श्री. नीरज व्यास, व्यवसाय प्रमुख – सोनी सब
मुंबई, १४ ऑगस्ट २०२० (GNI): सोनी सब लवकरच नवीन मालिका ‘तेरा यार हूं मैं’ सादर करणार आहे. ही मालिका आधुनिक काळातील वडिल व मुलाच्या नात्याला आणि मुलाचा मित्र बनण्याचा प्रयत्न करणा-या वडिलांच्या प्रयत्नांना दाखवते. या अद्वितीय व नवीन संकल्पनेला घराघरापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सोनी सबने मालिकेच्या प्रसिद्धीसाठी बॉलिवुड सुपरस्टार वरूण धवनची निवड केली आहे. तो त्याच्या स्वत:च्या वडिलांसोबत असलेल्या नात्याच्या उबदार व प्रेमळ आठवणींना उजाळा देत वडिल-मुलाच्या नात्यामधील बारकाव्यांना सादर करणार आहे.
मालिकेच्या संकल्पनेला सादर करण्यासाठी साठ सेकंदाच्या हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये वरूण आज जे कोणी आहे, त्यासाठी मित्र, मार्गदर्शक, आत्मविश्वासू व्यक्तीप्रमाणे मदत केलेल्या वडिलांसोबतच्या विविध आठवणींना उजाळा देतो. वरूण ”दोस्ती के फर्ज में, वो मेरे बाप निकले’ म्हणत त्याच्या वडिलांच्या प्रेमळ बाजूला सुरेखरित्या सादर करतो. वरूण त्याच्या वडिलांसाठी व्यक्त करत असलेल्या कृतज्ञता, मैत्री आणि अफाट प्रेमाच्या भावनेमधून ‘तेरा यार हूं मैं’ची संकल्पना दिसून येते. ज्यामुळे तो या मालिकेसाठी अॅम्बेसेडर म्हणून योग्य निवड असल्याचे सिद्ध होते.
प्रेक्षकांना या उत्साहपूर्ण व्हिडिओमध्ये एक मुलगा त्याच्या जीवनातील प्रेमळ आठवणींना उजाळा देताना पाहायला मिळणार आहे, जेथे त्याच्या वडिलांनी त्याला उपकार म्हणून नव्हे तर चुका करण्यास प्रोत्साहित करणा-या मित्राप्रमाणे पाठिंबा दिला आहे. ज्यामुळे त्याला त्याच्या चुकांमधून शिकता येईल. तसेच वडिल त्याच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची दिशा दाखवणारे मार्गदर्शक म्हणून देखील भूमिका पार पाडतात.
टिप्पणी: वरूण धवन
”वडिल व मुलामधील नाते अद्वितीय आणि वडिलच मित्र असणे ही खास बाब आहे. सोनी सबवरील ‘तेरा यार हूं मैं’ ही मध्यमवर्गीय वडिल आणि त्याच्या किशोरवयीन मुलाचा मित्र बनण्यासाठी त्याच्या प्रयत्नांना दाखवणारी सुरेख मालिका आहे. ही अत्यंत ह्दयस्पर्शी कथा आहे. या कथेमधून मला माझ्या वडिलांसोबत व्यतित केलेल्या काही प्रेमळ क्षणांची आठवण झाली.”
श्री. नीरज व्यास, व्यवसाय प्रमुख – सोनी सब
”मालिका ‘तेरा यार हूं मैं’ आधुनिक काळातील वडिल-मुलाचे नाते, त्यामधील भावना, आवड आणि त्यामधील पेचप्रसंगांच्या बारकाव्यांना सादर करते. वरूण धवनसोबत अगोदर देखील काम केले असल्यामुळे आम्हाला त्याच्याशी पुन्हा सहयोग जोडण्याचा आनंद होत आहे. त्याच्यासोबत काम करताना नेहमीच उत्साहपूर्ण वाटते. आम्हाला वरूण हाच क्लासिक भारतीय वडिल-मुलाच्या नात्याला सादर करण्यासाठी योग्य वाटला. या नात्याबाबतचे त्याचे कथन मालिकेच्या प्रोमोमध्ये सुरेखरित्या सादर करण्यात आले आहे. सोनी सब चॅनेल संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारे तत्त्ववादी, हलके-फुलके कन्टेन्ट सादर करण्यामध्ये नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. आम्ही आशा करतो की मालिका ‘तेरा यार हूं मैं’ देखील कुटुंबांमध्ये लोकप्रिय ठरेल.” Ends
Be the first to comment on "सोनी सबने नवीन मालिका ‘तेरा यार हूं मैं’च्या हृदयस्पर्शी व्हिडिओच्या सादरीकरणासाठी निवडले वरूण धवनला"