अपोलोने १६ महिन्यांच्या ओवीला दिले जीवनदान, ओवीवर ‘ट्रान्सकॅथेटर डिव्हाइस क्लोजर’ ही प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली

नवी मुंबई, ६ जून 2023 (GNI): नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे १६ महिन्यांच्या चिमुरडीच्या सेकंडम एट्रियल सेप्टल डिफेक्ट (एएसडी) किंवा हृदयाच्या वरच्या चेंबर्समधील (कक्षातील) भितींच्या मध्यभागी असलेल्या छिद्राचे ट्रान्स-कॅथेटर डिव्हाइस क्लोजर यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. या नाविन्यपूर्ण प्रक्रियेमध्ये उजव्या ऊरु-शिरांच्या माध्यमातून इन्फेरिअर वेना कावा (आयव्हीसी) च्या फुग्याच्या विस्तारासह (बलून डिलेटेशनसह) १८ मिमी ऍम्प्लॅटझर™ सेप्टल ऑक्ल्युडर उपकरणाचा वापर केला जातो.

ओवीला कोणत्याही सक्रिय तक्रारी नव्हत्या तपासणी केल्यावर कळलं की तिच्या वयानुसार तिची वाढ अपुरी होत आहे. तिचे वजन आणि उंची देखील कमी होती. जन्माच्या वेळी ओवीचे गुदद्वार सामान्यपणे उघडत नव्हते व छिद्रहीन गुदद्वार देखील होते, ज्यावर त्या वेळी उपचार सुरु होते. ट्रान्सकॅथेटर डिव्हाइस क्लोजर हा एक शस्त्रक्रियाविरहित उपचार आहे आणि एएसडीच्या उपचारांसाठी ही सुरक्षित पद्धत आहे. यामुळे लवकर बरे होता येते तसेच शारीरिक व मानसिक परिणाम कमी होतो. सामान्य भूल अंतर्गत ओवीच्या हृदयाच्या डाव्या आणि उजव्या ऍट्रिया वरच्या चेंबर्समधील छिद्रांद्वारे विशेषतः रक्त प्रवाह थांबवण्यासाठी तयार केलेले उपकरण वापरुन ओवीवर एएसडीचे ट्रान्सकॅथेटर डिव्हाइस क्लोजर ही प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. या प्रक्रियेनंतर मुलीला त्याच अवस्थेत बालरोग आयसीयूमध्ये हलवण्यात आले आणि तिला हेमोडायनामिक स्वरुपात (तिचे रक्तसंचारण प्रकरण) स्थिर ठेवण्यात आले.

डॉ. भूषण चव्हाण, बाल हृदयरोगतज्ञ, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईतील यांनी मत व्यक्त केले,”ओवीची वाढ अपुरी असल्यामुळे इकोकार्डिओग्राफी करण्यात आली ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात एएसडी दिसून आले. सेकंडम ऍट्रियल सेप्टल डिफेक्ट हा एक हृदयविकाराचा प्रकार आहे ज्यामध्ये व्यक्तीला जन्मतःच ‘हृदयात छिद्रे’ असतात. या विकारात हृदयाच्या दोन भागांतून, प्रणालीगत आणि फुफ्फुसीय अभिसरणातून रक्त मिसळले जाते, मुळात असे घडू नये. यामुळे हृदयाच्या कार्यावर आणि प्राणवायूच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. सामान्यतः सेकंडम एएसडी असलेल्या लोकांमध्ये बालपणात आणि पौगंडावस्थेत लक्षणे दिसत नाहीत. तथापि उपचार न केल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते, ही गुंतागुंत वयानुसार वाढू शकते आणि आयुर्मान कमी करु शकते. ओवीच्या बाबतीत गुदद्वाराच्या विकृतीवर उपचार केल्यानंतरही तिची वाढ होण्यास लक्षणीयरित्या अपशय आले. याचे कारण श्वसनमार्गामध्ये वारंवार होणारे संक्रमण लवकरात लवकर एएसडी बंद करणे आवश्यक होते. हृदयातील छिद्र बंद करण्यासाठी शस्त्रक्रियेपेक्षा ट्रान्सकॅथेटर तंत्र अधिक योग्य आहे आणि तिचे लहान वय आणि कमी वजन लक्षात घेता एएसडी चे ट्रान्स-कॅथेटर डिव्हाइस क्लोजर हा सर्वोत्तम उपाय असल्याचे निश्चित करण्यात आले. अखेर ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि यामध्ये लहान मुलीने चांगली साथ दिली.”

ओवीच्या आई श्रीमती बोरकर कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाल्या,”आम्हाला आमच्या मुलीच्या शारीरिक वाढीची आणि तब्येतीची काळजी वाटत होती. माझ्या १६ महिन्यांच्या मुलीच्या हृदयात दोष आहे हे जेव्हा मला कळले तेव्हा मोठा धक्का बसला. पण डॉ. चव्हाण आणि नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या संपूर्ण टीमने घेतलेली काळजी आणि दाखवलेले कौशल्य यामुळे माझी चिंता दूर झाली आणि माझ्या पतीला व मला आशेचा एक नवा किरण मिळाला. माझ्या मुलीचे जीवन वाचवल्याबद्दल मी अपोलो रुग्णालयाची आभारी आहे.” Ends GNI

Be the first to comment on "अपोलोने १६ महिन्यांच्या ओवीला दिले जीवनदान, ओवीवर ‘ट्रान्सकॅथेटर डिव्हाइस क्लोजर’ ही प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली"

Leave a comment

Your email address will not be published.


*