भारतामध्ये आयलिया इझी पे कार्यक्रम राबविण्यासाठी बायरची आरोग्य फायनान्सबरोबर भागीदारी

भारतामध्ये आयलिया इझी पे कार्यक्रम राबविण्यासाठी बायरची आरोग्य फायनान्सबरोबर भागीदारी§  रुग्णांवरील उपचारांत खंड पडू नये तसेच आयलिया ही अभिनव उपचारपद्धती अधिक व्यापक स्तरावर उपलब्ध व्हावी या हेतूने भारतामध्ये आयलिया इझी पे (Eylea Easy Pay) हा कार्यक्रम घेऊन येण्यासाठी बायरने आरोग्य फायनान्सशी भागीदारी केली आहे. देशभरातील नेत्ररुग्णालयांमध्ये ही वित्तीय सुविधा उपलब्ध असेल.§  आयलिया, किंवा एफ्लिबरसेप्ट उपाययोजना ही डायबेटिस मॅक्युलर एडेमा (डीएमई) आणि वेट एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन (वेट एएमडी) या दृष्टीदोषांशी निगडित अवस्थांवरील उपचारपद्धती आहे.§  भारतात सध्या मधुमेहाचे ६७ दशलक्ष रुग्ण आहेत. डायबेटिक मॅक्युलर एडेमा (डीएमई) यापैकी १० टक्‍के रुग्णांना अंधत्व येण्यामागचे प्रमुख कारण आहे[1]. एएमडी च्या प्रादुर्भावाचे प्रमाण १.२ टक्‍के ते ४.७ टक्‍के इतके आहे[2] आणि हा आजार बहुधा चाळीशीच्या पुढील वयोगटातील व्यक्तींवर परिणाम करतो. एएमडीच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे १० टक्‍के रुग्ण वेट एएमडीचे असतात, मात्र एएमडीमुळे मध्यवर्ती दृष्टी गमावलेल्या ९० टक्‍के व्यक्ती या प्रकारातील असतात.[3]

मुंबई, २१ नोव्हेंबर २०२० (GNI): भारतातील रुग्णांना आयलिया (एफ्लिबरसेप्ट सोल्‍यूशन) उपचार उपलब्ध होण्यास मदत व्हावी यासाठी त्यांना या उपचारांवरील खर्चासाठी लवचिक व परवडणा-या वित्तीय योजनांचे पर्याय पुरविण्यासाठी आपला आयलिया इझी पे (Eylea Easy Pay) कार्यक्रम येथे दाखल करण्यासाठी आरोग्य फायनान्स या सामाजिक आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील कंपनीबरोबर भागीदारी करत असल्याची घोषणा बायरने आज केली. या भागीदारीद्वारे बायर आणि आरोग्य फायनान्सने या नाविन्यपूर्ण उपचारांच्या उपलब्धतेची व्याप्ती वाढवली आहे व त्यायोगे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना तत्काळ सहन करावा लागणारा आर्थिक भार कमी केला आहे. या वित्तीय उपाययोजना देशभरात उपलब्ध असणार आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, बंगाल, केरळ, तामिळनाडू यांसारख्या राज्यांतील केंद्रे आपल्या रुग्णांना या योजनेचा पर्याय देऊ करतील.

आज, भारतातील ६७ दशलक्ष लोक मधुमेहग्रस्त आहे,[4] आणि त्यातील सुमारे ३ ते ४.५ दशलक्ष रुग्णांमध्ये डायबेटिक मॅक्युलर एडेमा (डीएमई) सारख्या मधुमेहजन्य नेत्रविकारांमुळे दृष्टीदोष[5] निर्माण होतो. बायरचे आयलिया हे औषध वयोवृद्ध रुग्णांवर परिणाम करणा-या वेट एएमडी आणि मधुमेहींवर परिणाम करणा-या डीएमई या दोन्ही प्रकारच्या आजारांवरील उपचारांमध्ये वापरले जाते, व इंजेक्शनद्वारे ते थेट डोळ्यांत दिले जाते. आयलिया ही दुर्धर नेत्रविकारांसाठी सतत चालणारी उपचारपद्धती असल्याने रुग्णांनी ती नियमितपणे घेत राहणे आवश्यक आहे.

भारतीय रुग्णांना हे औषध अधिक व्यापक स्तरावर उपलब्ध व्हावे व त्यांनी हे उपचार मध्येच सोडून देऊ नयेत यासाठी बायरने २०२० मध्ये ‘आयलिया ४ यू’ (Eylea 4 U) हा रुग्ण सहाय्यता कार्यक्रम सुरू केला. हाच हेतू कायम राखत बायर आणि आरोग्य फायनान्स यांनी भागीदारी केली आहे. या उपचारांचा रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांवर लगेचच मोठा आर्थिक भार पडत असल्यामुळे हे उपचार अर्धवट सोडून देण्याकडे रुग्णांचा कल दिसतो. ही समस्या सोडविण्याच्या हेतूनेच ही भागीदारी करण्यात आली आहे. या सहयोगामुळे, तत्काळ चुकत्या कराव्या लागणा-या बिलाचा भार कमी होणे, पेमेंट करण्याचे लवचिक पर्याय आणि सुलभ हप्त्यांमध्ये (ईएमआय) परतफेडीची सोय हे फायदे रुग्णांना मिळू शकणार आहेत. उपचारांची उपलब्धता आणि रुग्णकेंद्री दृष्टीकोन यांच्यावर भर देणा-या आयलिया इझी पे (Eylea Easy Pay) योजनेचा मुख्य भर रुग्ण आणि त्यांची देखभाल करणा-या व्यक्तींना या आजाराचे परिणामकारक व्यवस्थापन करण्याच्या कामी मदत करणे हा आहे.

