलचे मॅकबुक आणि मायक्रोसॉफ्टचे सरफेस लॅपटॉप्स दुरुस्त करण्याचा सरासरी खर्च २०,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त येतो. तर एसस, डेल, एचपी आणि लेनोवो यासारख्या ब्रँड्सच्या लॅपटॉप्सचा दुरुस्तीचा खर्च १०,००० रुपयांपेक्षा कमी असतो.ends

Be the first to comment on "लॅपटॉपच्या ८२% समस्या हार्डवेयरशी आणि १८% समस्या सॉफ्टवेयर संबंधित असतात, लॉकडाऊनमध्ये ‘ऑनसाईटगो’ ने केलेल्या श्वेतपत्रिकेमधील निष्कर्ष"

Leave a comment

Your email address will not be published.


*