अपोलो फार्मसी’ ने ५००० स्टोअर्सचा टप्पा पार केला

मुंबई, २० सप्टेंबर २०२२ (GNI): भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात विश्वसनीय ओम्नी चॅनेल फार्मसी रिटेलर अपोलो फार्मसीने भारतामध्ये आपले ५०००वे स्टोर सुरु करून आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. ५०००व्या स्टोरमध्ये ऑडिओलॉजी आणि ऑप्टोमेट्री यासारख्या सेवा देखील उपलब्ध आहेत. या फार्मसीमध्ये एक किऑस्क आहे ज्याठिकाणी ग्राहक त्यांच्या आवश्यक तपासण्या लगेच करून घेऊ शकतील, डॉक्टरांसोबत खाजगी व्हिडिओ कन्सल्टेशन बुक करू शकतील आणि घरून नमुने जमा करण्यासाठी लॅब टेस्ट ऑर्डर करू शकतील.

श्रीमती शोबना कामिनेनी, एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेयरपर्सन, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड यांनी चेन्नईमध्ये १९८७ साली सुरु झालेल्या या वाटचालीबद्दल सांगितले, “ग्राहकांच्या गरजा आणि प्राथमिकता वाढत आहेत, बदलत आहेत व त्यांना अनुरूप आम्ही फक्त किमतींमध्येच नाही तर श्रेणी व सेवांमध्ये देखील अनोखेपण आणणे सुरु ठेवले आहे. आहार, व्यायाम, दर्जेदार औषधे व वेलनेस उत्पादने विश्वसनीय स्रोतांकडून खरेदी करण्याबाबतची जागरूकता ग्राहकांमध्ये वाढत आहे, ज्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांवर जास्त लक्ष केंद्रित केले जात आहे. अधिक चांगल्या गुणवत्तेच्या आरोग्यसेवा उत्पादनांची मागणी आणि वेलनेसवर लक्ष केंद्रित केले जाणे वाढत आहे, ज्यामुळे भारतामध्ये संघटित रिटेल फार्मसी उद्योगाच्या वाढीला प्रोत्साहन मिळत आहे.”

आज ६० कोटींपेक्षा जास्त भारतीय अपोलो फार्मसीच्या सेवांचा लाभ घेत आहेत. दर दिवशी जवळपास ७ लाख ग्राहकांना आम्ही सेवा प्रदान करतो आणि भविष्यात हा आकडा १० लाखांपर्यंत वाढवणे आमचे उद्दिष्ट आहे. आमचे डिजिटल ऍप अपोलो २४/७ ने सर्वांसाठी अधिक चांगल्या आरोग्याच्या एका नव्या युगाची सुरुवात केली आहे, ज्यामुळे आज कोणीही ग्राहक कुठूनही, कधीही अगदी सहजपणे अपोलोच्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. ऍपमार्फत अजून ५० कोटी भारतीय फक्त २४ तासांत आपली औषधे मिळवू शकतात.

श्री.पी जयकुमार, सीईओ, अपोलो फार्मसीज लिमिटेड यांनी सांगितले, “सर्व रुग्णांना अस्सल औषधे संपूर्ण दिवसभरात कधीही मिळावीत हे आमचे चेअरमन पद्म विभूषण डॉ. प्रताप सी रेड्डी यांचे महत्त्वाकांक्षी व्हिजन पुढे नेताना आम्हाला खूप आनंद होत आहे. भारतभरात १०,००० स्टोर्सचे उद्दिष्ट असून आरोग्यसेवांसाठी आवश्यक उत्पादने सर्वांना सहजपणे मिळावीत यासाठीचे आमचे प्रयत्न आम्ही सुरु ठेवू.”ends GNI SG

Be the first to comment on "अपोलो फार्मसी’ ने ५००० स्टोअर्सचा टप्पा पार केला"

Leave a comment

Your email address will not be published.


*