महिला दिनानिमित्त कल्याण तर्फे उत्कृष्ट कारागिरीचे नमुने सादर अंगठी, फुलासारखे पेंडन्ट, हिऱ्या-मोत्यांचे हिअरिंग्स, नेकलेस, ब्रेसलेट, कंगन हस्तकलेचे उत्कृष्ट नमुने सादर

मुंबई, ३ मार्च २०२१ (GNI):- आंतरराष्ट्रीय महिला दिन अगदी जवळ आला आहे आणि स्त्रिया निभावत असलेली कोणतीही भूमिका – एक प्रेमळ आई, एक काळजी घेणारी बहीण किंवा एक उद्योजिका – साजरी करण्याची वेळ आली आहे. २१व्या शतकातील आजच्या महिलांसाठी अगदी मुळातून घडविलेले ‘मिनिमलीस्टिक’ दागिने सादर करीत ‘कल्याण ज्वेलर्स’तर्फे हा खास दिवस साजरा करण्यात येत आहे.

भेटवस्तू म्हणून दागिने देणे ही विचारपूर्वक, चोखंदळपणे केलेली कृती असते. ‘कल्याण ज्वेलर्स’ मध्ये आपल्याला अलिकडील काही दागिन्यांच्या ट्रेंडची माहिती देत आहोत. हे दागिने महिलांच्या भावनांना उजाळा देऊन त्यांचा सन्मान करतील. महिला दिनानिमित्ताने काही खास गोष्टीची मागणी केली जाते. त्या दृष्टीने फॅशनच्या समकालीन प्रवृत्ती लक्षात घेत, ‘कल्याण ज्वेलर्स’ ने अंगठ्या, ब्रेसलेट, इअरिंग असे काही सुंदर व विभिन्न सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने सादर केले आहेत.

या महिला दिनानिमित्त कल्याणच्या दागिन्यांची काही निवडक सूची –

अंगठी – सोन्याच्या कोंदणात पोलकी व लाल रत्न, ही कोंदणे क्लोव्हरच्या पानाच्या आकारातील सोन्याच्या तुकड्यावर बसवलेली, अशी ही मोहक, कमी-जास्त घट्ट करता येणारी अंगठी, कोणत्याही स्त्रीच्या हातातील शक्तीची निदर्शक आहे.

फुलासारखे पेंडन्ट – एखाद्या फुलाप्रमाणे नाजूक? नैसर्गिक प्रेरणेतून सुंदर कोरीवकाम केलेले हे फुलासारखे पेंडन्ट एखाद्या सुंदर स्त्रीला भेट देण्यासाठी अगदी आदर्श आहे. ‘पोलकी डायमंड्स’चा आतील थर आणि भोवताली लाल रत्ने, यांच्यामुळे या पेंडन्टला वेगळेच सौंदर्य व झळाळी प्राप्त झाली आहे.

हिऱ्या-मोत्यांनी जडवलेले इअरिंग – भेट म्हणून द्या. या सुंदरपणे रचलेल्या अर्ध्या आकारातील इअरिंगच्या जोडीला एखादा गोंडस मोत्याचा नेकलेस पाश्चात्य किंवा पोशाखावर अगदी उठून दिसेल. त्यामुळे त्यास अगदी समकालीन, सुयोग्य असा रुबाब मिळेल. अर्थात, याबाबतीत स्त्रीची निवडच महत्त्वाची असते!

नेकलेस व इअरिंग – स्त्रीच्या चमकदार व्यक्तिमत्वासाठी एखादी चकाकती भेट तिला द्या! हा खास सोने व डायमंडचा सेट नैसर्गिक प्रेरणेतून बनविलेला आहे. नेकलेस व इअरिंगच्या मध्यभागी जडवलेल्या लाल रत्नांमुळे या संपूर्ण सेटचे सौंदर्य वाढले आहे. हा नाजूक फुलांच्या आकाराचा सेट निवडा. तो कधीही ‘स्टाईल’च्या बाहेर जाणार नाही, याची खात्री बाळगा.

ब्रेसलेटचे वैशिष्ट्य – म्हणजे त्यातील सोन्याची अनोखी रचना. यावर्षी स्त्रीला गुलाबाचे फूल देण्याऐवजी हे नाजूक ब्रेसलेट द्या. सोन्याचे छोटे गोळे आणि मध्यभागी सुंदर कोरलेला गुलाब यांमुळे हे ब्रेसलेट अतिशय शोभून दिसते. या ब्रेसलेटमुळे स्त्रीच्या सौंदर्यात निश्चितच भर पडेल!

कंगन ‘प्रीमियम’ – आपल्या जीवनातील सर्व महत्वाच्या स्त्रियांसाठी हे प्रेमाचे एक उत्कृष्ट प्रतीक आहे. आतील बाजूस बारीक डिझाईनची पातळ जाळी आणि बाहेरच्या बाजूस जाडसर रिम, यांमुळे या कंगनना ‘प्रीमियम’ स्वरूप आले आहे. आपण परिधान करीत असलेल्या कोणत्याही ‘एथनिक’ पोशाखावर हे कंगन अगदी शोभून दिसतील! ends

Be the first to comment on "महिला दिनानिमित्त कल्याण तर्फे उत्कृष्ट कारागिरीचे नमुने सादर अंगठी, फुलासारखे पेंडन्ट, हिऱ्या-मोत्यांचे हिअरिंग्स, नेकलेस, ब्रेसलेट, कंगन हस्तकलेचे उत्कृष्ट नमुने सादर"

Leave a comment

Your email address will not be published.


*