‘आपत्कालीन काळजी जी नेहमी फक्त एक कॉल दूर असते’वैद्यकीय आणीबाणीसाठी नवी मुंबईत २५ ठिकाणी फ्लॅश मॉब

नवी मुंबई, १४ जून २०२३ (GNI):- अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई संपूर्ण नवी मुंबईतील अनेक ठिकाणी फ्लॅश मॉबद्वारे वैद्यकीय आणीबाणीचा सामना करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याबाबत जागरुकता वाढवत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून अपोलोने नवी मुंबईत २५ वर्दळीच्या ठिकाणी फ्लॅश मॉबद्वारे लोकांना जागरूक केले उदा.बेलापूर पोलीस स्टेशन, घणसोली बस डेपो, ग्रँड सेंट्रल मॉल-सिवूड, डी-मार्ट कोपरखैरणे, नेरुळ आणि वाशी रेल्वे स्टेशन या ठिकाणी १५-२० मिनिटांचा फ्लॅश मॉब घेण्यात आला. या उपक्रमाला प्रोत्साहन देताना श्री संतोष मराठे, प्रादेशिक सीईओ, पश्चिम विभाग, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले,”आमचा अपोलो हॉस्पिटल्समध्ये विश्वास आहे की पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी आपत्कालीन काळजी घेणे आवश्यक आहे. या संकल्पनेवर जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गोल्डन अवर, ज्यामध्ये संबंधित वैद्यकीय मदत विंडो कालावधीत मिळणे आवश्यक आहे.”

श्री संतोष मराठे म्हणाले, कुटुंबातील सदस्यांना मूलभूत लाइफ सपोर्ट ट्रेनिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यात आपत्कालीन परिस्थिती विषयी अज्ञान टाळणे महत्त्वाचे आहे. नवी मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी हे उपक्रम एखाद्याला आपत्कालीन काळजीबद्दल आवश्यक ज्ञान मिळवण्यास मदत करतात. तात्काळ वैद्यकीय मदत आणि रुग्णवाहिका मिळण्यासाठी नवी मुंबईत फक्त 1066 डायल करणे आवश्यक आहे, संपूर्ण नवी मुंबईत रुग्णवाहिका मोफत वाहतूक प्रदान करते. अपोलोकडे सर्व वैद्यकीय गरजांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षित डॉक्टरांसह 24×7 उपलब्ध आपत्कालीन टीम आहे.ends GNI SG

Be the first to comment on "‘आपत्कालीन काळजी जी नेहमी फक्त एक कॉल दूर असते’वैद्यकीय आणीबाणीसाठी नवी मुंबईत २५ ठिकाणी फ्लॅश मॉब"

Leave a comment

Your email address will not be published.


*