मुंबई, १९ ऑगस्ट २०२० (GNI): मुलासाठी पहिला हिरो म्हणजे त्याचे वडिल. पण हा हिरो त्याचा मित्र देखील बनू शकतो का? मित्र बनवण्याच्या प्रयत्नात वडिल व मुलामधील नाते बिघडून जाईल की अधिक संपन्न होईल? सोनी सबवरील नवीन मालिका ‘तेरा यार हूं मैं’ हलक्या-फुलक्या पद्धतीने भारतीय कौटुंबिक पार्श्वभूमी सादर करत या आधुनिक दुविधेचे निराकरण करण्याचा प्रयत्न करते. या मालिकेमध्ये प्रतिभावान कलाकार आहेत, जसे सुदीप साहिर, राजेंद्र चावला, श्वेता गुलाटी, अंश सिन्हा, मेघन जाधव, जया ओझा. ही मालिका सुरू होत आहे ३१ ऑगस्ट २०२० पासून रात्री ९ वाजता फक्त सोनी सबवर.
शशी सुमीत प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेली मालिका ‘तेरा यार हूं मैं’ जयपूरमधील बंसल कुटुंबाच्या जीवनावर आधारित आहे. मालिका बदलता काळ आणि कुटुंबातील प्रत्येक पिढीवर बदलत्या काळाचा होणारा परिणाम यामधून प्रेरणा घेते. राजीवला (सुदीप साहिर) त्याचे वडिल, कुटुंबप्रमुख प्रताप बंसलसोबत (राजेंद्र चावला) खुले व मैत्रीपूर्ण नाते नसल्याचे दु:ख आहे आणि तसे त्याचा किशोरवयीन मुलगा रिषभच्या (अंश सिन्हा) बाबतीत घडू नये असे त्याची इच्छा आहे. आजच्या काळाशी जुळवून घेत त्याच्या मुलाच्या जीवनाचा भाग होण्यास उत्सुक असलेला तो वास्तविक व आभासी जीवनात त्याचा मित्र बनण्याचा निर्धार करतो. पण रिषभची वडिलांच्या रूपात मित्र असण्यासाठी अनिच्छा आणि वाटणारी लाज यामुळे राजीव माघार घेतो. रिषभ त्याच्या वडिलांवर खूप प्रेम करतो आणि त्यांचा आदर देखील करतो. पण त्याला ते फक्त तेवढ्यापुरतीच मर्यादित ठेवायचे आणि त्याची जीवनामध्ये जिज्ञासू ‘मित्र’ असण्याची इच्छा आहे.
मालिका प्रेक्षकांना प्रत्येक भारतीय कुटुंबामध्ये घडणा-या घटनांशी संबंधित व त्यामधून प्रेरणा घेतलेल्या परिणामांच्या शृंखलेमध्ये वडिलांच्या आपल्या मुलाला मित्र बनवण्याच्या प्रयत्नांप्रती मुलाच्या प्रतिक्रियेला दाखवणार आहे. मालिकेची लक्षवेधक कथा वडिल-मुलाच्या नात्यावर लक्ष केंद्रित करते. मालिका ‘तेरा यार हूं मैं’मध्ये आधुनिक, पण पुराणमतवादी भारतीय कुटुंबाचे परिपूर्ण संयोजन आहे. ही मालिका संपूर्ण कुटुंबाला आकर्षून घेणा-या सोनी सबच्या हलक्या-फुलक्या व मूल्याधारित मालिकांच्या प्रबळ ऑफरिंग्जमधील नवीन भर आहे.
