टाटा मोटर्सने भविष्यकाळासाठी सज्ज व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीसह केली भारतातील वाहतूक व्यवस्थेची नव्याने व्याख्या

ठळक वैशिष्ट्ये:

●   सब-१ टन ते ५५ टनांच्या कक्षेतील सर्व वाहतूक उत्पादनांसाठी कस्टमाइझ्ड सोल्युशन्स

●   वाहनाचा अपटाइम अधिक ठेवून तसेच कार्यक्षमता वाढवून, ते बाळगण्याच्या खर्चात कपात

●   वाहनाच्या कामगिरीवर अधिक लक्ष केंद्रित करून निष्पत्तीत सुधारणा

●   अत्याधुनिक डिजिटल सोल्युशन फ्लीट एजच्या माध्यमातून ताफ्याचा सुयोग्य वापर

●   आराम व सुरक्षिततेसाठी आधुनिक डिझाइन, नवीनतम तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यपूर्ण सुविधा

●   अनोख्या ‘पॉवर ऑफ सिक्स’ मूल्यविधानासह उच्चमूल्याच्या ग्राहकलाभांमध्ये विस्तार

मुंबई, ऑगस्ट २७, २०२०: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने ‘वाहतूक व्यवस्थेची व्याख्या नव्याने करण्याच्या’ उद्देशाने विकसित केलेला आपला भविष्यकाळासाठी सज्ज उत्पादन पोर्टफोलिओ सादर केला आहे. सब-१ टन ते ५५ टन एकूण वाहन/कॉम्बिनेशन वजनाच्या (जीव्हीडब्ल्यू/जीसीडब्ल्यू) श्रेणीला कार्यक्षम ड्राइव्हट्रेन्सची शक्ती आहे. ही वाहने भविष्यकाळासाठी सज्ज ‘प्रीमियम टफ’ डिझाइन लँग्वेजने युक्त असून, बाजाराच्या गतीशील व विस्तृत वैविध्य असलेल्या मागण्यांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने यांचे इंजिनीअरिंग करण्यात आले आहे. यामध्ये फ्लीट (वाहनांचा ताफा) ऑपरेटर्स, मध्यम आकारमानाची वाहतूक करणारे तसेच छोटे वाहतूकदार या सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी वाहन बाळगण्याचा एकूण खर्च अर्थात टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप (टीसीओ) कमी करण्यात आला आहे. मूल्यसुधारित सुविधा, समन्वनित सेवा खंड आणि वाहनाची सुधारित कार्यक्षमता यांच्याद्वारे आजवर कधीही साध्य न झालेली कामगिरी साध्य करून वाहनाची टीसीओ कमी करण्यात आली आहे. एमअँडएचसीव्ही, आयअँडएलसीव्ही, एससीव्ही आणि पीयू तसेच प्रवासी व्यावसायिक वाहने या व्यावसायिक वाहनांच्या सर्व विभागांत उपलब्ध उद्योगविशिष्ट उपयोजने वापरण्यासाठी कस्टमाइझ्ड वाहतूक सोल्युशन्स विकसित करून, टाटा मोटर्स देशातील ग्राहकांना त्यांच्या विशिष्ट गरजेनुसार वाहन खरेदी करण्यासाठी वाहनांची सर्वांत विस्तीर्ण श्रेणी देऊ करत आहे. 

या श्रेणीचे डिझाइन आणि विकास यांसाठी मार्गदर्शक ठरलेल्या ‘पॉवर ऑफ सिक्स’ मूल्यविधानामुळे प्रत्येक विभागामध्ये आवश्यक त्या क्षेत्रात लक्षणीय प्रगत वैशिष्ट्ये स्थापित झाली आहेत. कमी टीसीओ, उत्पन्ननिर्मितीची सुधारित क्षमता, अधिक आराम, कनेक्टिव्हिटी आणि कामगिरी यांसह अनेक वैशिष्ट्ये या वाहनांमध्ये आहेत. टाटा मोटर्सने प्रत्येक वाहन अद्ययावत केले आहे. त्याचबरोबर अनेक तंत्रज्ञानात्मक व कामगिरीविषयक अपग्रेड्स वाहनांमध्ये करून, अधिक तरल कार्यक्षमता, आरामदायी ड्रायव्हिंग व जागतिक दर्जाच्या कनेक्टिव्हिटी सुविधांच्या माध्यमातून वाहने अधिक उत्पन्न व नफा कमावण्यासाठी पूरक केली आहेत. या महत्त्वाच्या सुविधांमध्ये अधिक शक्तीची निष्पत्ती, श्रेष्ठ दर्जाचे गीअर शिफ्ट, बहुविध ड्रायव्हिंग मोड्स, सुधारित एर्गोनॉमिक्स आणि चालकाच्या सुरक्षिततेसाठी क्रॅश टेस्टेड केबिन्स यांचा समावेश आहे.

टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन व्यवसाय विभागाचे अध्यक्ष श्री. गिरीश वाघ ‘रिडिफाइन्ड ट्रान्सपोर्टेशन’बद्दल म्हणाले, “बीएस६ कडे स्थलांतर केल्यानंतर भारतीय वाहन उद्योग उत्सर्जनाच्या जागतिक नियमांशी तुलना करण्याजोग्या नियमांची पूर्तता करत आहे. उद्योगक्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून आम्ही या स्थित्यंतराचा उपयोग उत्सर्जनविषयक नियमांच्या पूर्ततेच्या पलीकडे नेला आहे. वाहतूक व्यवस्थेची संपूर्णपणे नव्याने कल्पना करून आम्ही आमच्या वाहनांमध्ये कार्यात्मकता, उत्पादनक्षमता, आराम, कामगिरी व कनेक्टिव्हिटीचे नवीन मापदंड निर्माण केले आहेत. आता आमच्याकडे खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाच्या भारतीय उत्पादनांची श्रेणी आहे. ही उत्पादने भारतीय वाहतूकव्यवस्थेचा भविष्यकाळ बदलून टाकणार आहेत. ग्राहकांसाठी ही श्रेणी कमी झालेल्या ओनरशिप खर्चाचा पूर्ण लाभ घेऊन आली आहे किंवा या वाहनांद्वारे त्यांची उत्पन्न कमावण्याची क्षमता वाढणार आहे आणि त्यांच्या गुंतवणुकीवर त्यांना उत्तम मोबदला मिळणार आहे.”

टाटा मोटर्सचे २६००हून अधिक टच पॉइंट्स असलेले व देशभरात दर ६२ किलोमीटर अंतरावर अस्तित्वात असलेले; प्रशिक्षित तज्ज्ञ व टाटाचे अस्सल सुटे भाग यांनी सुसज्ज विस्तृत डीलरशिप व सेवा नेटवर्कमुळे या नवीन श्रेणीचा चालना देत आहे. टाटा मोटर्सतर्फे अनेकविध वाहन देखभाल कार्यक्रम, ताफा व्यवस्थापनाचे उपाय, वार्षिक देखभालीचे (मेण्टेनन्स) पॅकेजेस आदी उपक्रम राबवले जातात. संपूर्ण सेवा २.० या उपक्रमाखाली व्यावसायिक वाहनांची पुनर्विक्री केली जाते. याशिवाय, टाटा अॅलर्ट वॉरंटी कालावधीतील सर्व वाहनांसाठी २४x७ रोडसाइड असिस्टन्स देऊ करते, तर टाटा इन्शुरन्सखाली संरक्षित वाहनांपैकी कोणत्याही वाहनाचा अपघात झाल्यास १५ दिवसांच्या आत दुरुस्तीची निश्चिती टाटा कवच देते.

फ्लीट एज या अत्याधुनिक कनेक्टेड वाहन सोल्युशनच्या माध्यमातून टाटा मोटर्स ताफ्याचे व्यवस्थापन सुयोग्य पद्धतीने करण्याच्या दृष्टीने माहितीपूर्ण निर्णय प्रक्रियेसाठी टेलिमॅटिक्सची सुविधा देऊ करते. हे सोल्युशन ताफ्याच्या मालकांना वाहनाचे डायग्नोस्टिक्स व चालकाच्या वर्तनाविषयी महत्त्वपूर्ण माहिती पुरवते. त्यायोगे ताफ्याचा उपयोग अधिक चांगल्या पद्धतीने करणे शक्य होते. फ्लीट एज हे सोल्युशन वेगवेगळ्या आकारमानांच्या ताफ्यांसाठी लागू व लाभदायी असून, टाटा मोटर्सच्या ट्रक्स व बसेसच्या एमअँडएचसीव्ही श्रेणीसाठी तसेच आयअँडएलसीव्ही व एससीव्हीमधील निवडक मॉडेल्ससाठी उपलब्ध आहे.

