नवी मुंबई, २८ जानेवारी, २०२० (GNI): टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझ २०२० च्या नवी मुंबई क्षेत्रीय फेरीत नरसी मुंजी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या हिमांशू बात्रा आणि आस्था बिष्णोई यांनी विजेतेपद पटकावले आहे.
आयटीएम खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या शहर स्तरीय अंतिम फेरीत एकूण १६३ संघांनी भाग घेतला होता. भाग्यशाली विजेते हिमांशू बात्रा व आस्था बिष्णोई यांना ७५,०००* रुपयांच्या रोख पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच त्यांना राष्ट्रीय अंतिम फेरीत भाग घेण्यासाठी पात्र ठरण्यासाठी झोनल फेरीत सहभागी होण्याचीही संधी मिळणार आहे. सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड टेक्नॉलॉजीचे (एससीसीटी) मीनल परमार व उमंग परमार यांनी उपविजेतेपद जिंकले असून त्यांना ३५,०००* रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, मुंबईचे कॉर्पोरेट सेफ्टी लीडर आणि व्हाईस प्रेसिडेंट व सेंटर हेड – मुंबई श्री. चैतन्य एस साठे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझची यंदाची संकल्पना ‘इंडस्ट्री ४.०’ ही आहे. ख्यातनाम क्विझमास्तर गिरी बालसुब्रमण्यम म्हणजेच ‘पिकब्रेन’ यांनी आपल्या अनोख्या, कौशल्यपूर्ण शैलीत स्पर्धेचे सूत्रसंचालन केले.
भारतातील सर्वात मोठी कॅम्पस क्विझ म्हणून नावाजल्या जाणाऱ्या टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझचे हे सोळावे वर्ष असून दोन महिन्यात तब्बल ४० शहरांमध्ये तिचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर देशभरात पाच झोनल फेऱ्या होतील व सर्वात शेवटी मुंबईत महाअंतिम फेरी पार पडेल. टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझच्या राष्ट्रीय विजेत्या संघाला ५ लाख* रुपयांचे रोख बक्षीस व प्रतिष्ठेची टाटा क्रुसिबल ट्रॉफी देऊन गौरविण्यात येईल.
यंदाच्या वर्षी टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझची बक्षिसे टाटा क्लिकच्या सहयोगाने दिली जात आहेत.
क्विझचे नियम, पात्रता निकष आणि इतर घडामोडींबद्दल अधिक माहिती याठिकाणी उपलब्ध आहे – www.tatacrucible.com
*या रकमेतून लागू असलेल्या करांची रक्कम वजा केली जाईल. Ends
Be the first to comment on "टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझ २०२० च्या नवी मुंबई क्षेत्रीय फेरीत नरसी मुंजी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या टीमने पटकावले विजेतेपद"