“बायरमध्ये आम्ही नेहमीच रुग्णहिताला प्राधान्य देण्याशी आपली बांधिलकी जपली आहे. दुर्लक्षित राहून जाणा-या आरोग्यविषयक गरजा पुरविण्यासाठी व हे करताना रुग्णांना आवश्यक असलेल्या उपचार योजना सहज उपलब्ध व्हाव्यात, सातत्याने मिळत रहाव्यात यासाठी त्यांना पाठबळ देण्याच्या हेतूने आम्ही परिणामकारक आणि अभिनव उपाययोजना पुरविण्याचा प्रयत्न करत असतो. आरोग्य फायनान्सच्या सहयोगाने आम्ही रुग्णांची दृष्टी सुधारण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक उपाय पुरविण्याप्रती, रुग्णांच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या प्रवासात त्यांना पाठबळ देण्याप्रती आपली बांधिलकी दृढ करत आहोत.” बायर झायडस फार्माचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि दक्षिण आशियासाठीचे कंट्री डिव्हिजन हेड मनोज सक्सेना म्हणाले. 

या भागीदारीबद्दल बोलताना आरोग्य फायनान्सचे सह-संस्थापक आणि सीईओ जोस पीटर म्हणाले, “आरोग्य फायनान्समध्ये आम्ही अशी एक परिसंस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, जी उपचारांसाठीच्या सुलभ वित्तीय योजनांच्या माध्यमातून रुग्णांना व त्यांची देखभाल करणा-या व्यक्तींची सहाय्यता करू शकेल. रुग्णांवरील उपचारांत खंड पडू नये तसेच या अभिनव उपचारपद्धतीचा फायदा भारतभरातील अधिकाधिक रुग्णांना मिळावा यासाठी त्यांना लवचिक वित्तीय उपाययोजना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एकत्र काम करता यावे यासाठी आरोग्य फायनान्सने बायरशी भागीदारी केली आहे.”

हिंदुजा हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट ऑप्थेल्मोलॉजिस्टरेटिना सर्जन आणि युव्हेटीस स्पेशालिस्ट, हिंदुजा हॉस्पिटल आणि आयबेटीस या आपल्या धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून मोफत मधुमेह आणि नेत्रतपासण्यांचे सामाजिक कार्य करण्यासाठी अनेकदा गिनिज विश्वविक्रमाचे मानकरी ठरलेले डॉ. निशांत कुमार सांगतात, “भारतामध्ये टाळता येण्याजोग्या अंधत्वाच्या समस्येकडे तातडीने लक्ष पुरविले जाण्याची गरज आहे. प्रतिबंधात्मक देखभाल, निदान आणि दीर्घकालीन औषधोपचार सातत्याने घेत राहणे या सर्वच गोष्टींवर महामारीमुळे विपरित परिणाम झाला आहे. मुंबईमध्ये वेट एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन आणि डायबेटिक मॅक्युलर एडेमा या भारतामध्ये अंधत्वास कारणीभूत ठरणा-या दुस-या क्रमांकाच्या प्रमुख आजारपणाच्या रुग्णांनी मुख्यत्वे आर्थिक अडचणींमुळे उपचार सोडून देण्याचे प्रमाण वाढल्याचे, परिणामी उपचारांसाठी येणा-या अशा रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अंधत्वास कारणीभूत ठरणा-या या आजारावरील औषधोपचारांसाठी तत्काळ पैसे भरणे काही रुग्णांना शक्य होत नाही, पण हीच रक्कम ते विशिष्ट कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने भरू शकतात. आरोग्य फायनान्सने बायरच्या सहयोगाने सुरू केलेल्या या आर्थिक सहाय्यता कार्यक्रमामुळे रुग्णांकडून अधिक सातत्याने उपचार घेतले जातील व त्यांना सर्वोत्तम उपचारपद्धतीचा पर्याय खात्रीने उपलब्ध होऊ शकेल. अशा उपाययोजनांमुळे रुग्णांना व त्यांची देखभाल करणा-या व्यक्तींना अधिक आत्मविश्वासाने व सोयीस्करपणे आरोग्य सांभाळण्यावर लक्ष केंद्रित करता येते व त्यांच्यावरील आर्थिक भारही हलका होतो.”

Be the first to comment on "भारतामध्ये आयलिया इझी पे कार्यक्रम राबविण्यासाठी बायरची आरोग्य फायनान्सबरोबर भागीदारी"

Leave a comment

Your email address will not be published.


*