टाटा मोटर्सच्या ओनरशिपचा कमी खर्च व गुंतवणुकीवर अधिक चांगला मोबदला या सुविधा देऊ करणाऱ्या भविष्यकालीन व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीत पुढील वाहनांचा समावेश होतो:

छोटी व्यावसायिक वाहने आणि पिक-अप्स (एससीव्ही आणि पीयू)

लोकप्रिय एस, इंट्रा आणि योधाचा समावेश असलेल्या नवीन एससीव्ही आणि पीयू श्रेणीचा पेलोड अनुक्रमे ७५० किलो, १३०० किलो आणि १७०० किलोंपर्यंत वाढवण्यात आला आहे. बाजारपेठेतील आघाडीची टाटा एस आता कार्यक्षम डिझेल, पेट्रोल व सीएनजी अशा इंजिनांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. शिवाय एस डिझेलने आता वाढीव २० हॉर्सपॉवर आणि ४५ एनएम शक्ती विकसित केली आहे, पेट्रोल इंजिन ३० हॉर्सपॉवर व ५५ एनएम निर्माण करते. तर सीएनजीमध्ये २६ हॉर्सपॉवर व ५० एनएमची निर्मिती केली जाते. टाटा मोटर्सची कार्गो व पिकअप वाहनांतील बीएससिक्स श्रेणी सुधारित इंधन कार्यक्षमतेच्या माध्यमातून सर्वोत्तम टीसीओ देऊ करते. एसच्या अन्य सुविधांमध्ये नवीन डिजिटल उपकरणांचा समूह, वाढीव स्टोअरेज जागा आणि यूएसबी पोर्टचा समावेश होते. या श्रेणीत नव्याने समाविष्ट झालेल्या इंट्रा व्ही३० मध्ये आपल्या विभागातील सर्वांत मोठा लोडिंग डेक, पॉवर स्टीअरिंग, गीअर शिफ्ट अॅडव्हायजर आणि इको मोड आहे. टाटा योधा बीएस६ मध्ये अधिक सुरक्षिततेसाठी फ्रण्टल क्रम्पल झोन आणि कॉलॅप्सिबल स्टीअरिंग कॉलम देण्यात आला आहे. याशिवाय पसरणाऱ्या बकेट सीट्स व उपयुक्त डॅशबोर्डचाही समावेश आहे.  

इंटरमिजिएट अँड लाइट कमर्शिल व्हेइकल्स (आयअँडएलसीव्ही): टाटा मोटर्स आयअँडएलसीव्ही बीएसव्ही ट्रक्सची श्रेणी आता ६ ते १० टक्के अधिक चांगली फ्युएल इकोनॉमी आणि विस्तारित सर्व्हिस इंटरवल्स देऊ करत आहे. त्यामुळे ग्राहकांना उद्योगक्षेत्रातील सर्वांत स्पर्धात्मक टीसीओ मिळत आहे. शक्तिशाली इंजिनांमध्ये सुधारित लो-एण्ड टॉर्कही विकसित करण्यात आला आहे. नवीन पेडल डिझाइन्स, कमी झालेले गीअर शिफ्ट्स आणि अधिक चांगल्या ड्राइव्हेबिलिटीमुळे चालकाचा आराम व सोय वाढली आहे. ड्रायव्हिंगचा थकवा यामुळे फारसा जाणवत नाही. नवीन बहुकार्यात्मक उपकरणांचा समूह व उच्च दर्जाची म्युझिक सिस्टम यांमुळे केबिनचा ऑम्बियन्स अधिक चांगला झाला आहे. टिपर रेंजमधील चढ चढण्याची क्षमताही (ग्रेडीअॅबिलिटी) सुधारून ४० टक्क्यांवर नेण्यात आली आहे. टाटा मोटर्सने पूर्णपणे नवीन ३.३ लिटर डिझेल इंजिन देऊ केले आहे. यात शक्ती व टॉर्कचे रेटिंग अनुक्रमे १२५-१५५ हॉर्सपॉवर आणि ३९०-४५० एनएम आहे.

मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहने (एमअँडएचसीव्ही): एमअँडएचसीव्हीची नवीन श्रेणी ३ शक्तिशाली व भरवशाच्या कमिन्स व टर्बोट्रॉन इंजिन्सने युक्त आहे. यात ऊर्जा व वजनाचे अधिक उच्च गुणोत्तर देणाऱ्या ६ पॉवर नोड्सचा समावेश आहे. ६.७ लिटर कमिन्स इंजिन हे ‘जगातील सर्वाधिक विकले जाणारे युरो सिक्स इंजिन’ आहे आणि टाटा टर्बोट्रॉन इंजिन आपल्या विभागातील सर्वोत्तम फ्युएल इकोनॉमी देऊ करते. हे इंजिन असलेले १५,००० बीएस४ वाहने रस्त्यांवर यशस्वीरित्या धावत आहेत. अनुकूलित इंजिने उपचार प्रणालीनंतर एससीआर व ईजीआर प्लस एससीआर देऊ करते. याशिवाय निवडक मॉडेल्समध्ये गीअर शिफ्ट अॅडव्हायजर व १२ टक्क्यांहून अधिक चांगली इंधन कार्यक्षमता देण्यासाठी मल्टि-मोड फ्युएल इकोनॉमी स्विचही  आहेत. एमअँडएचसीव्ही उत्पादनश्रेणीमध्ये अल्ट्रा, सिग्ना व प्रायमा अशा तीन अद्ययावत केबिन्सचे पर्याय आहेत. या अपग्रेडेड केबिन्समध्ये अतिरिक्त स्टोरेज जागा, अधिक रुंद स्लीपिंग बर्थ्स, टीअँडटी स्टीअरिंग, ३-वे अॅडजस्टेबल सीट्स आणि अन्य उपयुक्त सुविधा आहेत. यामुळे चालकाला घरापासून दूर असतानाही घरातील आराम मिळू शकतो. इंजिन ब्रेक, हिल स्टार्ट असिस्ट, रिव्हर्स पार्किंग असिस्टन्स, नवीन इंजेलिजंट उपकरणांचा समूह, एलईडी टेल-लाइट्स यांसारख्या अतिरिक्त सुरक्षितता व उत्पादनक्षम वाढवणाऱ्या सुविधाही यात देण्यात आल्या आहेत. एमअँडएचसीव्ही वाहनश्रेणीत सीएक्स व एलएक्स यांतून कोणताही फीचर पॅक्स निवडण्याची संधी ग्राहकांना आहे.

प्रवासी व्यावसायिक वाहने: टाटा मोटर्स बसेस या मोड्युलर प्लॅटफॉर्म स्थापत्यावर आधारित आहेत आणि यात सर्व उपयोजने व भूप्रदेशांमध्ये चपखल बसणारी उत्पादने देण्यासाठी अत्याधुनिक इंजिनांची विस्तृत श्रेणी वापरण्यात आली आहे. या श्रेणीत सुधारित ऑपरेटिंग अर्थशास्त्राच्या दृष्टीने अधिक रुंद बॉडीज, अधिक आसनक्षमता व बहुविध ड्रायव्हिंग मोड्स आहेत. प्रवाशांच्या आरामावर विशेष लक्ष देऊन बसेसच्या संपूर्ण श्रेणीत सर्वोत्तम सफाई ठेवण्यात आली आहे. आसने अधिक रुंद आहेत. शिवाय अनेक आरामदायी सुविधा आहेत. या वाहनांमध्ये इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टमसारख्या नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी तरतूद आहे. यामध्ये गंतव्य स्थानाविषयीचे बोर्डस्, देखरेख ठेवण्यासाठी कॅमेरा, स्वयंचलित प्रवासी काउंटर, आरएफआयडी-आधारित उपस्थिती प्रणाली यांसारख्या सुविधा या सिस्टममध्ये आहेत.

पूर्णपणे नवीन टाटा विंगर ही आता रुग्णवाहिका आणि प्रवासी उपयोजनांमध्ये व्हीलबेस व आसनांच्या विविध कन्फिग्युरेशन्समध्ये उपलब्ध आहे. विंगरने सर्वोत्तम डिझाइनमुळे नवीन मापदंड स्थापन केला आहे. शिवाय २.२ लिटरचे इंधन कार्यक्षम तसेच २०० एनएम या वाढीव टॉर्कसह डायकर इंजिन व वाढीव इंधन कार्यक्षमतेसाठी इको मोड यात उपलब्ध आहे. ‘प्रिमियन टफ’ डिझाइन तत्त्वज्ञानावर आधारित विंगरमध्ये एलईडी डीआरएल्स, नवीन डॅशबोर्ड डिझाइन, रिअर स्प्लिट ट्विन एसी, चालकाच्या आरामासाठी कॉकपिट शैलीतील डिझाइन आदी सुविधा आहेत. विंगरमध्ये मॅकफर्सन स्ट्रट स्वतंत्र सस्पेन्शनही आहे. कारसारखे गतीशील ड्रायव्हिंग शक्य व्हावे म्हणून विंगर मोनोकॉक चेसिसच्या आधारे तयार करण्यात आली आहे.ends

Be the first to comment on "टाटा मोटर्सने भविष्यकाळासाठी सज्ज व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीसह केली भारतातील वाहतूक व्यवस्थेची नव्याने व्याख्या"

Leave a comment

Your email address will not be published.


*