· ट्विटर इंडियाने केलेले संशोधन निदर्शनास आणते की, गेल्या वर्षी भारतीयांना प्रत्येक संवादांमध्ये आनंद मिळाला. टीमने भारतातील २२ शहरांमधील सप्टेंबर-नोव्हेंबर २०१९ दरम्यानच्या ८५०,००० ट्विट्सचे विश्लेषण केले.
· संशोधनाच्या मते, वर्ष २०१९ मध्ये अॅनिमल्स, सेलिब्रेशन, सेलिब्रिटी कन्टेन्ट, डूइंग गुड डीड्स, फॅमिली, फूड, ह्यूमर, नॉस्टेल्जिया, रोमांस व स्पोर्टस् अशा थीम्स ट्विटरवर ठरल्या आनंदमय संवाद
· कन्वर्सेशन रिप्लेसह ट्विटर वर्ष २०१९ मधील या आनंदमय संवादांना उजाळा देत आहे, ज्यामुळे लोक जीवनातील त्यांच्या आनंदमय क्षणाची पुन्हा आठवण काढू शकतात
NATIONAL, भारत, १५ सप्टेंबर २०२० (GNI): आपल्या आसपासच्या परिसरात व दररोजच्या संवादांमधून परिचित आनंद मिळतो. वर्ष २०२० आपल्याला काही शिकवत असेल तर हीच गोष्ट आहे. आपण सर्व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत असताना ट्विटर आपल्या सभोवतालचे विश्व बदलण्यास सुरूवात होण्यापूर्वी वर्ष २०१९ मधील घटनांना उजाळा देत आहे. ट्विटरला वाटते की, भारतीयांनी कन्वर्सेशन रिप्लेच्या माध्यमातून गेल्या वर्षी त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये घडलेल्या आनंदमय घटनांना उजाळा द्यावा, त्या क्षणांना पुन्हा आठवत पुन्हा एकदा आनंद घ्यावा. कन्वर्सेशन रिप्ले गेल्या वर्षी याच कालावधीदरम्यान सेवेवर व्यतित केलेल्या अव्वल आनंदमय संवादांना पुन्हा उजाळा देण्यावर लक्ष केंद्रित करते.
भारतीयांनी त्यांच्या रोजच्या जीवनांमधील किस्से व अनुभव शेअर करण्यासाठी नेहमीच ट्विटरला प्राधान्य दिले आहे. ते अन्नासंदर्भात सामान्य मते लिहितात आणि उत्तम वातावरणाला साजरे करतात. या लहान-लहान क्षणांमधून त्यांना काहीसा आनंद मिळतो. वर्ष २०२० पूर्वी कोणत्या गोष्टींनी त्यांना अधिक आनंद दिला याबाबत माहिती देण्याच्या उद्देशाने ट्विटर इंडियाने सेवेवरील संवादांचे विश्लेषण करण्याकरिता क्विट.एआय (Quilt.AI)* सुरू केले. टीमने गेल्या वर्षी याच कालावधीसाठी म्हणजेच सप्टेंबर-नोव्हेंबर २०१९ दरम्यानच्या १०० दिवसांहून अधिक कालावधीमध्ये भारतातील २२ शहरांमधील ८५०,००० ट्विट्सचा अभ्यास केला.
संशोधनातून निदर्शनास आले की, दहा सर्वात चर्चा करण्यात आलेल्या थीम्समध्ये अॅनिमल्स, सेलिब्रेशन, सेलिब्रिटी कन्टेन्ट, डूइंग गुड डीड्स, फॅमिली, फूड, ह्यूमर, नॉस्टेल्जिया, रोमांस व स्पोर्टस् (वर्णक्रमानुसार सूचीबद्ध) यांचा समावेश आहे. दक्षिणेकडील एर्नाकुलम, हैद्राबाद व चेन्नई यासारखी शहरे स्पोर्टस्, फूड, सेलिब्रेशन, सेलिब्रिटी कन्टेन्ट व ह्यूमर या थीम्समधील संवादांमध्ये अव्व्लस्थानी राहिले. लुधियाना रोमांसमधील संवादांमध्ये अव्वलस्थानी राहिले. तर रायपूर अॅनिमल्समधील संवादांमध्ये अव्वलस्थानी राहिले. भुवनेश्वरमध्ये फॅमिली व डूइंग गुड डीड्स या थीम्समधील सर्वाधिक संवाद करण्यात आले, तर मुंबई शहर नॉस्टेल्जिया थीममधील संवादांमध्ये अव्वलस्थानी राहिले.
ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष महेश्वरी म्हणाले, ”ट्विटर हे आधुनिक काळातील सार्वजनिक गंतव्य आहे, जेथे विविध लोक त्यांची रूची असलेल्या विषयांबाबत त्यांच्या मतांवर चर्चा करतात. गेल्या वर्षी लोकांनी या सेवेवर सर्वाधिक आनंद घेतला. कन्वर्सेशन रिप्लेसह आमचा भारताच्या विविध भागांमध्ये आनंदाच्या विविध थीम्ससंदर्भात करण्यात आलेल्या वैविध्यपूर्ण संवादांना उजाळा देण्याचा मनसुबा आहे. हे संवाद शेअर करत आमचा भारतीयांना आनंदमय क्षण देत त्या लहान-लहान आनंदी क्षणांची आठवण करून देण्याचा प्रयत्न आहे.”
