टाटा मोटर्सतर्फे ‘हॅरियर एक्‍सटी+’ सादर विभागातील सर्वोत्तम पॅनोरॅमिक सनरूफ असलेल्‍या या नव्‍या वेईकलची सुरूवातीची किंमत १६.९९ लाख रूपये

मुंबई,  4th सप्‍टेंबर २०२० (GNI): टाटा मोटर्सने आज त्‍यांची प्रमुख एसयूव्‍ही – हॅरियरच्‍या नवीन एक्‍सटी+ व्‍हेरिएण्‍टच्‍या लाँचची घोषणा केली. या नवीन व्‍हेरिएण्‍टची सुरूवातीची किंमत १६.९९ लाख रूपये (एक्‍स-शोरूम दिल्‍ली) आहे. फेब्रुवारी २०२० मध्‍ये बहुप्रतिक्षित हॅरियर बीएस६ सादर केल्‍याच्‍या काही महिन्‍यांनंतरच ही घोषणा करण्‍यात आली आहे.

बाजारपेठेमध्‍ये हॅरियर बीएस६ला मिळालेल्‍या उच्‍च सकारात्‍मक प्रतिसादाला प्रशंसित करण्‍यासाठी सुरूवातीच्‍या किफायतशीर दरामध्‍ये नवीन व्‍हेरिएण्‍ट सादर करण्‍यात आले आहे. दर महिन्‍याला सातत्‍यपूर्ण विकासासह हॅरियरने १५ महिन्‍यांमध्‍ये सर्वाधिक विक्रीचा टप्‍पा गाठला आहे. ही सुरूवातीची किंमत सप्‍टेंबर २०२० मध्‍ये वेईकल बुक करणा-या आणि डिलिव्‍हरीज ३१ डिसेंबर २०२० पर्यंत घेणा-या सर्व ग्राहकांसाठी वैध असेल. १ ऑक्‍टोबर २०२० नंतर किंमतींमध्‍ये वाढ होईल.

हॅरियरचे विभागातील सर्वोत्तम पॅनोरॅमिक सनरूफ खालील अद्वितीय कार्यक्षमतांसह येते.

१.     ग्‍लोबल क्‍लोज – अतिरिक्‍त सुरक्षिततेसाठी पार्किंग केल्‍यानंतर सनरूफ आपोआप बंद होते.

२.    अॅण्‍टी-पिंच फिचर – तुमच्‍यासोबत तुमच्‍या प्रियजनांची अतिरिक्‍त सुरक्षितता.

३.    रेन सेन्सिंग क्‍लोजर – भारतातील अनपेक्षित मान्‍सूनसाठी अतिरिक्‍त सोयीसुविधा.

४.    रोलओव्‍हर स्क्रिनसह काचेवर ब्‍लॅक कोटिंग: बाहेर प्रखर सुर्यप्रकाश असताना देखील केबिनमधील वातावरण प्रसन्‍न राहण्‍याची खात्री.

एक्‍सटी+ व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये अनेक सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत जसे क्रियोटेक २.० डिझेल इंजिन, ६-स्‍पीड मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन, प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प्‍स, ड्युअल फंक्‍शन एलईडी डीआरएलएस, आर१७ अलॉय व्‍हील्‍स, फ्लोटिंग आयलँड ७ इंची टचस्क्रिन इन्‍फोटेन्‍मेंट सि‍स्‍टमसह ८ स्‍पीकर्स (४ स्‍पीकर्स + ४ ट्विटर्स), अँड्रॉईड ऑटो अॅण्‍ड अॅप्‍पल कार प्‍ले कनेक्‍टीव्‍हीटी, पुश बटन स्‍टार्ट, फुली ऑटोमॅटिक टेम्‍परेचर कंट्रोल, रिव्‍हर्स पार्किंग कॅमेरा, ऑटो हेडलॅम्‍प्‍स आणि रेन सेन्सिंग वायपर्स. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत या व्‍हेरिएण्‍टमध्‍ये ड्युअल फ्रण्‍ट एअरबॅग्‍ज, प्रगत ईएसपीसह १२ अतिरिक्‍त कार्यक्षमता, फॉग लॅम्‍प्‍स व रिव्‍हर्स पार्किंग कॅमेरा अशी दर्जात्‍मक सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत.

या नवीन व्‍हेरिएण्‍टच्‍या सादरीकरणाबाबत बोलताना टाटा मोटर्सच्‍या पॅसेंजर वेईकल बिझनेस युनिटचे (पीव्‍हीबीयू) विपणन प्रमुख श्री. विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, ”नवीन उत्‍पादने व वैशिष्‍ट्यांसह आमची उत्‍पादन रेंज सातत्‍याने अद्ययावत करण्‍याच्‍या आमच्‍या न्‍यू फॉरेव्‍हर तत्त्वाशी बांधील राहत आम्‍हाला आमच्‍या प्रमुख एसयूव्‍हीचे नवीन व्‍हेरिएण्‍ट – हॅरियर एक्‍सटी+ सादर करण्‍याचा आनंद होत आहे. सादरीकरणापासून हॅरियर आकर्षक डिझाइन व उत्‍साहवर्धक कार्यक्षमतेसाठी ग्राहक व उद्योगक्षेत्रातील तज्ञांच्‍या पसंतीची राहिली आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, एक्‍सटी व्‍हेरिएण्‍टचे सादरीकरण ग्राहकांना अत्‍यंत आकर्षक दरामध्‍ये पॅनोरॅमिक सनरूफ सारख्‍या प्रिमिअम वैशिष्‍ट्यांचा अनुभव घेण्‍यासाठी पर्याय उपलब्‍ध करून देत टाटा हॅरियरची लोकप्रियता अधिक प्रबळ करेल.”  

ओएमईजीएआरसीवर निर्मिती आणि लँड रोव्‍हरच्‍या दिग्‍गज डी८ व्‍यासपीठामधून संचालित हॅरियरमध्‍ये आकर्षक डिझाइन व कार्यक्षमतेचे परिपूर्ण संयोजन आहे. अत्‍याधुनिक क्रियोटेक १७० पीएस २.० लिटर डिझेल इंजिन शक्‍तीसह ६-स्‍पीड मॅन्‍युअल/ ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन आणि अ‍ॅडवान्स्ड टेरेन रिस्‍पॉन्‍स मोड्स असलेली हॅरियर उत्‍साहवर्धक कार्यक्षमता व आल्‍हाददायी ड्रायव्हिंग अनुभवाची खात्री देते. ऑल न्‍यू हॅरियरबाबत अधिक माहितीसाठी आमची वेबसाइट https://cars.tatamotors.com/suv/harrier ला भेट द्या. 

Be the first to comment on "टाटा मोटर्सतर्फे ‘हॅरियर एक्‍सटी+’ सादर विभागातील सर्वोत्तम पॅनोरॅमिक सनरूफ असलेल्‍या या नव्‍या वेईकलची सुरूवातीची किंमत १६.९९ लाख रूपये"

Leave a comment

Your email address will not be published.


*