मुंबई, २१ डिसेंबर २०२० (GNI):- ‘कॅनेडियन वूड’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या फॉरेस्ट्री इन्नोव्हेशन कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एफआयआय इंडिया) भारतात लाकडाच्या साहाय्याने बांधकामांना प्रोत्साहन देण्यासाठी सक्रिय आहे. लाकडांच्या प्रजातींबद्दल (वेस्टर्न हेमलॉक, एस-पी-एफ, डग्लस-एफआयआर, यलो स़ेडर, वेस्टर्न रेड स़ेडर) तसेच त्यांचे विशेष उपयोग व उपयोग करण्याच्या सुयोग्य पद्धती यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ही कंपनी शैक्षणिक सेमिनार्स आणि प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करते. लाकडाच्या रचनात्मक उपयोगांसाठी ही कंपनी आर्किटेक्ट्स, विकासक, कंत्राटदार आणि हॉस्टपिटॅलिटी क्षेत्रातील व्यावसायिकांसोबत काम करते तसेच बांधकामाचा जो प्रकार निवडण्यात आला असेल उदाहरणार्थ, टी अँड जी (टंग अँड ग्रूव्ह), डब्ल्यूएफसी (वूड फ्रेम कन्स्ट्रक्शन), पोस्ट्स-अँड-बीम्स किंवा स्थानिक दगड / विटांच्या साहाय्याने हायब्रीड इत्यादींसाठी सर्वाधिक अनुकूल ठरतील अशा प्रजाती व ग्रेड्स सुचवून तांत्रिक मदत देखील पुरवते.
लाकडाच्या साहाय्याने बांधकामातील नवनवीन ट्रेंड्स, सर्वोत्तम कार्यपद्धती, शाश्वत प्रक्रिया या विषयांवर कॅनडियन वूड्स आपल्या श्रोत्यांसमवेत सातत्याने संवाद साधत असते. लाकडाशी निगडित कामांच्या उद्योगक्षेत्राच्या हितासाठी योग्य ठरतील असे विषय आणण्याच्या आपल्या उद्धिष्टाला अनुसरून त्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या वेबिनारमध्ये ‘मास टिम्बर आर्किटेक्चरमधील विकासात्मक घडामोडी – कॅनेडियन दृष्टीकोन’ या विषयावर भर देण्यात आला.
कॅनेडियन आर्किटेक्ट आणि उद्योगक्षेत्रातील दिग्गज डेरेक न्यूबी यांना या वेबिनारमध्ये खास आमंत्रित करण्यात आले होते. मिश्र-उपयोग, ऑफिस आणि शैक्षणिक सुविधा या क्षेत्रातील त्यांचा आजवरचा अनुभव, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील ग्राहकांसोबत केलेले प्रभावी काम या वेबिनारमध्ये खूपच उपयुक्त ठरेल हा यामागचा उद्देश होता. लीड प्रमाणित व्यावसायिक आणि प्रमाणित पॅसिव्ह हाऊस डिझायनर डेरेक हे इमारतींमध्ये ग्रीनहाऊस वायू उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून संचालनात्मक उत्सर्जन कमी करण्यासाठी पॅसिव्ह हाऊस तत्त्वे आणि बांधकामातून होणारे उत्सर्जन रोखण्यासाठी टिम्बरचा वापर या दोन्ही गोष्टी ते मांडत असतात. ते आर्किटेक्चरल इन्स्टिटयूट ऑफ ब्रिटिश कोलंबिया आणि रॉयल आर्किटेक्चरल इन्स्टिटयूट ऑफ कॅनडाचे सदस्य आहेत. त्यांनी अनेक म्युनिसिपल अड्वायजरी डिझाईन पॅनेल्ससाठी काम केले असून स्थापत्यशास्त्रात टिम्बरचा वापर याबाबत त्यांनी आजवर अनेक सरकारांना सल्ला दिला आहे.
या वेबिनारबद्दल डेरेक न्युबी यांनी सांगितले, “मास टिम्बर आर्किटेक्चर हा जगातील अनेक भागात बांधकामातील नवा ट्रेंड बनत आहे. लाकूड उत्पादनाच्या तंत्रज्ञानातील आणि प्रक्रिया व्यवस्थांमधील सुधारणांमुळे कॅनडामध्ये नाविन्यपूर्ण इमारतींमध्ये देखील सातत्याने सुधारणा घडून येत आहेत. कॅनेडियन वूडने आयोजित केलेल्या प्लॅटफॉर्मवर भारतीय दर्शकांसमोर हा सुधारणांची माहिती देणे हा अतिशय चांगला अनुभव होता. सर्व दर्शकांनी यामध्ये खूप रस घेतला आणि या वेबिनारमध्ये सक्रिय सहभाग घेतला याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.” लाकडाच्या साहाय्याने बांधकामाचे फायदे सांगताना त्यांनी सांगितले की, “मास टिम्बर प्रकल्पांसाठी बांधकामामध्ये साईटवर मुख्यत्वेकरून असेम्ब्ली केली जाते, कारण यामध्ये प्रिफॅब्रिकेटेड सुटे भाग वापरले जातात. प्रिफॅब्रिकेशनमुळे वेळ वाचतो, साईट्स स्वच्छ राहतात आणि कामगार कमी लागतात. तपशीलवार तयारी आणि त्या उद्योगक्षेत्राच्या बांधकामाविषयी माहितीमुळे हे सर्व शक्य होते.”ends
Be the first to comment on "कॅनेडियन वूडचा ‘मास टिम्बर आर्किटेक्चर मधील विकास’ विषयावर वेबिनार लाकडाच्या साहाय्याने बांधकामातील नवनवीन ट्रेंड्स, सर्वोत्तम कार्यपद्धती, शाश्वत प्रक्रिया या विषयांवर कॅनडियन वूड्सचा श्रोत्यांसमवेत संवाद"