ट्विटरच्या एपीएसी अॅण्ड एमईएनएचे संशोधन प्रमुख मार्टिन उरेन (@martynuren) म्हणाले, ”आमच्या संशोधनातून निदर्शनास आले आहे की, ट्विटरवर असलेल्या भारतीयांना आनंद देणा-या विषयांवर चर्चा करायला आवडते आणि देशाच्या विविध भागांमध्ये फूड व फॅमिली ते सेलिब्रेशन व सेलिब्रिटी कन्टेन्टपर्यंत विविध विषयांची वैविध्यपूर्ण रेंज उदयास येताना दिसून येऊ शकते. कन्वर्सेशन रिप्लेसह आम्ही लोकांना वर्ष २०१९ मध्ये त्यांनी ट्विट केलेल्या अद्वितीय, आनंदी व उत्साहपूर्ण क्षणांना उजाळा देण्यासोबत आनंद घेतील अशी आशा करतो.”
कन्वर्सेशन रिप्ले: शहरांमध्ये सर्वाधिक आनंद घेण्यात आलेल्या थीम्सची माहिती (वर्णक्रमानुसार मांडणी): निष्पत्तींमधून यापैकी काही शहरांनी अनोख्या पद्धतीने आनंद मिळवण्याचा केलेला प्रयत्न दिसून येतो.
अॅनिमल्स: रायपूरकरांना प्राण्यांसोबत फेरफटका मारण्याचा आनंद चांगलाच माहित आहे
पाळीव प्राणी आणि कधी-कधी अघोषित अभ्यागत म्हणून प्राणी अतुलनीय मैत्री आणि आनंद आणतात. लोक बर्याचदा ट्वीट्सद्वारे मनोरंजक संवाद आणि या खास प्राण्यांसोबत संधी मिळविण्याचे दस्तऐवजीकरण करतात. खरं तर, लोकांचा मूड उंचावण्यासाठी #PetTwitter किंवा #AnimalTwitter असे उपक्रम राबवणे सामान्य गोष्ट नाही. संशोधनामधून असेही दिसून आले आहे की, रायपूरने एर्नाकुलम आणि मुंबईनंतर प्राण्यांबद्दल सर्वाधिक ट्विट केले.
सेलिब्रेशन: हवेमध्ये रंग उधळा आणि हैद्राबादकरांप्रमाणे आनंद साजरा करा
ट्विटरवरील सकारात्मकता अनेकदा आनंदमय साजरीकरणाचे रूप घेते. उत्सव व यशांना, तसेच स्वत:साठी वस्तू खरेदी करताना मिळणारा आनंद खूप मोठा असतो. हैद्राबाद शहर सेलिब्रेशनसंदर्भात अव्वलस्थानी होते आणि त्यानंतर इंदौर व विशाखापटणम या शहरांचा क्रमांक होता.
सेलिब्रिटी कन्टेन्ट: चेन्नईकरांनी फॅन्डमचा खरा आनंद घेतला
ट्विटर चाहत्यांना सर्व संभाव्य अडथळ्यांवर मात करण्यास सक्षम करते व थेट त्यांच्या आवडत्या सिता-यांशी संलग्न करते. चेन्नई सेलिब्रिटी कन्टेन्टमध्ये अग्रस्थानी राहिले, त्यानंतर विशाखापटणम व कोइम्बतूर या शहरांचा क्रमांक होता. दरवर्षी ट्विटरवर या प्रांतामधून मनोरंजनासंदर्भातील संवाद अव्वलस्थानी असल्यामुळे या दक्षिणेकडील शहरांचे प्रभुत्व असल्याबाबत आश्चर्य करण्यासारखे नाही.
डूइंग गुड डीड्स: खरा आनंद दुस-यांना मदत करण्यामधून मिळतो, बरोबर ना भुवनेश्वरकरांनो?
चांगले काम व दयाळूपणा एखाद्याला उद्देशाची जाणीव करून देतात. ट्विटरवरील लोकांनी या संवाद थीममधून भरपूर आनंद घेतला. भुवनेश्वर शहर ट्विट करण्यामध्ये आणि योगदान देण्यामध्ये अव्वलस्थानी राहिले, तर त्यानंतर लुधियाना व मोहाली ही शहरे होती.
फॅमिली: भुवनेश्वरकरांनी कुटुंबासोबत असण्याचा आनंद घेतला
ट्विटर हे कुटुंबासोबत आनंद साजरे करण्याचे आणि त्यांच्यासोबत नवीन क्षण साठवण्याचे गंतव्य देखील आहे. समुदायाचा भाग असल्याच्या आणि प्रियजनांसोबत खास क्षणांना साजरे करण्याच्या आनंदासंदर्भात भुवनेश्वरमधून ट्विट्स सर्वाधिक दिसण्यात आले आणि त्यानंतर कानपूर व चेन्नई शहरांचा क्रमांक होता.
