Governor inaugurates the Diamond Jubilee of Sanyas Ashram

MUMBAI, 16th January 2020 (GNI): Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari today inaugurated the Diamond Jubilee celebrations of the Sanyas Ashram at Vile Parle in Mumbai on Thursday (16th Jan).

President of the Sanyas Ashram Trust Mahamandaleshwar Vishweshwarananda Giri, MLA Mangal Prabhat Lodha, MLA Parag Alawni, playback singer Anuradha Paudwal, Swami Shukadevananda, Pranavananda, Akhandananda and others were present. Ends

In Marathi:

विले पार्ले येथील संन्यास आश्रमाचा अमृत महोत्सव
युवकांनी शूरवीर बनून समाजहितासाठी कार्य करावे : राज्यपाल
 

     संन्यास आश्रम चांगला असला तरीही प्रत्येकाने सन्यासी होऊन चालणार नाही. धर्माशिवाय राष्ट्र चालत नाही तसेच राष्ट्राशिवाय धर्म वाढत नाही. यास्तव ‘वीरभोग्या वसुंधरा‘ उक्तीप्रमाणे युवकांनी शूरवीर बनून राष्ट्रधर्म वाढविण्यासाठी कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

विलेपार्ले येथील संन्यास आश्रमाच्या अमृत महोत्सवाचे उद्घाटन राज्यपालांच्या उपस्थितीत झाले, त्यावेळी ते बोलत होते.

धर्म म्हणजे आदर्श मूल्यांकरिता जगणे, इतरांचा आदर करणे व चारित्र्य घडवणे, असे सांगून धर्माचे संस्कार युवा पिढीला दिल्यास चारित्र्यसंपन्न युवक तयार होतील, असे त्यांनी सांगितले.   

राष्ट्रदेवो भव ही संकल्पना पुरातन काळापासून आपल्या देशात आहे. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी भारत प्रांताप्रांतांमद्धे विभागला होता व ब्रिटीशांमुळे तो एकत्र झाला, ही धारणा अत्यंत चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.

सधन लोकांनी आपल्या संपत्तीचे मालक न होता विश्वस्त जाणिवेने समाजासाठी धन वापरले पाहिजे, असे त्यांनी संगितले.

आज शिक्षण म्हणजे केवळ रोजगाराचे साधन असे समीकरण झाले असताना संन्यास आश्रम येथे आधुनिक शिक्षणासोबत  वैदिक शिक्षण देत धर्म जागरण व श्रद्धा जागृतीचे कार्य करीत असल्याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले.

संन्यास आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरि यांनी आश्रमातर्फे केल्या जाणार्‍या धर्म, संस्कृती व समाजकार्याची माहिती दिली.

आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अळवणी,  स्वामी शुकदेवानंद, स्वामी प्रणवानंद, स्वामी अखंडानंद, गायिका अनुराधा पौडवाल आदि मान्यवर उपस्थित होते.

Be the first to comment on "Governor inaugurates the Diamond Jubilee of Sanyas Ashram"

Leave a comment

Your email address will not be published.


*