मुंबई, ९ जानेवारी २०२१ (GNI):– माननीयकेंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी कोविड-१९ लसीकरणाच्या दुसऱ्या राष्ट्रीय तालमी अंतर्गत वॉलेस गार्डन्स, नुंगमबक्कममध्ये अपोलो व्हॅक्सिनेशन सेंटरला भेट दिली. लसीकरणाच्या व्यवस्थापनाच्या पूर्व तयारीसाठी या तालमीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माननीय केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशवासीयांचे जीव वाचावेत यासाठी सर्वात आघाडीवर राहून लढत असलेल्याकरोना योद्ध्यांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. देशभरातील ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ७३६ जिल्ह्यांमध्ये प्रचंडमोठ्या प्रमाणावर मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. त्याआधी माननीय केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी चेन्नईमध्ये सरकारी सामान्य रुग्णालय आणि सरकारी ओमंडूर रुग्णालयातील सेशन साईट्सची पाहणी केली.
यावेळी अपोलो हॉस्पिटल्सच्या व्हाईस चेअरपर्सन श्रीमती प्रीता रेड्डी यांनी सांगितले, “८ जानेवारी रोजी राज्यातील कोविड लसीकरणाच्या तालमीमध्ये सहभागी होणे ही अपोलो हॉस्पिटल्ससाठी अभिमानास्पद बाब आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा भाग बनणे ही आमच्यासाठी प्रतिष्ठेची संधी आहे, वैश्विक महामारीच्या काळात देशवासीयांच्या सेवेत योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात या संधीमुळे आम्हाला अग्रणी स्थान मिळणार आहे. या तालमीच्या बरोबरीनेच आम्ही अपोलो मधील सर्वजण सरकारला साथ देत नव्या वर्षात आपल्या देश वासियांना कोविड-१९ च्या तावडीतून सोडवण्यासाठी सज्ज राहू.”
अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर श्रीमती सुनीता रेड्डी यांनी सांगितले, “देशातील सर्वात मोठा खाजगी आरोग्य सेवा समूह म्हणून कोविड-१९ च्या विरोधात देशाच्या लढाईत भाग घेणे आणि भारताला निरोगी, सुरक्षित बनवणे ही आमची जबाबदारी आहे. या संपूर्ण प्रक्रिये मध्ये सहभागी होणे ही आमच्यासाठी अतिशय अभिमानस्पद बाब आहे, यामुळे आम्हाला वैश्विक महामारीच्या काळात देशवासीयांच्या रक्षणासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस देण्याच्या कामी आघाडीवर राहून काम करता येणार आहे. सर्व सरकारे, सरकारी यंत्रणा आणि आरोग्यसेवा नेटवर्क्स यांच्यासोबत काम करत मोठ्या संख्येने फ्रंटलाईन कर्मचारी आणि लोकांना आखूनदिलेल्या टप्प्यांमध्ये, लवकरात लवकर आणि सुरक्षित पद्धतीने लस देणे हा आमचागौरव ठरेल.”
तालमी दरम्यान लसीकरणाच्या विविध टप्प्यांचा अभ्यास केला गेला. संचालन सुविधा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून लोकांना एकत्र आणणे, ओळख पत्रांची तपासणी, लसीचे डोस देणे, शीतशृंखलेची देखरेख, जैव वैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, कोविन ऍपवर माहिती, लस दिल्यानंतर ३० मिनिटे त्या व्यक्तीवर लक्ष ठेवणे, काळजीघेणे, एईएफआय व्यवस्थापन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना लस दिली जाईल त्यांना विश्वास आणि धीर देणे या बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आला होता.
लसीकरणाच्या काळात आम्ही संसर्ग प्रतिबंध व नियंत्रणासाठीच्या उपाय योजनांवर देखील भर देणार आहोत. तापाची लक्षणे तपासणे, एकमेकां पासून सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता, खोकताना आणि शिंकताना सुरक्षेचीपूर्ण काळजी घेणे, मास्क्सचा सुरक्षित वापर. इंजेक्शनच्या सुरक्षित पद्धती, जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन यांचे काटेकोर पालन आम्ही करणार आहोत. Ends
Be the first to comment on "अपोलो व्हॅक्सिनेशन सेंटर मध्ये कोविड-१९ लसीकरणाची तालीम, देशभरातील ३३ राज्ये – केंद्रशासित प्रदेशांमध्ये ७३६ जिल्ह्यांमध्ये कोविड-१९ लसीकर मोहिमेचे मॉक ड्रिलचे आयोजन"