मुंबई, ११ मार्च 2021 (GNI): ‘लॉ’ या विषयात जगभरातील लॉ स्कूलमधून ओ. पी. जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या जिंदल ग्लोबल लॉ स्कूल (JGLS) ला 76 वे क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग लाभले आहे. या सन्मानाने पुन्हा एकदा JGLS भारतातील पहिल्या क्रमांकाची लॉ स्कूल ठरली. यंदा ही क्रमवारी प्राप्त करणारी JGLS ही एकमेव भारतीय संस्था आहे. यंदा जागतिक क्रमवारीत 76 वे स्थान पटकावलेल्या JGLS ने मागील वर्षीच्या 101-150 ब्रॅकेटमधून बाहेर आहे. JGLS ला 2021 दरम्यान विषयात क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगद्वारे ‘कर्मचारी प्रतिष्ठा’ आणि ‘शैक्षणिक प्रतिष्ठा’ या निकषांवर जगभरात अनुक्रमे 33 आणि 58 क्रमवारी लाभली आहे. JGLS च्या संशोधन प्रशस्तीत 45%ची वृद्धी तर एच-इंडेक्स ऑफ रिसर्च आऊटपूटमध्ये 25%ची वाढ झाली.
जगातील एकंदर 976 लॉ स्कूलचा विचार केल्यास केवळ 320 लॉ स्कूलला 2021 (लॉ) विषयात क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग प्राप्त झाले आहे. ही प्रतिष्ठीत क्रमवारी मिळवण्यासाठी कायदे विषयाशी निगडीत अनेक संस्थांचा सहभाग दिसून आला. त्यातुलनेत अन्य विषयाशी निगडीत संस्था कमी प्रमाणात आढळून आल्या. यावरून जगभरात ‘लॉ’ स्कूल मध्ये असलेली स्पर्धा दिसून येते. JGLS, ही पहिली आणि एकमेव लॉ स्कूल आहे, जिला ही प्रतिष्ठेची क्रमवारी प्राप्त झाली. या लॉ स्कूलने कायदेविषयक शिक्षण तसेच उच्च शिक्षणाकरिता भारताला जगाच्या नकाशावर आणले.
ओ. पी. जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीचे संस्थापक कुलपती नवीन जिंदल म्हणाले की, “जगभरात उच्च शिक्षणाच्या दृष्टीने 2020 हे वर्ष आव्हानात्मक ठरले. या कठीण प्रसंगात ओ.पी.जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीने केवळ परिवर्तन आणि लवचीकपणाचे दर्शन घडवले नसून शैक्षणिक उत्कृष्टतेकडे जाणारा मार्ग निर्माण केला. यंदा विषयवार गटात सर्वोच्च 100 क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये JGLS ने बाजी मारली. भारतातील एका लॉ स्कूलने ही क्रमवारी पटकावल्याबद्दल मला अभिमान वाटतो. जगातील सर्वोत्तम लॉ स्कूलमध्ये जिंदल ग्लोबल लॉ स्कूल’ला पाहणे माझ्याकरिता अभिमानाची बाब आहे. JGLSच्या वतीने सर्वोत्तम गुणवत्तेचे कायदेशीर शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आल्याने कायदेविषयक शिक्षणात भारताला जागतिक नकाशावर आणले आहे.”
ओ. पी. जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीचे संस्थापक कुलगुरू प्रा. (डॉ.) सी. राज कुमार यांनी या महत्त्वपूर्ण मापदंडाचे स्वागत करताना सांगितले की, “JGLS ला जगात 76 वी क्रमवारी लाभल्याची बातमी हे केवळ JGU करिता महत्त्वपूर्ण कामगिरी ठरली नाही तर भारतीय कायदेविषयक शिक्षणाच्या दृष्टीने हा एक अद्वितीय क्षण ठरला. जगातील सर्वोत्तम 100 लॉ स्कूलमध्ये स्थान पटकवायचे आणि जगातील अग्रगण्य विद्यापीठांसह उभे राहण्याचा मान मिळवणे ही JGU’च्या जागतिक दर्जाची युनिव्हर्सिटी होण्याच्या महत्त्वाकांक्षेला मिळालेली पोचपावती आहे. ही अद्वितीय कामगिरी या लॉ स्कूलला मागील वर्षीच्या 101-150 रँक बँडमधून बाहेर आणून 76 वे स्थान मिळवून देण्याच्या कामी आली. आमच्या संस्थेच्या अल्प प्रवासात 2021 (लॉ) विषयात क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग प्राप्त झाल्याने ही घडामोड विकासाचा मापदंड ठरली.”ends
Be the first to comment on "भारतातील जिंदल ग्लोबल लॉ स्कूलचा जगातील 100 ग्लोबल टॉपमध्ये प्रवेश, जगात 76 वा क्रमांक तसेच ‘लॉ’ या विषयात क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मिळवणारी जिंदल ही एकमेव लॉ स्कूल"