नववधूसाठी कल्याणने सादर केली निवडक दागिन्यांची श्रेणी नववधूसाठी खास दागिन्यांची श्रेणी बांगड्या, सोन्याची कर्णभूषणे, अंगठी, मांग टिका सोन्याचं पेंडंट, नेकलेस, हिऱ्यांचा सेट

मुंबई, १७ डिसेंबर २०२० (GNI):- वर्षाची अखेर म्हणजे देशभरात लग्नाची जोरदार धामधूम पाहायला मिळते. नववधू तर या खास दिवसासाठी सर्वात योग्य दागिने निवडण्यात गुंतून जाते. नववधूच्या दागिन्यांमधे अभिजात, सौंदर्यपूर्ण दागिने असावेत आणि ते फक्त लग्नाच्या दिवशी नव्हे, तर केव्हाही घातले, तरी राजेशाही दिसावेत. भारतात नववधूचे दागिने कायम जपले जातात आणि अभिमानाचा विषय असलेले हे दागिने नंतर पिढ्यानपिढ्या सोपवले जातात. वधूला तिच्या संग्रहात शक्य तितक्या गोष्टींचा समावेश करावासा वाटत असला, तरी पारंपरिक दागिने या संग्रहाचा अविभाज्य असतात, जे ती वधू लग्नानंतरही अतिशय प्रेमाने जपते. लग्नसराईच्या या मौसमात जर तुम्हाला सर्वांचं लक्ष वेधून घेणारे दागिने परिधान करायचे असतील, तर कल्याण ज्वेलर्सने तुमच्यासाठी निवडक दागिन्यांची खास श्रेणी तयार केली आहे.

सोन्याची कर्णभूषणे – जर तुम्हाला फुलांचं डिझाइन असलेले दागिने आवडत असतील, तर आकर्षक रत्नं जडवलेली सोन्याची कर्णभूषणे तुमच्या संग्रहात असायलाच हवीत. त्यात मध्यभागी पोल्का स्टोनसह लाल रंगाचे खडे बसवण्यात आले असून ते लग्नात परिधान केल्यावर नक्कीच उठून दिसतील.

बांगड्या – हा भारतीय पोशाखाचा अविभाज्य भाग आहे. सोन्याची झळाळी आणि पारंपरिक पद्धतीचे फुलांचे पोल्की स्टोन्स चमकदार दिसतील यात शंका नाही. याचं मध्यवर्ती डिझाइन देवी लक्ष्मीचं असून ते वधूच्या सौंदर्याला आणखी उठावदार करेल. सोन्याची अंगठी – आकर्षक, रूंद फिटिंग असलेल्या या ट्रेंडी, फुलाच्या आकारातल्या अडजस्टेबल सोन्याच्या अंगठीवर मध्यभागी लाल रंगाचा आकर्षक जेमस्टोन बसवण्यात आला असून त्याच्या भोवती असलेली पाने लक्ष वेधून घेणारी आहेत. अभिजात शैलीत बनवण्यात आलेल्या या अंगठीचे डिझाइन कोणत्याही रूपाला आकर्षक बनवेल.

मांग टिका सोन्याचं पेंडंट – पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेला मांग टिका सोन्याचं पेंडंट आणि तीन साखळ्यांमुळे अधिक उठावदार झाला आहे. मध्यभागी असलेल्या साखळीला फुले आणि हिरवा, गुलाबी व पांढऱ्या रंगाच्या सेमी- प्रेशियस जेमस्टोनसह सजवण्यात आले आहे. मांग टिका लाल प्रेशियस जेमस्टोन्स तसेच लहान आकाराच्या सोन्याच्या लटकत्या गोळ्यांनी सुशोभित करण्यात आले असून ते नववधूच्या कपाळी नक्कीच शोभून दिसेल.

नेकलेस – देवी लक्ष्मीच्या नाजूक कलाकुसर असलेल्या पारंपरिक डिझानवर गुलाबी रंगांच्या छटा या नेकलेसचे सौंदर्य आणखी खुलवतात. नाजूक घुमटाच्या आकाराचे हिरे आणि गुलाबी जेमस्टोन पारंपरिक वेशभूषेला अगदी शोभून दिसतील.मोती, सेमी- प्रेशियस गुलाबी व लाल रंगाचे जेमस्टोन्स, विशेषतः साखळीत आणि नथीच्या मध्यभागी स्टोन्स गुंफण्यात आले आहेत. नथीच्या मध्यभागी लावण्यात आलेले मोत्याचे लटकन त्याला नाजूक लूक देणारे आणि नक्कीच वधूच्या सौंदर्यात भर घालणारे आहेत.

हिऱ्यांचा सेट – नववधूच्या दागिन्यांचा संग्रह हिऱ्यांच्या आकर्षक सेटशिवाय पूर्ण होऊच शकत नाही आणि बहुतेक नववधू रंगीत छटा असलेल्या हिऱ्यांच्या सेटची निवड करतात. लाल रंगाचे जेमस्टोन्स त्यासाठी सर्वात योग्य ठरतील. हिऱ्यांचा हा सेट लेहंगा किंवा लग्नाआधीच्या समारंभातल्या कॉकटेल गाऊन अशा कोणत्याही पोशाखावर उठून दिसेल.ends

Be the first to comment on "नववधूसाठी कल्याणने सादर केली निवडक दागिन्यांची श्रेणी नववधूसाठी खास दागिन्यांची श्रेणी बांगड्या, सोन्याची कर्णभूषणे, अंगठी, मांग टिका सोन्याचं पेंडंट, नेकलेस, हिऱ्यांचा सेट"

Leave a comment

Your email address will not be published.


*