कोकणातील चाकरमान्यांचा ‘शिमगोत्सव’ साजरा होणार ऑनलाईन, चाकरमान्यांची श्रद्धा व भावना पाहून तमाम मुंबईकरांना ‘डिजिटल’ रुपात शिमगोत्सवाचा आनंद घेता येईल

मुंबई, २५ मार्च २०२१ (GNI): काय मग मंडळी आता यंदाचा आपला शिमगोत्सव अगदी तोंडावर आलाय ना… शिमगोत्सव म्हटला की प्रत्येक चाकरमानी एका वेगळ्याच उत्साहाने फुलून जातो. गणेशोत्सव काय किंवा शिमगोत्सव काय… प्रत्येक चाकरमानीच्या काळजातले सण. शिमगोत्सवात आपल्या ग्रामदैवतांच्या पालखीला, भेटीला गावी आला नाही असा चाकरमानी विरळाच नाही का? कोरोना काळात आणि सध्याच्या वाढत्या केसेस लक्षात घेता, कार्यक्रम ऑनलाईन करून सर्व चाकरमानी, कोकणकर यांच्या पर्यंत त्यांच्या गावाचा महोत्सव पाहता यावा, सोशल मीडियाचा योग्य उपयोग व्हावा, डिजिटल माध्यमांचा उपयोग आपला इतिहास, कला, संस्कृती, परंपरा जपून व जतन करण्यासाठी करावा, दापोलीत डिजिटल माध्यमांचा उपयोग करून मुंबई पुण्यात असलेल्या चाकरमान्यांना हा सोहळा बघता आला याचे उदाहरण उभे करणे हे ह्या मागचे प्रमुख उद्द्येश आहे

पण मंडळी, गेल्यावर्षीचा शिमगोत्सव आपण उत्साहात साजरा केला, पण त्यानंतरचे संपूर्ण वर्ष कोरोना महामारीच्या काळ्या गडद छायेतच गेले आहे.  हा कोरोना नावाचा राक्षस कसा कुठून आला काय माहीत, पण त्याने भारतासह संपूर्ण जगास जणू वेठीस धरले आहे. या आजाराचा सामना करायचा तर प्रत्यक्ष युद्धात न उतरता घरातच थांबून, योग्य ती स्वच्छतेची काळजी घेऊन, दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवून, तोंडावर मास्क लावून या शत्रुशी लढता यावे यासाठी सरकारने नागरिकांसाठी अतिशय कडक कायदे व निर्बंध लागू केले आहेत. अगदी आतादेखील हे सारे निर्बंध तसेच लागू आहेत. आता तर खास कोकणातील शिमगोत्सवासाठी सरकारने काही कडक निर्बंध व अटी घातल्या आहेत. या नियमांच्या अधिन राहूनच कोकणवासियांना आपला पारंपारिक लोकप्रिय शिमगोत्सव साजरा करायचा आहे.

यंदाच्या पारंपारिक शिमगोत्सवात आपले मुंबईकर बांधव प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नसले तरीही अशा चाकरमान्यांची श्रद्धा व भावना पाहून तमाम दापोलीकरांना ‘डिजिटल’ रुपात शिमगोत्सवाचा आनंद व समाधान देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून दापोलीच्या कला, संस्कृती व इतिहास या विषयांसाठी वाहून घेतलेल्या आमच्या talukadapoli.com या संस्थेने पुढाकार घेतला आहे. आम्ही तालुका दापोली डॉट कॉम व दापोली पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमातून तमाम दापोलीकरांना यंदाच्या शिमगोत्सवाचा प्रत्यक्ष आनंद देण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपणास यंदाचा नवा कोरा शिमगोत्सव अगदी घरबसल्या पाहता येईल. हा शिमगोत्सव डिजिटल स्वरुपात असला तरीही तो आपणा सर्वांना प्रत्यक्ष…. अगदी डोळ्यांसमोर पाहिल्याचा अनुभव मिळेल याची संपूर्ण खबरदारी आम्ही तालुका दापोली डॉट कॉम घेणार आहोत.

आमच्या तालुका दापोली डॉट कॉमच्या माध्यमातून तमाम दापोलीकरांना पारंपारिक पण डिजिटल शिमगोत्सवाचा आनंद देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आपण आपल्या गावातल्या शिमगोत्सवाचे पारंपरिक व वैशिष्टय़पूर्ण व्हिडीओज आमच्याकडे पाठवायचे आहेत. लवकरात लवकर प्राप्त होणाऱ्या व्हिडीओज आमच्या www.talukadapoli.com च्या माध्यमातून प्रसारीत केले जातील. हे व्हिडिओ करताना खालील अटींचे पालन आवश्यक आहे –

1. व्हिडीओ जास्तीत जास्त तीन मिनिटांचाच असावा. मात्र असे कितीही व्हिडिओज आपण पाठवू शकता.

2. व्हिडिओ शूट करताना मोबाईल कॅमेरा किंवा डिजिटल कॅमेरा 1920×1080 याच resolution मध्ये      

     सेट करावा.

3. व्हिडिओ करण्याआधी संबंधित ठिकाणी शासनाने जारी केलेल्या अटी व नियमांचे काटेकोर पालन

    दिसावे. जसे की, तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्सिंग वगैरे.

4. व्हिडिओ करताना मोबाईल आडवा धरलेला असावा.

5. व्हिडिओ करताना मोबाईल कॅमेरा उत्तम दर्जाचा असावा जेणेकरून चित्रण उत्तम दर्जाचे होईल.

6. रात्रीच्या वेळेस व्हिडिओ करताना फ्लॅशलाईट ऑन करून किंवा योग्य लाईटस् चा वापर करुन व्हिडिओ

    करावा.

7. व्हिडिओ करताना मोबाईल हलवू नये.

8. वरील अटींची पूर्तता करणारे व्हिडिओ त्वरित पाठवावा संपर्क – दिपक सूर्यवंशी – 9637904453 /विशाल बोरघरे- 9673959333

चला तर मग, www.talukadapoli.com च्या यु ट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाटस् ॲप या माध्यमांतून व दापोली पोलीस स्टेशनच्या सहकार्यातून यंदाच्या शिमगोत्सवाचा आस्वाद घेऊया.A request from Dapoli Police for the event with : https://www.youtube.com/watch?v=TOHpnB92qbs

Be the first to comment on "कोकणातील चाकरमान्यांचा ‘शिमगोत्सव’ साजरा होणार ऑनलाईन, चाकरमान्यांची श्रद्धा व भावना पाहून तमाम मुंबईकरांना ‘डिजिटल’ रुपात शिमगोत्सवाचा आनंद घेता येईल"

Leave a comment

Your email address will not be published.


*