भारतातील तंबाखूच्या धोक्यावर इलाज : नाविन्यपूर्ण कार्यक्रमामुळे शिक्षक करणार बदलाचे नेतृत्व

मुंबई, २४ जानेवारी २०२४ (GNI): आपल्या देशात तंबाखूशी संबंधित मृत्यूचा दर हा दररोज ३७०० व्यक्ती इतका आहे. महाराष्ट्रात तर संपूर्ण लोकसंख्येच्या २७ टक्के लोकसंख्या ही तंबाखू सेवनाने होणार्‍या समस्यांनी त्रस्त आहे. राज्यातील याच समस्येवर उपाय शोधण्यासाठी नाविन्यपूर्ण अशा उपक्रमाची सुरुवात करण्यात येत असून या अंतर्गत शाळांमध्ये तंबाखू नियंत्रणाचे प्रयत्न वाढवण्यासाठी शिक्षकांनाच महत्त्वपूर्ण प्रभावशाली व्यक्ति म्हणून सादर करण्यात येत आहे.

नवी मुंबई येथील हिलीस सेखसरिया इन्स्टिट्युट फॉर पब्लिक हेल्थ, यूएसए मधील हारवर्ड टी. एच.चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ (एचएसपीएच) आणि डाना फारबर कॅन्सर इन्स्टिट्यूट (डीएफसीआय) यांनी एकत्र येऊन बिहार शिक्षण विभागाच्या सहकार्याने (डीओई) एकत्र येऊन महत्त्वपूर्ण अशा तंबाखू मुक्त शिक्षक – तंबाखू मुक्त समाज कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. हा उपक्रम म्हणजे शिक्षकांशी संबंधित असा तंबाखू नियंत्रणासाठी उपयोगात आणला जाणारा पहिला कार्यक्रम आहे.

तंबाखू मुक्त शिक्षक – तंबाखू मुक्त समाज हा संशोधनात्मक पुराव्यांवर आधारीत उपक्रम असून या अंतर्गत शिक्षकांना तंबाखू मुक्त करण्या बरोबरच बिहार मधील शाळांमध्ये तंबाखू नियंत्रण योजनांवर अंमलबजावणी करण्यात येते. २००९- २०११ दरम्यान काही निवडक शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आणि या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळून ५० टक्के शिक्षकांनी तंबाखू पासून मुक्ती मिळवली तर ९२ टक्के शाळांनी तंबाखू मुक्त शाळेची यशस्वी अंमलबजावणी केली.

महाराष्ट्रात तंबाखूच्या दुष्परिणामांची गडद छाया लोकसंख्येवर मोठ्या प्रमाणावर असून अंदाजे २७ टक्के जनतेला तंबाखू सेवना मुळे समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या हानीकारक व्यसनाचे प्रमाण हे खूप मोठे आहे, यामुळे राज्यभरातील व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईतील गर्दी बरोबरच पुण्यातील निसर्गरम्य परिसरात सुध्दा तंबाखू मुळे रोज होणार्‍या मृत्यूची संख्या ही खूप मोठी असून यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. यामुळे केवळ मृत्यूच होत नाही तर या मुळे श्वसनाशी संबंधित समस्या, हृदयविकार आणि विविध प्रकारच्या कॅन्सर सारख्या आरोग्य समस्याही निर्माण होतांना दिसतात. सार्वजनिक आरोग्यावर होणारा हा घातक परिणाम पाहून नाविन्यपूर्ण उपायांची गरज असून तंबाखू मुक्त शिक्षक – तंबाखू मुक्त समाज कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असून यामुळे महाराष्ट्रातील समाज, शिक्षक आणि व्यक्तींना तंबाखूच्या घातक परिणामांवर मात करण्यास सक्षम केले जाणार आहे.

“तंबाखूच्या विरोधात शिक्षकांना बदलाचे निर्माते म्हणून सक्षम करताना आम्ही आपल्या समाजाला तंबाखू मुक्त आणि आरोग्यपूर्ण भविष्य देऊ करत आहोत. तंबाखू मुक्त शिक्षक – तंबाखू मुक्त समाज कार्यक्रम म्हणजे शिक्षणातील बदलाची उर्जा मिळून आरोग्यासाठी असलेला धोका कमी करत असल्याचे उत्तम द्योतक आहे.” असे हिलीस सेखसरिया इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थ चे संचालक डॉ. प्रकाश गुप्ता यांनी सांगितले.

