‘
राष्ट्रीय, 21 ऑक्टोबर, 2020 (GNI): जगभरातील मातांसाठी सर्वोत्कृष्ट बेबी केअर उत्पादने देण्याचा प्रयत्न ‘जॉन्सन्स बेबी’कडून नेहमीच केला जातो. याच परंपरेनुसार, आयकॉनिक अशा ‘बेबी केअर’ ब्रँडने भारतात नवीन ‘कॉटनटच’ ही श्रेणी नुकतीच सादर केली. या नव्या उत्पादनाची टीव्ही जाहिरात (टीव्हीसी) ‘ जॉन्सन्स’तर्फे प्रसारीत करण्यात येत आहे. आपल्या बाळाला नरम, मऊशार स्पर्श प्रदान करण्यासाठी एका आईच्या बांधिलकीवर ही जाहिरात प्रकाश टाकते. यामध्ये नवीन ‘कॉटनटच’चे वेगळेपण दाखविण्यात आले आहे आणि यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या कोमलतेचा संदेश दिला आहे. ही टीव्ही जाहिरात देशभरात 10 भाषांमध्ये प्रसारीत करण्यात आली आहे.
‘डीडीबी मुद्रा ग्रुप’ची संकल्पना असलेल्या या ‘टीव्हीसी’मध्ये अनुक्रमांची एक मालिका आहे. यात ‘कॉटनटच’ची नवीन श्रेणी वापरुन एक आई तिच्या बाळाशी बंध निर्माण करीत आहे. ती ‘कॉटनटच’चा मुलायमपणा अनुभवत आहे व तो स्वीकारीत आहे. आपल्या बाळाचाही स्पर्श किती मऊ आहे याबद्दल ती अचंबा व्यक्त करीत आहे. ‘कॉटनटच’मध्ये नैसर्गिक कापूस हा एक नाविन्यपूर्ण घटक असल्याचे या ‘टीव्हीसी’मध्ये नमूद करण्यात येते. ‘कॉटनटच’मुळे त्वचेला अजिबात त्रास होत नाही, यापूर्वी कधीही मिळाला नसेल, असा अनुभव ‘कॉटनटच’मुळे मिळतो, असे या ‘टीव्हीसी’त बिंबविण्यात येत आहे.
य जाहिरातीच्या प्रसारणाविषयी बोलताना, ‘जॉन्सन अॅंड जॉन्सन कंझ्युमर इंडिया’चे विपणन विभागाचे उपाध्यक्ष मनोज गाडगीळ म्हणाले, “बेबी केअर श्रेणीतील विविध स्वरुपाचे सर्वोत्तम पर्याय उपलब्ध करण्यात ‘जॉन्सन्स’ हा ब्रॅंड वर्षानुवर्षे आघाडीवर आहे. नव्या जाहिरातीमध्ये ‘जॉन्सन्स’ची ‘कॉटनटच’ ही नवीन श्रेणी ठळकपणे प्रसारीत करण्यात आली आहे. यापूर्वी कधीही अनुभवला नसेल असा मऊ-मुलायम स्पर्श ‘कॉटनटच’मधून मिळतो, याची हमी मातांना यातून देण्यात आली आहे. नवीन कॉटनटच या श्रेणीतील उत्पादनांमध्ये नैसर्गिक कापूस हा प्रमुख घटक आहे. विज्ञान व संशोधनाच्या आधारे ‘बेबी केअर’साठी आम्ही कटिबद्ध असल्याचे आम्ही ‘टीव्हीसी’मधून दाखवून दिले आहे. केवळ आई व बाळ यांच्यातील बंध मुलायम स्पर्शाने घट्ट व्हावेत, या हेतूने अत्यंत काळजीपोटी ही नवीन श्रेणी आम्ही सध्याच्या आव्हानात्मक काळातही उपलब्ध केली आहे.’’
‘टीव्हीसी’वर भाष्य करताना, ‘डीडीबी मुद्रा ग्रुप’चे नॅशनल क्रिएटिव्ह डायरेक्टर राहुल मॅथ्यू म्हणाले, “जॉन्सन्स’साठी आम्ही केवळ उत्पादने सादर करीत नाही, तर आई व बाळातील बंध आणि त्यांचा आमच्याशी असलेला संबंध ब्रँड म्हणूनही आम्ही विकसित करतो. स्पर्श हा या बंधाचा आणि नातेसंबंधाचा एक आवश्यक भाग आहे. हेच आम्ही या जाहिरातीत दाखवले आहे.”
टीव्हीसीची लिंक –
Be the first to comment on "जॉन्सन्स’ने भारतात आणली नवीन ‘कॉटनटच’ श्रेणीनवीन ‘टीव्हीसी’ मधून उत्पादनांच्या अनोख्या वैशिष्ट्यांवर प्रकाशझोत; यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या कोमलतेचा संदेश"