शेमारू मराठीबाणा’ चा पहिला वर्धापनदिन दिमाखात साजरा, शेमारू मराठीबाणाने पहिल्याच वर्षात मिळवला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंतीची वाहिनी बनण्याचा मान

मुंबई, १३ जानेवारी २०२१ (GNI):- भारतातील आघाडीचे कन्टेन्ट पॉवरहाऊस म्हणून नावाजल्या जाणाऱ्या शेमारू एंटरटेनमेंटने आपल्या शेमारू मराठीबाणा या मराठी सिनेमा वाहिनीने साजरी केली अस्सल फिल्मी मनोरंजनाची वर्षापूर्ती.यावेळी मराठी सिने विश्वातील लोकप्रिय, दिग्गज कलाकार महेश कोठारे, मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे उपस्थित होते.

आशयघन सिनेमा जे संपूर्ण कुटुंबासोबत पाहूशकतो असे मराठी चित्रपट पाहण्याची हमखास वाहिनी अशी शेमारू मराठीबाणाची ओळख एका वर्षभरातच झाली आहे. लॉकडाउनच्या काळात जेव्हा थिएटर्स आणि मनोरंजनाची इतर ठिकाणे बंद होती तेव्हा दर्शकांच्या मनोरंजनाची काळजी वाहिनीने पुरेपूर घेतली. वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर्स आणि महा-मुव्ही च्या माध्यमातून निरनिराळ्या धाटणीचे सिनेमे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवण्याचं काम शेमारू मराठीबाणा वाहिनी सातत्याने करत आहे. यामुळेच अल्पावधीतच परीक्षकांच्या मनात वाहिनीने आपले असे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

शेमारू एंटरटेनमेंट लिमिटेडचे सीईओ श्री. हिरेन गडा यांनी सांगितले, “आमच्या शेमारू मराठीबाणा या मराठी चित्रपट वाहिनीचा पहिला वर्धापनदिन साजरा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कि आम्ही नेहमीच अतिशय अनोखा, नवा कन्टेन्ट सादर करत असतो आणि शेमारू मराठीबाणाला मिळत असलेले यश म्हणजे दर्शकांना त्यांच्यासाठी खास तयार करण्यात आलेला कन्टेन्ट दाखवण्यासाठीच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ आहे.” 

शेमारू एंटरटेनमेंट लिमिटेडचे सीओओ – ब्रॉडकास्ट बिझनेस श्री. संदीप गुप्ता म्हणाले, “शेमारू मराठीबाणाच्या रूपाने आमच्या कंपनीने ब्रॉडकास्टिंग व्यवसायात पदार्पण केले आहे. विविध उत्पादने, सुविधा आणि कन्टेन्टमधून आम्ही आमच्या दर्शकांचे मनोरंजन करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो. फ्री-टू-एअर ब्रॉडकास्टिंग क्षेत्रात दमदार कामगिरी बजावण्यासाठी ही वाहिनी सज्ज आहे.”

दिग्गज मराठी अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते श्री. महेश कोठारे यांनी सांगितले, “या सोहळ्यासाठी शेमारू मराठीबाणाने मला आमंत्रण दिले आणि कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या, आव्हानात्मक काळात देखील पुढे जाण्यात मदत करणाऱ्या समुदायाचा भाग होण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे.” 

नामवंत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, “मराठी चित्रपटसृष्टी नेहमीच एकोप्याने कार्यरत आहे. आणि शेमारू एंटरटेनमेंट सारखे उद्योग समूह आम्हाला लोकप्रियतेच्या झोतात राहण्यासाठी वेगवेगळ्या संधी देत राहतात.  मला खात्री आहे की, मराठी शेमारूबाणाचे यश साजरे करणारे असे अनेक सोहळे होत राहतील आणि मी आनंदाने त्यामध्ये सहभागी होईन.”

अतिशय लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी सांगितले, “मराठी चित्रपटसृष्टीने मला भरभरून दिले आहे आणि मी खूप खुश आहे की अशा संकटाच्या काळात देखील शेमारूने आमच्या उद्योगक्षेत्राचा गौरव कायम राखला आणि वाढवला.  शेमारूसोबत माझे संबंध गेल्या बऱ्याच काळापासूनचे आहेत आणि आज त्यांच्या मराठी चित्रपट वाहिनीच्या शेमारू मराठीबाणाच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात सहभागी होताना मला अतिशय आनंद होत आहे.”

मराठी चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील ख्यातनाम अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “मराठी चित्रपटांनी नेहमीच समृद्ध मराठी परंपरा जोपासून मराठी माणसातील कलाकौशल्यांना वाव दिला आहे. प्रेक्षकांसमोर प्रत्यक्षात कार्यक्रम सादर करणे किंवा पडद्यावर सिनेमे दाखवणे शक्य नसल्याच्या काळात देखील आम्हाला आमच्या चाहत्यांसोबत जोडून ठेवण्यात शेमारू मराठीबाणा वाहिनीने खूप मोठी साथ दिली आहे. पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मी वाहिनीचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो की नव्या वर्षात देखील आमच्यासोबत आणि आमच्या प्रेक्षकांसोबतची त्यांची वाटचाल सुखदायी व यशस्वी ठरो.”

२०२० मध्ये मराठी कलागुणांना प्रोत्साहन देण्यात शेमारू मराठीबाणाने लक्षणीय योगदान दिले आहे. अनिश्चिततेच्या काळात त्यांच्या वर्ल्ड टीव्ही प्रीमियर्समुळे मराठी मनोरंजन उद्योगक्षेत्रात उत्साह टिकून राहिला आणि नवनवीन कन्टेन्ट निर्माण करत राहण्याची प्रेरणा मिळत राहिली. २०२१ हे वर्ष मराठी सिनेमा आणि त्याच्या चाहत्यांसाठी अतिशय छान आणि रोमांचक ठरणार आहे कारण शेमारू मराठीबाणाने या वर्षभरात मनोरंजनाचा प्रचंड मोठा खजिना सादर करण्याचे ठरवले आहे. १० जानेवारी रोजी या वाहिनीवर शिव्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पार पडला. त्यापाठोपाठ रझाकार, भातुकली, कशाला उद्याची बात, गुरु, बाळकडू आणि असे इतर अनेक चित्रपट येत्या काही आठवड्यात या वाहिनीवर बघायला मिळणार आहेत. सोहळ्याची यु-ट्युब लिंक पहाhttps://youtu.be/F7QOmW1dKoMhttps://youtu.be/7PAIbtzfp6w

Be the first to comment on "शेमारू मराठीबाणा’ चा पहिला वर्धापनदिन दिमाखात साजरा, शेमारू मराठीबाणाने पहिल्याच वर्षात मिळवला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंतीची वाहिनी बनण्याचा मान"

Leave a comment

Your email address will not be published.


*