मेलबर्नच्या ‘स्विस’तर्फे जागतिक स्तरावरील निरोगीपणाची उत्पादने भारतात सादर, आरोग्यास प्राधान्य देण्यासाठी नुशरत भरुचा आणि ख्रिस हेम्सवर्थ यांचा ‘स्विस’ला पाठिंबा

मुंबई, 27 फेब्रुवारी – आरोग्य, निरोगीपणा आणि त्वचासौंदर्य या क्षेत्रात अग्रगण्य असलेला ऑस्ट्रेलियामधील स्विस हा ब्रॅंड आता भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहे. या कंपनीतर्फे आज याबाबतची घोषणा करण्यात आली. निरोगीपणाबाबत विवेकी दृष्टीकोन बाळगणाऱ्या भारतीय ग्राहकांना मेलबर्न येथील या प्रख्यात ब्रॅंडची जीवनसत्त्वे, खनिजे आणि पूरक आहार सहजपणे मिळू शकणार आहेत.

पोषण मूल्यांनी समृद्ध अशी आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेली आणि आधुनिक विज्ञान व जागतिक दर्जाच्या उत्पादन मानकांद्वारे बनविण्यात आलेली स्विस उत्पादने जगभरातील लाखो नागरिकांना दैनंदिन आरोग्य राखण्यात मदत करीत आहेत.

‘स्विस’ची स्थापना श्री. केविन रिंग यांनी केली होती. 1969 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे तिचे पहिले स्टोअर उघडण्यात आले. याच ठिकाणी या कंपनीचे मुख्यालय अजूनही आहे. ‘ई-कॉमर्स’साठी प्रतिष्ठित ‘व्हिक्टोरियन गव्हर्नर एक्सपोर्ट अवॉर्ड’, तसेच ‘ई-कॉमर्स’साठीच ऑस्ट्रेलियन निर्यात पुरस्कार असे सन्मान स्विस उत्पादनांना गेल्या वर्षी मिळालेले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्याच्या सरकारतर्फे ‘ग्लोबल व्हिक्टोरिया’ ही योजना, तसेच ‘व्हिक्टोरियन गव्हर्नमेंट ट्रेड अड इन्व्हेस्टमेंट’ (व्हीजीटीआय) या संस्थेची भारतातील कार्यालये यांच्या माध्यमातून स्विसची उत्पादने भारतीय बाजारपेठेत उतरविण्यात मदत झाली आहे.

सौंदर्य आणि निरोगीपणाच्या क्षेत्रात नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादनांकडे भारतीय ग्राहकांचा कल वाढत आहे. अशी उत्पादने बनविण्यात ऑस्ट्रेलिया हा देश प्रसिद्ध आहे. भारतात 35 वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांची संख्या 60 टक्के अहे. तरुणांची ही जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आहे. या भारतीय तरूण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘स्विस’तर्फे डिजिटल स्वरुपाचे विक्रीचे धोरण अवलंबिले जात आहे.

सुरुवातीला स्विसची 30 सर्वात लोकप्रिय उत्पादने भारतात सादर करण्यात येणार आहेत. यामध्ये ‘स्विस लिव्हर डीटॉक्स’, ’स्विस मॅग्नेशियम’ आणि ‘स्विस हेअर स्किन नेल्स लिक्विड’, तसेच स्त्री-पुरुषांसाठी मल्टिव्हिटॅमिन यांचा समावेश असेल. पुढील काळात ‘स्विस मनुका हनी क्लींजर’, ‘स्विस ब्लड ऑरेंज फेशिअल सीरम’ आणि पेप्टाइड्स, व्हिटॅमिन सी व ई यांचा समावेश असलेले ‘स्विस कॉलजन+’ ही उत्पादने सादर करण्याचेही कंपनीचे नियोजन आहे.

