केनव्यूने इंडियन अकॅडेमी ऑफ पेडियाट्रिक्स (IAP) निओनॅटोलॉजी चॅप्टरच्या सहयोगाने प्रकाशित केल्या रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या नवजात बाळांसाठी स्किनकेअर शिफारशी


राष्ट्रीय, 5 मार्च 2025 (GNI) : महसुलाच्या संदर्भात जगातील सर्वात मोठी प्युअर-प्ले कन्ज्युमर हेल्थ कंपनी, केनव्यूने रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या नवजात बाळांसाठी स्किनकेयर प्रोटोकॉलसाठी शिफारशी प्रकाशित केल्या आहेत. या शिफारशींना IAP (आयएपी) निओनॅटोलॉजी चॅप्टरने मान्यता दिली आहे. इंडियन अकॅडेमी ऑफ पेडियाट्रिक्स (IAP) च्या ६१व्या वार्षिक परिषद पेडीकॉन २०२४ (PEDICON 2024) मध्ये या शिफारशी प्रकाशित करण्यात आल्या. या शिफारशींचा उद्देश भारतात रुग्णालयातील निओनॅटोलॉजी विभागात भरती करण्यात आलेल्या नवजात बाळांच्या त्वचेच्या देखभालीसाठी पुराव्यांवर आधारित क्लिनिकल प्रॅक्टिसच्या मार्गदर्शक सूचना देणे आणि वैज्ञानिक सिद्धांत व अनुभवांवर आधारित पुराव्यांनुसार त्वचा देखभाल प्रोटोकॉल लागू करणे हा आहे.
(NICU) एनआयसीयूमध्ये तापीय असंतुलन, फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाईटचे नुकसान, त्वचेवर जखमा आणि सेप्सीसमुळे संसर्ग तसेच अंतर्गत व बाह्य घटकांमुळे नवजात बाळांच्या त्वचेचे नुकसान होण्याचा धोका खूप जास्त असतो. त्यामुळे त्यांचा मृत्यू दर व आजारपणे यांच्यात वाढ होते. पण जर (NICU) एनआयसीयूमध्ये पुराव्यांवर आधारित त्वचा देखभाल प्रोटोकॉल लागू केले गेले आणि उपचारांचा एक अनिवार्य भाग म्हणून त्वचेची तपासणी केली गेली तर ही गुंतागुंत कमी केली जाऊ शकते.
आजच्या काळात (NICU) एनआयसीयूमध्ये नवजात बाळांच्या त्वचेची देखभाल करण्याच्या गुणवत्तेशी संबंधित अनेक दृष्टिकोन आहेत, ज्याचा परिणाम नवजात बाळांच्या आरोग्य व मृत्युदरावर होऊ शकतो. या शिफारशींचा उद्देश रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या नवजात बाळांच्या त्वचेच्या देखभालीसंदर्भात क्लिनिकल शिफारशी देऊन त्यातील कमतरता दूर करणे हा आहे.
या शिफारशी डेल्फी पद्धतींनी तयार करण्यात आल्या आहेत, यामध्ये एक वैज्ञानिक सल्लागार मंडळाचे विचार घेण्यात आले आहेत, या मंडळामध्ये डॉ. आर किशोर कुमार, डॉ. अरुण इनामदार, डॉ. आलोक भंडारी, डॉ. राजेश कुमार, डॉ. खेया उत्तम घोष, डॉ. जे के मित्तल आणि डॉ. प्रदीप सूर्यवंशी, डॉ. संजय वजीर आणि डॉ. सत्येन हेमराजानी यांच्यासह विविध विख्यात पेडियाट्रिशियन्स आणि निओनॅटोलॉजिस्टस यांचा समावेश होता. याचे संचालन IAP (आयएपी) निओनॅटोलॉजी चॅप्टरचे अध्यक्ष डॉ नवीन बजाज यांनी केले.
या शिफारशींमध्ये (NICU) एनआयसीयूमध्ये नवजात बाळांच्या त्वचेच्या देखभालीसंदर्भात व्यावहारिक मार्गदर्शन प्रदान केले जाते. यामध्ये तपासणी साधने आणि जोखीम मूल्यांकन संरचनेच्या माध्यमातून त्वचेच्या समस्या ओळखणे आणि त्यावरील उपचारांसाठी तपासणीची आवश्यकता, हातांच्या स्वच्छतेसाठी काटेकोर प्रथा, संसर्ग कमी करण्यासाठी नवजात बाळांची स्वच्छता, बाळाला केव्हा आणि कशी अंघोळ घालावी, ट्रान्सएपिडर्मल वॉटर लॉस (TEWL) टाळण्यासाठी इमोलिएंट्सचा उपयोग, नाळेची काळजी, पेरिनियल देखभाल, न्यूरोडेव्हलपमेंटल केयर, त्वचेची देखभाल आणि डिस्चार्जच्या वेळी आईवडिलांना माहिती देणे या घटकांबरोबरीने (NICU) एनआयसीयूमध्ये भरती असलेल्या बाळांच्या स्वच्छतेचे महत्त्व यांचा समावेश आहे.
केनव्यू इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री मनीष आनंदानी यांनी सांगितले, “भारतात (NICU) एनआयसीयूमध्ये नवजात बाळांच्या देखभालीशी संबंधित नियमित त्वचा देखभालीच्या अनेक वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस आहेत. आमच्या या शिफारशींचे उद्दिष्ट आरोग्य देखभाल प्रोफेशनल्सना स्टँडर्डाइज्ड पुराव्यांवर आधारित त्वचा देखभाल प्रोटोकॉलबाबत व्यापक मार्गदर्शन प्रदान करणे हे आहे. प्रत्येक नवजात बाळ जिवंत राहावे, इतकेच नव्हे तर निरोगी राहावे, उत्तम विकास व्हावा हे आमचे उद्दिष्ट आहे.”
IAP (आयएपी) निओनॅटोलॉजी चॅप्टरचे चेयरपर्सन डॉ नवीन बजाज यांनी सांगितले, “(NICU) एनआयसीयूमध्ये भरती करण्यात आलेल्या नवजात बाळांची सर्वसमावेशक देखभाल केली जाणे ही त्यांच्या जिवंत राहण्याची आणि लवकरात लवकर डिस्चार्ज केले जाण्याची गुरुकिल्ली आहे. या नवजात बाळांच्या त्वचेची देखभाल त्यांच्या एकूण उपचार व्यवस्थापन योजनेचा एक अनिवार्य पैलू आहे आणि अपुऱ्या दिवसांच्या बाळांसाठी हे खूप जास्त आवश्यक आहे. पुराव्यांवर आधारित असलेल्या या शिफारशी नवजात बाळांच्या त्वचेच्या देखभाल प्रॅक्टिसेस सुव्यवस्थित करण्यात मदत करतील, नवजात बाळांची आजारपणे आणि मृत्यू दर यांना कमी करण्यात योगदान देतील.” Ends GNI

Be the first to comment on "केनव्यूने इंडियन अकॅडेमी ऑफ पेडियाट्रिक्स (IAP) निओनॅटोलॉजी चॅप्टरच्या सहयोगाने प्रकाशित केल्या रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या नवजात बाळांसाठी स्किनकेअर शिफारशी"

Leave a comment

Your email address will not be published.


*