देशात ग्लॉकोमा रुग्णांचा आकडा वाढतो आहे, १२ दशलक्ष नोंदणिकृत आणि ९०% ग्लॉकोमा निदान न झालेले रुग्ण अधिक

नवी मुंबई, १४ मार्च २०२१ (GNI): जागतिक ग्लॉकोमा सप्ताहचे आयोजन ७ ते १३ मार्च दरम्यान दरवर्षी करण्यात येते. जागतिक ग्लॉकोमा सप्ताह साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट हे लोकांना ऑप्टीक नर्व्ह तपासणीसह नियमितपणे डोळ्यांची तपासणी करण्यासाठी प्रोत्साहन देऊन ग्लॉकोमामुळे येणाऱ्या अंधत्वाचे समूळ उच्चाटन करणे हे आहे.  २०२१ची संकल्पना “द वर्ल्ड इज ब्राईट, सेव्ह युअर साईट!” आहे. लोकांनी नियमित डोळ्यांची तपासणी केल्यास सभोवतालचे सौंदर्य, चैतन्य आणि साहसाने रसरसलेले जग पाहता येईल’ ही भावना यातून अधोरेखित होते.     

भारत ग्लॉकोमाची जागतिक राजधानी बनू शकतो व डोळ्यांचा विकार बळावून कायमचे अंधत्व येऊ शकते. या विकाराने १२ दशलक्ष लोकांना प्रभावित केले असून ९०% हून अधिक केसचे निदान होऊ शकलेले नाही. आपल्या देशात वरिष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. तसेच वाढत्या मधुमेहाच्या तक्रारी सोबतच दृष्टीत वक्रपणा येणे या सारख्या धोक्याच्या घटकांमुळे आपल्या देशात संसर्गजन्य नसलेले ग्लॉकोमासारखे विकार वेगाने बळावू लागले आहेत. जगातील एकूण दृष्टीहिनांपैकी, २०% व्यक्ती आपल्या देशात आहेत असे नवी मुंबईतील डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलच्या डॉ. स्नेहा मधुर कांकरिया यांनी सांगितले. ग्लॉकोमाला अटकाव करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना नाहीत. ग्लॉकोमापासून उद्भवणाऱ्या अंधत्वाला प्रतिबंध करण्याचा केवळ एकच मार्ग आहे. या विकाराची लक्षणे प्रथम टप्प्यात दिसत नाहीत. या विकाराचे शक्य तितक्या लवकर निदान आणि त्यावर उपचार डोळ्यांवर आघात करणाऱ्या या छुप्या आजाराला अटकाव करू शकतो.

डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल, नवी मुंबईच्या डॉ. स्नेहा मधुर कांकरिया म्हणाल्या की, ग्लॉकोमाचे दोन मुख्य प्रकार आहेत. ओपन अँगल ग्लॉकोमा आणि क्लोज अँगल ग्लॉकोमा. ओपन अँगल ग्लॉकोमा हा ग्लॉकोमाचा सर्वसामान्य प्रकार आहे. एकंदर ९०% ग्लॉकोमा केसमध्ये हा प्रकार आढळून येतो. याचा वेग मंद असतो. डोळ्याच्या मध्यभागाला जोवर हानी होत नाही तोवर रुग्णाची दृष्टी शाबूत राहते. जर रुग्णाने डोळ्यांची तपासणी केली नाही तर कायमची हानी होऊ शकते. ग्लॉकोमाचा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो – सुमारे २.३% व्यक्तींना आयुष्यभर ग्लॉकोमाचा धोका असू शकतो असे नोंदीवरून स्पष्ट होते. तरीच, ज्या व्यक्तींचे वय ४० पेक्षा अधिक आहे, ज्यांच्या कुटुंबात ग्लॉकोमा आणि मधुमेहाचा इतिहास आहे, ज्या व्यक्तींना दृष्टी वक्री होण्याचा त्रास सतावतो त्याचप्रमाणे स्टेरॉईड औषधे, डोळ्यांचे ड्रॉप, गोळ्या, इनहेलर आणि त्वचा मलमांचा वापर करणाऱ्यांना मोठा धोका असतो. या गटात मोडणाऱ्या व्यक्तींनी दरवर्षी ग्लॉकोमाची तपासणी केली पाहिजे.

डॉ. स्नेहा मधुर कांकारिया पुढे माहिती देतात की, दृष्टिहीनत्व येऊ नये यासाठी ग्लॉकोमावर प्रभावी उपचार केला पाहिजे. याचे निदान दोन वर्गवारीत विभागलेले आहे: वैद्यकीय तपासणी आणि निदान चाचणी. वैद्यकीय तपासणीत डोळ्यांची तपासणी खास साधने जसे की, स्लीट लँप बायोमायक्रोस्कोपी, टोनोमीटर आणि गोनीओस्कोपीने करण्यात येते. निदान चाचणीत पेरीमेट्री, पॅचीमेट्री, ऑप्टीक नर्व्ह हेड फोटोग्राफी, ऑप्टीकल कोहेरेन्स टोमोग्राफी, स्कॅनिंग लेसर पोलारीमेट्री आणि कॉन्फोकल लेसर स्कॅनिंग ऑप्थाल्मोस्कोपचा समावेश आहे. Ends

Be the first to comment on "देशात ग्लॉकोमा रुग्णांचा आकडा वाढतो आहे, १२ दशलक्ष नोंदणिकृत आणि ९०% ग्लॉकोमा निदान न झालेले रुग्ण अधिक"

Leave a comment

Your email address will not be published.


*