भारतात ‘स्विस’ची उत्पादने सादर होण्याच्या वेळेसच स्विस या ब्रॅंडला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. उत्पादने सादरीकरणाचा समारंभ मुंबईत आज झाला. चित्रपट अभिनेत्री नुशरत भरुचा यांच्या हस्ते या प्रसंगी स्विस ब्रँडचे अनावरण करण्यात आले. ‘स्विस’चे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथील व्यवस्थापकीय संचालक निक मैन, ‘स्विस’ची मूळ कंपनी असलेल्या ‘एच अँड एच’ समुहाचे मुख्य कार्यनीती व कार्यकारी अधिकारी आकाश बेदी, ‘ग्लोबल व्हिक्टोरिया’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोनुल सर्बेस्ट आणि दक्षिण आशियासाठीच्या ‘व्हिक्टोरिया’च्या आयुक्त मिशेल वेड हेही यावेळी उपस्थित होते. ‘थोर’ आणि ‘द अ‍ॅव्हेंजर्स’ या हॉलिवूडच्या चित्रपटांतून कीर्ती मिळवलेले आणि सुप्रसिद्ध निसर्गप्रेमी ख्रिस हेम्सवर्थ यांनी या कार्यक्रमासाठी खास व्हिडिओ संदेश पाठविला.

या कार्यक्रमात बोलताना ‘स्विस’चे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथील व्यवस्थापकीय संचालक निक मैन म्हणाले, “सौंदर्यपूरक आणि नैसर्गिक त्वचासंवर्धन उत्पादनांबरोबरच प्रमुख जीवनसत्त्वे, वनस्पतीजन्य व खनिज घटकांनी युक्त अशा उत्पादनांची श्रेणी भारतीय ग्राहकांना सादर करण्यास आम्हाला मोठा आनंद होत आहे. सिसिली तील माउंट एटना येथील ब्लड ऑरेंज, केप कॉड येथील क्रॅनबेरी असे जगभरातील सर्वात पौष्टिक समृद्ध घटक स्विसमध्ये अंतर्भूत आहेत.  उत्पादनांची गुणवत्ता, सुरक्षा आणि प्रभावीपणा या बाबी राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”

‘ग्लोबल व्हिक्टोरिया’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोनुल सर्बेस्ट म्हणाल्या, “जीवनसत्वे, खनिजे आणि आरोग्यपूरक आहारातील ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा ब्रँड सादर करीत असल्याचा आम्हाला आनंद होत आहे. स्विस हा ब्रॅंड ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात स्थापित आहे आणि वैद्यकशास्त्र, औषधनिर्मिती आणि आहारशास्त्र यांतील उत्पादनांमध्ये राज्याच्या अत्यंत यशस्वी निर्यातीत त्याचे मोठे योगदान आहे. व्हिक्टोरियन सरकारने ‘स्विस’ला निर्यातीमध्ये पाठिंबा दिलेला आहे आणि आज भारतात होणारे ‘स्विस’चे सादरीकरण हा या महान व्हिक्टोरियन कंपनीबरोबरच्या आमच्या विलक्षण सहयोगाचाच एक परिणाम आहे. स्विस भारतात आणणारे निक मैन, त्यांचे पथक आणि त्यांचे भारतातील यांचे मी अभिनंदन करते. ”

एच अँड एच समूहाचे मुख्य कार्यनीती आणि कार्यकारी अधिकारी आकाश बेदी यांनी या प्रसंगी सांगितले, “निसर्गाची शक्ती, विज्ञान व नावीन्य यांवर ‘स्विस’मध्ये भर दिला जातो. आम्ही जगभरातील सर्वात पौष्टिक व समृद्ध घटक निवडतो, तसेच वैज्ञानिक आणि पारंपारिक पुराव्यांच्या आधारे प्रगत फॉर्म्युलेशन वापरतो. आमची उत्पादने उच्च गुणवत्तेची, सुरक्षित आणि प्रभावी आहेत हे आम्ही नेहमीच सुनिश्चित करतो. वैयक्तिक आरोग्य आणि निरोगीपणा यामध्ये भारतीय नागरिक फार जागरूक आहेत, याची आम्हाला कल्पना आहे. त्यांच्या आनंदी जीवन जगण्याच्या आकांक्षेला फुलोरा देण्याचे स्विसचे उद्दीष्ट आहे. आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान जगात यशस्वी होण्यासाठी तरुणाई धडपडत आहे, तिला पाठबळ देण्याचे आम्ही काम करीत आहोत.”

