मुंबई, १८ जानेवारी २०२१ (GNI):- इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार गेल्या दशकभरात देशात दरडोई उत्पन्नामध्ये वेगाने वाढ झाली, खास करून दुचाकी खरेदी, करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढली. हे वास्तव लक्षात घेता भारतात दुचाकींना होणाऱ्या अपघातांमध्ये गंभीर दुखापतींना रोखणे किती महत्त्वाचे आहे हे पटू शकेल. २०१३ ते २०१७ या काळात भारतात दरडोई उत्पन्न २८% नी वाढले, तर त्याच कालावधीत दुचाकी नोंदणीचे प्रमाण ४६% नी वाढले (४४% नवीन वाहन नोंदणीच्या तुलनेत). गेल्या वर्षी भारतात २.१२ कोटी दुचाकी विकल्या गेल्या.
प्रो. मंगल गोगटे, सदस्य-रस्ते सुरक्षा सल्लागार समिती, मुंबई पोलीस यांनी आपले मत प्रकट केले, “आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचे असेल तर आधी स्वतःला सुरक्षित ठेवा. कोणत्याही वाहनातून प्रवास करताना सर्व सुरक्षा उपाययोजनांचे आणि वाहतुकीच्या सर्व नियमांचे नेहमी पालन करा. ३२व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह २०२१ चा हा प्रमुख विषय ठरवण्यात आला आहे. देशातील सर्व नागरिकांनी वाहने चालवताना दक्षता बाळगावी आणि सुरक्षिततेची पुरेपूर काळजी घ्यावी, वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे जरी या संदेशामधून सांगितले जात असले तरी याठिकाणी नमूद करण्याजोगी महत्त्वाची बाब अशी की कायदे आणि नियमांनुसार आखून देण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी ज्यांनी करणे आवश्यक आहे तेच त्यांचे पूर्णपणे पालन करत नाहीत.”
केंद्रीय मोटार वाहन (आठवी सुधारणा) नियम २०२० च्या नियम क्रमांक १३८ नुसार सर्व वाहनांमध्ये प्रथमोपचार पेटी आणि त्यामध्ये काही विशिष्ट सामग्री असणे अनिवार्य आहे. परंतु वाहन उत्पादक कंपन्या या नियमाची सर्रास पायमल्ली करत आहेत आणि यामागचे त्यांचे कारण काय ते अद्याप देखील गुलदस्त्यात आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा केल्या आणि सर्व मोटार वाहनांमधील प्रथमोपचार पेटीमध्ये ‘फेरॅक्रीलम’ हे रक्तस्राव रोखणारे औषध असावे अशी सूचना केली. तसेच राजस्थान उच्च न्यायालयाने यासंदर्भात जारी केलेल्या एका आदेशामध्ये या नियमाची पाठराखण केली आहे. असे असून देखील सियाम (एसआयएएम) या वाहन उत्पादकांच्या सर्वात मोठ्या संघटनेने मात्र जीवनरक्षक हेमोस्टॅटीक जेलचा प्रथमोपचार पेटीमध्ये समावेश करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.
१ एप्रिल २०२० पासून लागू करण्यात आलेल्या सध्याच्या राजपत्रित सूचनेनुसार दुचाकीमधील प्रथमोपचार पेटीमध्ये निर्जंतुक (स्टर्लाइज्ड) कापसाचे किंवा रेशमी पारदर्शक कापड, औषधी वॉश प्रूफ प्लास्टर, रोल केलेले कापसाचे किंवा रेशमाचे तलम पारदर्शक कापड (नॉन स्टेराईल), लवचिक, चिकटू शकेल अशी फॅब्रिक टेप (निर्जंतुकीकरण केलेली), लवचिक फॅब्रिक, सेटरिमाइड क्रीम, फेरॅक्रीसिलम जेल १% आणि पीव्हीसी पाउच असले पाहिजे. भारतामध्ये १९९९ सालापासून मोटार वाहनांमध्ये प्रथमोपचार पेटी असणे अनिवार्य करण्यात आले. परंतु आज दोन दशकांनंतर देखील दुचाकींमधील प्रथमोपचार पेटीसंदर्भात काटेकोर पालनाला वाहन उद्योगक्षेत्राकडून विरोध केला जात आहे. मोटार वाहन सुरक्षा नियमांमध्ये ज्यासाठी सुधारणा केल्या गेल्या त्या सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेकडे यामुळे दुर्लक्ष होत आहे.
वाहनचालक आणि प्रवाशांची सुरक्षा अबाधित राखणे हा प्रथमोपचार पेटीचा उद्देश असतो. अपघात किंवा इतर आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास डॉक्टरांची मदत पोहोचेस्तोवर पहिल्या काही मिनिटात (ज्याला अति महत्त्वाचा काळ म्हणजेच गोल्डन अवर असे म्हटले जाते) जखमींना तातडीची वैद्यकीय मदत पुरवण्याची व्यवस्था वाहनामध्येच असणे अत्यावश्यक आहे. दुर्दैवाने काही अपघात झाल्यास प्रथमोपचार पेटीतील सामग्रीच्या मदतीने पहिल्या काही मिनिटातच जखमी व्यक्तीला तातडीचे प्रथमोपचार दिले गेल्यास त्याची तब्येत, जखमा खालावण्यापासून बचावले जाऊ शकते, त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यात प्रथमोपचार पेटी खूप मोठी भूमिका बजावू शकते.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या डॉक्टरांच्या एका उच्च स्तरीय समितीने शिफारस केली आहे की, सर्व मोटार वाहनांच्या प्रथमोपचार पेटीमध्ये फेरॅक्रीलमचा समावेश असावा. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या सांगण्यावरून आरोग्य मंत्रालयाने या समितीची नियुक्ती केली होती. फेरॅक्रीलम मध्ये प्रतिजैविक क्षमतांबरोबरीनेच रक्तस्राव रोखण्याची देखील क्षमता असल्याने” त्याचा समावेश प्रथमोपचार पेटीमध्ये असला पाहिजे असे या समितीने सांगितले होते.ends
Be the first to comment on "देशात रस्ते सुरक्षेसाठी तडजोडींचा अडसर, इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार दुचाकींचे अपघात रोखणे फार महत्वाचे"