मुंबई, २२ फेब्रुवारी २०२१ (GNI): स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, लॅपटॉप्स, आपल्यासोबत इकडून तिकडे नेता येईल, हवे तेव्हा पाहता येईल अशा मनोरंजन सुविधा आणि इतर ग्राहकोपयोगी डिव्हायसेस यांच्या वापरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत असल्यामुळे २०२५ पर्यंत ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचे उद्योगक्षेत्र वाढून १.४८ लाख कोटींवर (२१.१८ बिलियन यूएस डॉलर्स) पोहोचेल अशी अपेक्षा असल्याचे आयबीईएफने सांगितले आहे. उत्पादनांचा किफायतशीरपणा, आत्मनिर्भर भारत अभियानाला सरकारकडून मिळत असलेले प्रोत्साहन यामुळे ग्रामीण भारतातील वातावरणात होत असलेले बदल ही वृद्धीची प्रमुख कारणे ठरत आहेत. ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या विभागात वेगाने वाढ होत असताना दर्जेदार विक्री-पश्चात सेवा आणि ग्राहकांना सोयीसुविधा उपलब्ध करवून देण्याची गरज देखील वाढत आहे आणि ऑन-डिमांड रिपेयर सर्व्हिस, ऍन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट (एएमसी) आणि एक्सटेंडेड वॉरंटी यासारख्या सेवा देणाऱ्या सर्व्हिसिंग उद्योगात देखील तेजी येत आहे.
श्री. कुणाल महिपाल, सीईओ, ऑनसाईटगो डिव्हायसेस आणि उपकरणे यांची दुरुस्ती व देखभाल यासाठी विक्री-पश्चात सेवा देणारी आघाडीची कंपनी यांनी सांगितले, “आज जास्तीत जास्त कन्ज्युमर ब्रँड्स प्रत्येक उत्पादन सादर करताना नवनवीन वैशिष्ट्ये आणण्यासाठी सातत्याने नवनवीन गोष्टी करत आहेत. पण जेव्हा विक्री-पश्चात सेवेची गरज उद्भवते तेव्हा ग्राहकांना बराच मनस्ताप सहन करावा लागतो. मला स्वतःला सहन कराव्या लागलेल्या अतिशय क्लेशदायक अनुभवामुळे अशा सेवा सुरु करण्याची गरज भासली ज्यामुळे ग्राहकांना खरेदीनंतर देखील विनासायास, विश्वसनीय सेवा अनुभवता येतील व त्यामुळेच मी माझी कंपनी सुरु केली. लहान, मोठ्या, विविध प्रकारच्या डिव्हायसेससाठी एक्स्टेंडेड वॉरंटी, ऍन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट योजना आणि ऑन-डिमांड डोरस्टेप रिपेयर्स असे विविध प्लॅन्स आमच्याकडे आहेत. या सर्व सेवा योजना ग्राहकांना त्यामधून मिळणारा अनुभव अखंडीत आणि विनासायास असावा या दृष्टीने तयार करण्यात आल्या आहेत.”
एक्सटेंडेड वॉरंटीचा लाभ ग्राहकांनी का घेतला पाहिजे याची सर्वात महत्त्वाची पाच कारणे:
१) मोठी बचत आणि बजेटींगमध्ये खंड पडणार नाही – एएमसी किंवा एक्सटेंडेड वॉरंटी करून घेतल्याने मिळणाऱ्या मोठ्या फायद्यांपैकी एक म्हणजे यामुळे बजेटींगची प्रक्रिया सुरळीतपणे चालू राहते. एएमसी किंवा एक्सटेंडेड वॉरंटीसाठी आधीच व्यवस्थित बजेट करून ठेवल्यास तुम्हाला तुमच्या उपकरणांच्या देखरेखीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. २) तुमची उपकरणे व्यवस्थित आणि दीर्घकाळपर्यंत काम करत राहतील – हार्डवेयर आणि ग्राहकोप योगी उत्पादनांचा खूप जास्त वापर केला जात असल्यास ती बिघडू शकतात, ती अकार्यक्षम बनू शकतात, त्यांना नियमितपणे सर्व्हिसिंगची आवश्यकता असते. ३) विनासायास सेवा – एखाद्या एएमसी सेवा पुरवठादार किंवा एक्सटेंडेड वॉरंटी सेवा पुरवठादाराच्या सेवा घेतल्यास तुम्ही ज्या उत्पादनांसाठी कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे त्यांच्या देखभालीसाठीच्या तपासण्या आणि सर्व्हिसिंग यासाठी तुम्हाला नियमित आठवण करून देण्यात येते. ४) घरपोच सेवा – प्रोफेशनल नीट असतील की नाही याची काळजी करावी न लागता तुम्ही तुमच्या उत्पादनांची काळजी घेण्यासाठी त्या सेवा पुरवठादारावर पूर्णपणे अवलंबून राहू शकता. उत्पादन तुमच्या घरून उचलून नेऊन, दुरुस्त करून पुन्हा तुमच्या घरी आणून देण्याची सेवा देखील ते देतात. ५) गरज भासल्यास आणीबाणी सेवा – जेव्हा तुमचे एखादे उपकरण बंद पडते किंवा काही आणीबाणी निर्माण होते तेव्हा दुरुस्ती कामासाठी प्रोफेशनल्सचे नंबर्स शोधत बसणे अधिकच चिंताजनक ठरते. अशावेळी एएमसी किंवा एक्सटेंडेड वॉरंटी असल्यास ते बरेच लाभदायक ठरते.ends
Be the first to comment on "‘ऑनसाईटगो’ तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस आणि उपकरणांची देखभाल करणार, आयबीईएफ च्या अंदाजानुसार २०२५ पर्यंत ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचे उद्योगक्षेत्र १.४८ लाख कोटींवर पोहोचेल"