प्रतिक्रिया: राजीव बंसलची भूमिका साकारणारा सुदीप साहिर म्हणाला, ”मी मालिका ‘तेरा यार हूं मैं’ ३१ ऑगस्टपासून सुरू होणार असल्यामुळे खूपच उत्सुक आहे. मालिकेमध्ये योग्य घटक आहेत, जे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आवडतील. मालिकेमधील घटना अशा आहेत, ज्यांचा आपण आपल्या जीवनांमध्ये कधी-ना-कधी अनुभव घेतला असावा. मी किशोरवयीन मुलाचे (रिषभ) वडिल राजीवची भूमिका साकारत आहे. संपूर्ण मालिका माझे त्याच्याप्रती असलेले अतूट प्रेम आणि त्याच्यासोबत यारी करण्याच्या माझ्या जिज्ञासू प्रयत्नांच्या अवतीभोवती फिरते. माझ्या मुलासोबत मित्र बनण्याचे माझे प्रयत्न आणि रिषभच्या याबाबतीत प्रतिक्रिया दाखवणा-या घटना प्रेक्षकांना खिळवून ठेवतील.”
रिषभ बंसलची भूमिका साकारणारा अंश सिन्हा म्हणाला, ”मला सोनी सबवरील मालिका ‘तेरा यार हूं मैं’चा भाग असण्याचा आनंद झाला आहे. मी मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. रिषभला त्याच्या वडिलांच्या त्याचा मित्र बनण्याच्या प्रयत्नांचा सामना करावा लागणार आहे. मी या मालिकेशी पूर्णपणे संलग्न होऊ शकतो आणि माझ्या भूमिकेप्रमाणेच वास्तविक जीवनात देखील मला माझ्या आईवडिलांसोबत अशाच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. मालिका प्रेक्षकांना किशोरवयीन मुलाच्या विशिष्ट विचारसरणीच्या प्रवासावर घेऊन जाते. माझा दृढ विश्वास आहे की, ही मालिका पाहणारे माझ्या वयाचे प्रत्येकजण माझ्या भूमिकेशी संलग्न होतील.”
दादासा ऊर्फ प्रताप बंसलची भूमिका साकारणारे राजेंद्र चावला म्हणाले, ”मी सोनी सबवरील मालिका ‘तेरा यार हूं मैं’मध्ये दादाजी म्हणजेच राजीवच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. मला विश्वास आहे की, शशी सुमीत प्रॉडक्शन्सची ही मालिका सर्व सोनी सब चाहत्यांना आवडेल. मालिका विशिष्ट भारतीय कुटुंबाच्या बदलत्या स्थितींमधून प्रेरणा घेते, ज्यामुळे मालिका प्रेक्षकांशी जुडली जाते. मालिकेचे लेखन ज्यापद्धतीने करण्यात आले आहे, ते पाहता ही मालिका पाहणे प्रेक्षकांसाठी अत्यंत रोमांचक असणार आहे. मी खात्री देऊ शकतो की, मालिकेच्या संपूर्ण प्रवासादरम्यान एकही नीरस क्षण नसणार.”
जान्हवी बंसलची भूमिका साकारणारी श्वेता गुलाटी म्हणाली, ”सोनी सबवरील मालिका ‘तेरा यार हूं मैं’ ही जयपूरमध्ये राहणा-या बंसल कुटुंबाची कथा आहे. ही मालिका प्रेक्षकांना मुलासोबत खास नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या वडिलाच्या आनंददायी प्रवासावर घेऊन जाईल. यासोबत मालिका प्रेक्षकांना रिषभचे त्याच्या आईसोबत (माझी भूमिका) असलेल्या सर्वोत्तम नात्याला आणि त्याचा बंसल कुटुंबामधील व्यक्तींच्या जीवनावर घडणा-या सकारात्मक परिणामाला दाखवते. मी मालिका सादर होण्याच्या प्रतिक्षेत आहे. मला विश्वास आहे की, मालिकेला चाहत्यांच्या मनामध्ये खास स्थान मिळेल.” पाहा ‘तेरा यार हूं मैं’ ३१ ऑगस्टपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता फक्त सोनी सबवर…….
Be the first to comment on "सोनी सब सादर करत आहे आधुनिक काळातील वडिलांचा आपल्या मुलाचा मित्र बनण्याचा प्रवास दाखवणारी मालिका ‘तेरा यार हूं मैं’, पाहा नवीन यारीचा शुभारंभ ३१ ऑगस्टपासून रात्री ९ वाजता"