प्रकल्पाबद्दल माहिती: बिहार मधील यशानंतर नुकत्याच हाती आलेल्या अभ्यासानुसार हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरु करण्यात येत आहे. त्यानंतर प्रकल्पाच्या टिमने मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी एक स्वयं-मदत पुस्तिका हे पुराव्यांवर आधारीत उपक्रमानुसार तयार केले आहे. या स्वयं-मदत पुस्तिकेच्या माध्यमातून शाळांमधील प्रमुखांना तंबाखूच्या वापरापासून मुक्ती मिळवण्यासह शाळांमध्ये तंबाखू मुक्त शाळांचे वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

स्वयं-मदत पुस्तिके मधील महत्त्वपूर्ण घटक :

१. “तंबाखू मुक्त शिक्षक – तंबाखू मुक्त समाज” कार्यक्रम साहित्य:

    ◦ स्वत: अंमलबजावणी द्वारे मुख्याध्यापकांना सक्षम करणे.

    ◦ शिक्षक एक आदर्श, तंबाखू चे आरोग्यावर होणारे वाईट परिणाम, व्यसन सोडण्यास प्रोत्साहीत करणे, व्यसन सोडण्याची कौशल्ये, सोडतांना होणाऱ्या परिणामांचे नियोजन आणि तंबाखू मुक्त राहणे टिकवून ठेऊन यश साजरे करणे अशा सहा विषयांवर आधारीत कार्यक्रम आहे.

२. तंबाखू सोडणे/थांबवण्यासाठी सहकार्य करणे :

   ◦ मुख्याध्यापक / शिक्षकांना व्यसना विषयी समजावून सांगणे.

   ◦ अधिक माहितीसाठी आणि प्रत्यक्ष सल्ल्यासाठी सरकारी टोल फ्री नं (१८००-११२-३५६) वर संपर्क साधण्यास सांगणे.

३. तंबाखू मुक्त शाळांसाठी योजना :

    ◦ अभ्यास साहित्य आणि गटचर्चेद्वारे अनिवार्य अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करणे.

४. पोस्टर्स आणि वॉल पेंटिंग:
◦ दर महिन्याला विषयानुसार सुलभ प्रकारे चर्चा करुन तंबाखू मुक्त शाळा तयार करण्यासाठी प्रयत्न करणे.

अंमलबजावणीचे वेळापत्रक:

तंबाखू मुक्त शिक्षक – तंबाखू मुक्त समाज कार्यक्रमाअंतर्गत स्वयं-मदत पुस्तिके मध्ये वेळापत्रक आखण्यात आले असून यातून शैक्षणिक संस्था तंबाखू मुक्त करण्यावर भर दिला आहे. या अंतर्गत तंबाखू मुक्त समाजाची निर्मिती करुन प्रात्यक्षिक आणि गोष्टींच्या माध्यमातून तंबाखूचे आरोग्यावर होणार्‍या परिणामांविषयी जागरुकता निर्माण करण्यात येणार असून त्याच बरोबर सेवनाच्या इच्छेवर ताबा मिळवण्यासाठी पर्यायी पध्दतींच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

“आज प्रकाशित करण्यात आलेल्या स्वयं-मदत पुस्तिके मुळे महाराष्ट्रातील शिक्षकांना तंबाखू मुक्त शिक्षक – तंबाखू मुक्त समाज कार्यक्रमाची अंमलबजावणी त्यांच्या शाळेत करुन त्यांच्या शाळेसह महाराष्ट्र तंबाखू मुक्त आणि आरोग्यदायी करणे सोपे जाणार आहे.” असे नवी मुंबईतील हिलीस सेखसरिया इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थचे संचालक डॉ. मंगेश पेडणेकर यांनी सांगितले.

हिलीस सेखसरिया इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थ विषयी माहिती:

जवळजवळ दोन दशकांपासून हिलीस सेखसारीया इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थने नाविन्यपूर्ण विज्ञानासह पुराव्यावर आधारीत संशोधनाच्या मदतीने सार्वजनिक आरोग्याविषयी कार्य सुरु ठेवले आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात गुणवत्तापूर्ण संशोधन करुन संस्थेतर्फे समाजाच्या भल्यासाठी निष्कर्श काढले जातात.ends GNI

Be the first to comment on "भारतातील तंबाखूच्या धोक्यावर इलाज : नाविन्यपूर्ण कार्यक्रमामुळे शिक्षक करणार बदलाचे नेतृत्व"

Leave a comment

Your email address will not be published.


*