फूड: एर्नाकुलम शहर ठरले भारताची फूड राजधानी/ एर्नाकुलम फूड संवादांमध्ये अव्वलस्थानी
फूड भारतीयांना एकत्र आणते. कूकिंगचा आनंद आणि फूडचा आस्वाद घेताना फोटो काढण्याचा आनंद अद्वितीय आहे. फूडबाबत ट्विट करण्यासंदर्भात एर्नाकुलमने सर्व शहरांवर मात केली. त्यानंतर बेंगळुरू व लुधियाना शहर होते. तुम्हाला जगण्यासाठी खायला आवडते की, खाण्यासाठी जगायला आवडते? तुमच्या ट्विट्समधून याचे उत्तर नक्की मिळेल.
ह्यूमर: व्वा चेन्नईकरांनो, खूपच ‘छान’
ट्विटरवरील ह्यूमर हे स्पष्टवादी, निर्विकार आणि संयमाशिवाय आहे. चेन्नईकरांना चांगले विनोद आवडतात, त्यांनी विनोदासंदर्भात सर्वाधिक ट्विट्स केले आहेत. त्यानंतर मोहाली व कोइम्बतूरचा क्रमांक येतो.
नॉस्टेल्जिया: एकेकाळी मुंबईमध्ये…
मुंबई, विशाखापटणम व कोलकाता ही शहरे ट्विटरवर नॉस्टेल्जियासंदर्भात संवाद करण्यामध्ये अव्वलस्थानी राहिली. या शहरांमधील लोक जुन्या आनंदमय आठवणींना उजाळा देत त्याबाबत ट्विट करतात. या शहरांमधील लोकांनी पोस्ट केलेल्या ट्विट्समध्ये जुन्या काळातील सेपिया-टिंटेड किंवा ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो, लोकप्रिय ठिकाणी काढलेले जुने पोर्ट्रेट फोटो आणि त्यांचे स्वत:चे बालपणीचे फोटोज यांचा समावेश आहे.
रोमांस: लुधियानाची प्रेमभाषा हृदयस्पर्शी आहे
लुधियानामधील लोकांनी रोमांसबाबत सर्वाधिक ट्विट केले, त्यानंतर अहमदाबाद व कोलकाता या शहरांचा क्रमांक होता. तुम्हाला प्रेमामध्ये मने जिंकण्याच्या एक किंवा दोन गोष्टी माहित करायच्या असतील तर या शहरांमधील लोकांना ट्विट करा!
स्पोर्टस्: एर्नाकुलमकरांनो, तयार राहा!
ट्विटर क्रीडाप्रेमींना समविचारी लोकांसोबत खेळांबाबत सर्व गोष्टींची चर्चा करण्याची आणि याप्रकारच्या ‘वॉच पार्टीज’मधून आनंद घेण्याची सुविधा देते. ट्विटरवर सर्वजण एकत्र येत खेळांबाबत आणि ते कधी होणार आहेत याबाबत चर्चा करतात. ते पाठिंबा देत असलेली टीम असो किंवा सुरू असलेले सामने असो किंवा त्यांच्या आवडत्या खेळाडूला वाढदिवसाच्या आनंदमय शुभेच्छा देणारे फॅन आर्ट शेअर करायचे असो यासंदर्भातील संवादामध्ये एर्नाकुलममधील लोकांनी ट्विटरवर खेळाचा सर्वाधिक आनंद घेतला, त्यानंतर भुवनेश्वर व चेन्नईमधील लोकांनी सर्वाधिक आनंद घेतला.
ट्विटर इन्क. (एनवायएसई: TWTR) बाबत:
ट्विटर हे जगात काय चालले आहे आणि लोक आता कशाबाबत बोलत आहेत त्याचे व्यासपीठ आहे. ब्रेकिंग न्यूज आणि मनोरंजनापासून खेळापर्यंत, राजकारण आणि रोजच्या स्वारस्याच्या गोष्टींपर्यंत जगात गोष्टी घडून येतात तेव्हा त्या ट्विटरवर सर्वप्रथम दिसतात. खुल्या संवादामध्ये सामील व्हा. लाइव्ह-स्ट्रिमिंग कार्यक्रम पाहा. जगभरात ४० पेक्षा अधिक भाषांमध्ये उपलब्ध असलेली ही सेवा twitter.com मध्ये विविध प्रकारचे मोबाइल डिवाईसेस आणि एसएमएसद्वारे उपलब्ध होऊ शकते. अधिक माहितीसाठी कृपया about.twitter.com येथे भेट द्या किंवा @Twitter येथे फॉलो करा. ट्विटर आणि पेरिस्कोप अॅप्स कसे डाऊनलोड करायचे याच्या माहितीसाठी twitter.com/download आणि periscope.tv येथे भेट द्या. Ends
Be the first to comment on "कन्वर्सेशन रिप्ले: ट्विटर इंडियाने वर्ष २०१९ मध्ये देशभरातील लोकांना दिलेल्या आनंदमय अनुभवाला दिला उजाळा"