सर्जनशील उत्कृष्टतेसाठी ४३ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्रेड क्रिएटिव्ह लॅबचे फिल्म निर्माता श्रीधर यांचे दिग्दर्शन व निर्मिती असलेला या प्रकारचा पहिलाच माहितीपट
राष्ट्रीय, ११ जानेवारी २०२१ (GNI): यंदाचा ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) मानवी चेहरा अंगिकारताना, तीन मुलांच्या वर्णनावरून स्वमग्नता अथवा ऑटिझम या व्याधीच्या अनेकविध छटा प्रस्तुत करणार आहे. ऑटिजम या विषयावरील श्रेड क्रिएटिव्ह लॅब प्रायव्हेट लिमिटेडच्या ‘इन अवर वर्ल्ड’ माहितीपटाचे गोव्यात १६ ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान आयोजित होत असलेल्या ५१ व्या इफ्फीच्या भारतीय पॅनोरामाच्या बिगर-चित्रपटाच्या वर्गवारीतील अधिकृत निवड म्हणून १८ जानेवारीला १३.०० वाजता आद्य प्रदर्शन (प्रीमियर) होईल. या विषयावर प्रखर प्रकाशझोत टाकणारा हा माहितीपट सर्जनशील उत्कृष्टतेसाठी ४३ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्रेड क्रिएटिव्ह लॅबचे फिल्म निर्माता श्रीधर बीएस यांनी दिग्दर्शित केलेला व त्यांचीच निर्मिती आहे. या माहितीपटाची चित्रझलक https://youtu.be/E1cq5lKxc_0 वर उपलब्ध आहे.
हा माहितीपट तीन ऑटिस्टिक मुलांच्या दररोजच्या जीवनाच्या वास्तवातून शोधलेला दस्तऐवज आपल्यापुढे मांडतो, स्वत:चे एक जग घडविण्याची त्यांची धडपड पाहता, त्यांच्याशी प्रेमाने आणि आदराने सह-अस्तित्व शक्य आहे, अशी समजही ते आपल्याला देते. पालक, थेरपिस्ट यांच्याशी सखोल संवाद, विना-संरचित, स्पष्टवक्त्या मुलाखतींसह; त्या मुलांचे रोजचे क्रियाकलाप जसे पोहण्याचे वर्ग, घोडेस्वारी आणि संगीताचे धडे; पालकांसमवेत व्यतीत केलेले त्यांचे खास क्षण, आदी सर्व माहितीपटातील ऐवज हा या कथेला आशेची कड जोडतो. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (एएसडी) या अवस्थेची कोरडी ज्ञानवर्धक माहिती देणाऱ्या चित्रपटाच्या पलीकडे म्हणूनच ते मजल मारते. ही मुले रोजच्या रोज इतक्या कसोट्या-परीक्षांचा सामना करतात तरी त्यांचे अनुभव हे त्यांना सहानुभूतीची गरज नाही असेच जगाला या माहितीपटातून सांगतात; त्याऐवजी ते कोण आहेत हे समजून घेणे आणि स्वीकारणे आवश्यक आहे; सारख्याच आदर आणि प्रेमाने सह-अस्तित्त्वासाठी आपल्याला त्यांचे जग समजून घेणे गरजेचे आहे.
या माहितीपटाचे दिग्दर्शक व निर्माते श्रीधर बीएस म्हणाले, “आज आपले ज्या प्रकारचे जगणे आणि वागणे आहे त्यावरून दोन वेगवेगळ्या प्रकारची जग असल्याचे भासते. एक ‘त्यांचे’ आणि दुसरे ‘आपले’. त्यांना ज्यांना आपण समजूनच घेतले नाही. हा चित्रपट अशी एक खिडकी आहे जी सर्व पंथ-भेद बाजूला ठेवून निरपेक्षपणे जगाला समजून घेते आणि एका विश्वात, जिथे आपणा सर्वांचे प्रेम आणि परस्पर आदराने सह-अस्तित्व असलेले एक जग, अशा एका विश्वाच्या दिशेने मार्ग तयार करते. होय, ‘इन अवर वर्ल्ड’ आमचे एक जग.’’
पॅनोरामा स्टुडिओशी संलग्न पॅनोरामा स्पॉटलाइट ही या माहितीपटाची महोत्सवातील धोरण भागीदार आहे.
महत्त्वाचे दुवे : फेसबुक – https://fb.watch/2X1C9vVfro/
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/p/CJ4DpwZD0Ug/
About Shreedhar: Shreedhar BS(also known as Shred), director of Shred Creative Lab Private Limited since 2013 has over 22 years of comprehensive experience in films, television/digital content, branding, and marketing. Known for innovative and disruptive ideas, Shred has worked closely with international brands such as Turner Broadcast UK, National Geographic – International, Fox, Ford – APAC, BMW – India, Sony Motion Pictures – London/USA and many more. Winner of 43 National and International awards for creative excellence, Shred, earlier was the Director of Salt Studios Private Limited and Creative Director for the National Geographic Channel as well as Fox International Channels.
About Shred Creative Lab(SCL): Founded by former creative director for Fox Network of channels and winner of 43 National and International awards for creative excellence, Shred founded SCL in 2013 as a creative studio catering to broadcast- branding, formerly known as Shred Inc. His vision is to create innovative and path-breaking visual communication. Driven by a belief in unconventional ideas and validated by experience, SCL is a beaming example of the mutual efforts of creativity and state-of-the-art execution. SCL has grown organically over the years, moving beyond the borders of broadcast branding and diversified into other creative branches like films, production for digital and television content and designing for products. Backed by an eclectic mix of dedicated creative directors, motion and graphic designers, animators, VFX experts and marketers, spread across Argentina, Philippines and India, SCL today stands out of the crowd as an exclusive studio that is your one-stop-shop for everything creative, from start to finish. SCL’s visual identity for Zee Punjab won a Promax India 2020 award for Best Brand Image Design and Best Logo Design Across Multiple Media. Furthermore, the brand song composed for Zee Biskope fetched an e4m Indian Content Marketing award for Best Branded Content Marketing on Television, 2020.ends
Be the first to comment on "स्वमग्नता (ऑटिझम) व्याधीवर यंदाच्या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) भर; श्रेडच्या ‘इन अवर वर्ल्ड’ या माहितीपटाचे १८ जानेवारी २०२१ला आद्य प्रदर्शन"