‘स्विस’च्या उत्पादनांचे अनावरण करताना नुशरत भरुचा म्हणाल्या, “मी बॉलिवूडमध्ये सतत चित्रीकरणामध्ये व प्रवास करण्यात व्यग्र असते. अशा वेळी सकारात्मक उर्जा जोपासणे, निरोगी राहणे, आनंदी असणे आणि स्वत:ची चांगली काळजी घेणे हे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच, शारीरिक तंदुरुस्ती आणि चांगले आरोग्य राखणे याला मी माझ्या वैयक्तिक जीवनातील सर्वाधिक महत्त्व देते. या प्रवासातच मी व्यायाम करण्यास आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रवृत्त झाले, फिटनेस हीच संपत्ती आहे आणि आरोग्य हाच जीवनाचा मूलमंत्र आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे.’’

‘स्विस’कडे अनेक प्रकारची उत्पादने आहेत. यातील अनेक उत्पादने विशिष्ट आरोग्यविषयक कारणांसाठी शाकाहारी पद्धतीने बनविण्यात आलेली आहेत. तसेच भारतीय हळदीसारख्या स्थानिक आयुर्वेदिक घटकांचा वापर काहींमध्ये करण्यात आलेला आहे. विविध वयोगटातील स्त्री-पुरूषांच्या आरोग्यासाठी आणि नाविन्यपूर्ण सौंदर्यपूरक घटकांसाठी जीवनसत्वे आणि खनिजे यांची उत्पादने करण्यासाठी स्विस सुप्रसिध्द आहे.

‘स्विस’बद्दल: आरोग्य व निरोगीपणा यां क्षेत्रात स्विस हा नामांकित ब्रॅंड आहे. 1969  मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये तो स्थापन करण्यात आला. विविध प्रकारची जीवनसत्त्वे, पूरक आहार आणि त्वचासौंदर्य यांतील गुणवत्तापूर्ण उत्पादने जगभरातील लाखोजणांना पुरवून त्यांचे आरोग्य, त्यांचे कल्याण आणि आनंद वाढविण्यात स्विस मदत करते आणि या नागरिकांचे दैनंदिन जीवन साजरे करण्यासाठी प्रेरणा देते.

एच आणि एच ग्रुप ही स्विसची मूळ कंपनी आहे. ती जागतिक स्तरावर पोषण व निरोगीपणा या क्षेत्रात कार्यरत आहे. कोट्यवधी लोकांना निरोगीपणाची प्रेरणा देत स्वस्थ व आनंदी बनविण्याचे तिचे उद्दीष्ट आहे. या समाजाच्या आरोग्यविषयक गरजा भागवण्यासाठी ती सकारात्मक योगदान देत आहे. www.hh.global या वेबसाईटवर तिची माहिती मिळेल.

‘ग्लोबल व्हिक्टोरिया’बद्दल: विक्टोरिया या राज्याचा जागतिक अर्थव्यवस्था आणि समुदायाशी संपर्क साधण्याचे कार्य ग्लोबल व्हिक्टोरियाच्या माध्यमातून होते. व्हिक्टोरियातील उद्योगांसाठी जगात संधी निर्माण करणे, तसेच आंतरराष्ट्रीय उद्योगांचे व्हिक्टोरियामध्ये स्वागत करणे ग्लोबल व्हिक्टोरियातर्फे करण्यात येते. बेंगळुरू येथे समर्पित व्यापार आणि गुंतवणूक यासाठी या संस्थेचे कार्यालय 2005 पासून सुरू आहे, तसेच मुंबईतही 2012 पासून तिने दुसरे कार्यालय सुरू केलेले आहे. व्हिक्टोरियातील आणि भारतातील उद्योगांमध्ये समन्वय निर्माण करण्याचे काम ही केंद्रे करीत असतात. global.vic.gov.au या वेबसाईटवर या संस्थेची माहिती उपलब्ध आहे.ends

Be the first to comment on "मेलबर्नच्या ‘स्विस’तर्फे जागतिक स्तरावरील निरोगीपणाची उत्पादने भारतात सादर, आरोग्यास प्राधान्य देण्यासाठी नुशरत भरुचा आणि ख्रिस हेम्सवर्थ यांचा ‘स्विस’ला पाठिंबा"

Leave a comment

Your email address will not be published.


*